Monday, 23 April 2018

।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

                                                   ।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे . ते थंड प्रदेशात होते . सुगंध . लाल रंग. रसाळपणा .आणि गोडवा ह्यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे . स्टोबेरी हि एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे . ह्या फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला असे मानले जाते . सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात . नंतर जस जशी त्याची वाढ होत जाते तास तश्या त्या लाल रंगाच्या होत जातात . 

पोषक आणि आरोग्यदाई -: स्ट्रॉबेरी ह्या लालेलाल रसाळ फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला  हे फळ नुसते चवीतच नाही तर पोषकतत्वात देखील अग्रगण्य आहे . वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी एक पर्वणीच आहे . 
१ कप स्ट्रॉबेरीत  अवघे ४४ उष्मांक असतात  व पाण्याची मात्र भरपूर असते . दोन जेवणाच्या मधील पोटपूजेसाठी हे उत्तम आहे . रोजच्या ब्रेकफास्ट सिरीयल मध्ये स्ट्रॉबेरी घातल्यास कॅलरी न वाढत पोषक मूल्ये वाढतात . व पोटही व्यस्थित भरते . हृद्य विकार.  उच्चा रक्तदाब . व मधुमेह ह्या मोठ्या विकारामध्ये ह्या फळातील कफ जीवनसत्वाचा निश्चितच फायदा मिळतो . 

हंगाम -: लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीचा तिच्या मोहक सुगंध व चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून उपोयोग आहे . ज्यांनी एकदा हे फळ खाऊन पहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरी चे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटते . अगदी अपवादात्मक लोकांना हे फळ आवडत नाही . पण स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपोयोग केला जातो . वेगवेगळ्या आईस्क्रीम . मिल्क शेक मध्ये . चॉकलेट आणि जाम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो . 

स्ट्रॉबीरी चे  फायदे -स्ट्रॉबेरी खाण्यामुळे हृद्य विकार आणि मधुमेहावर मात करता येते . स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणार थकवा कमी होतो . 

स्ट्रॉबेरी ऑक्ससाईड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी हि लाभदायक आहे . स्ट्रॉबेरीमुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील क  जीवनसत्वामुळे डोळ्यांना  प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबीरीत असणारे अँटिऑक्सिडेन्ट . प्लेवोनाइडे . फोलेट आणि कॅफेरॉल हे घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत होणाऱ्या पेशी नष्ट करतात . ह्यातील क  जीवनसत्व  त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते . त्यामुळे त्वचा तजेलदार होते . पोट्याशिअम हे द्रव स्ट्रॉबेरीत मुबलक असल्याने हृद्य विकाराचा झटका टाळण्यास मदत होते . 

           तांबड्या रक्तपेशींच्या अभावामुळे स्त्रीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण भारतात मोठे आहे . स्ट्रॉबेरीच्या फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींचे वाढ करण्यास मदत करतात . सायट्रिक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीत  असल्याने दात चमकदार होऊन हिरड्या मजबूत होण्यास मदत होते . 

सांधेदुखीपासून स्ट्रॉबेरी दिलासा देते . ह्यातील अँटीऑक्सडेन्ट आणि फायटो केमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात . स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्चा रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते . मॅगनीज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीच्या असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो . आणि हाडे दुखीपासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबेरी मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो . म्हणून आपल्या आरोग्यासाठी हे फळ खाल्लेच पाहिजे  .. 



















         

No comments:

Post a Comment