।। वेदनाशामक गोळीपेक्षा हळदच भारी ।।
हळदीच्या औषधी गुणधर्माची आपल्याला माहिती आहेच .
आता परदेशी हळदीमधली औषधी गुणधर्मे मान्य केलेली आहेत . कोणताही जखमेवर वेदनाशामक गोळी पेक्षा हळद जास्त काम करीत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे . ह्याबाबतचे संशोधन युरोपिअन रिव्हिएव फॉर मेडिकल अँड फॉर्मोकॉलॉजिकल सायन्स ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहे . ह्यात म्हंटले आहे कि खेळताना खेळाडूंना दुखापत होत असतात . विशेषतः रग्बी खेळात खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे . खेळाडू जखमी झाल्यावर त्याला तातडीने वेदनाशामक गोळी दिली जाते . त्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात वेदना कमी होते . तरी गोळीचा काही प्रमाणात साईड इफ्फेक्ट होऊन खेळाडूच्या खेळावर त्याचा परिणाम होतो . त्याऐवजी खेळाडूच्या जखमेवर हळदीचा लेप लावण्यास सुरवात केली हा अगदी नेसर्गिक उपाय असल्याने कोठेही सेप्टिक न होता जखम लवकर भरून आली . खेळाडूला कोणत्याही साईड इफ्फेक्टला सामोरे जावे लागले नाही .
ह्यावर अधिक संशोधनासाठी इटालियन पीऐसेंन्झा कळंबच्या वतीने जखमी झालेल्या ५० खेळाडूंची निवड केली . त्यांच्या २ टीम करून एक टीमवर हळदीच्या माध्यमातून . तर दुसऱ्या टीमवर वेदनाशामक गोळ्यांच्या माध्यमातून उपचार केले . ह्यामध्ये हळदीचे उपचार केलेल्या टीमच्या खेळाडूंना लवकर बरे वाटले . आणि त्यांच्या हाडाची झीजही भरून आल्याचे लक्षात आले .
आजही आपल्याकडे लहान मुलांना खेळतां थोडे लागले किवा खरचटले तर हळद लावायची पद्धत आहे . शहरापेक्षा भारतात ग्रामीण भागात अजूनही ह्याच पद्धतीचा वापर केला जातो . हळदीचे गुण आता परदेशातही मान्य होत आहे
।। दही रोगप्रतिकारता शक्ती वाढवते ।।
दही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वरदान ठरते . दह्याच्या सेवनाने निरोगी रहाण्यास मदत मिळते . ह्याशिवाय अनेक गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासही दही कारणीभूत ठरते . दह्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे जिवाणू असतात . हे जिवाणू आपल्याला र्रोगापासून लढण्यास सक्षम बनवितात . दह्याचे नियमित सेवन दमा व ऍलर्जी सारख्या रोगांना प्रतिबंध कारणासी मदत करते .
दुधापेक्षा दह्याच्या सेवनाने भूक वाढण्यासही मदत होते . हे एक संशोधनात आढळले . दह्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते . कॅल्शिअम जीवनसत्व अ . ड . फॉस्फरस . ह्यासारखी पोषक तत्वे दह्यात असल्यामुळे डोळे व केसांसाठी दही हे फायदेशीर आहे . जर तुम्ही डोक्याला दह्याने मालिश केले तर अनिद्रेसारख्या समस्येपासून मुक्ती मिळेल . दह्यामध्ये असणारे जिवाणू छोट्या आतड्याला चिकटतात व नको असलेले पदार्थ शरीरभर काढण्यास मदत करतात . ह्याशिवाय उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने लू पासून संरक्षण होण्यास मदत होते .

No comments:
Post a Comment