Tuesday, 24 April 2018

।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।

                                  ।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।


सालीसकट खाण्याचे फायदे -:  पेरू सफरचंद द्राक्षे ह्या फळांना सालोसाहितच खावे . जर आपण ह्या फळांची साले काढली तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सक्स आपल्या शरीराला मिळणार नाही . 

फळांच्या साली फायबरचा एक मोठा स्रोत असतात . जे अपचन व पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात . आणि पोटाच्या कॅन्सरपासून हि वाचवतात . ज्या प्रकारे सफरचंदाच्या एका सालीमध्ये कॅन्सरशी लढणारे ८५ टक्के फायटो केमिकल्स असतात ते पूर्ण सफरचनापेक्षा सालीत जास्त असतात .

सालीमध्ये खूपच कमी कॅलरीज  साखर आणि कोलेस्ट्रॉल असतात . आणि ते एलडीएल ब्रँड कोलेस्ट्रॉलची थर कमी करण्यास मदत करते . 

संत्र्याच्या सालीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सडेंट असतात जे शरीरात खराब कोलेस्टरच्या स्ट्रेस कमी करतात . आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात . 

सालीसकट फळे व भाज्या खाण्यामुले पोट जास्त वेळपर्यंत भरलेले रहाते . वजन घटवण्यासाठी ह्याची मदत होते . 

त्यांच्या सालीमध्ये  कॅल्शिअम . व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . त्यांना शिजवण्याआधी फक्त धुवावे लागते . बटाट्याचा डीप   फ्राय करू नका . तसे केल्याने त्यात अतिरिक्त कॅलरी जमा होतात . त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचत असते . 

बटाट्याची साले -: बटाट्यापेक्षया बटाट्याच्या साली मध्ये जास्त पोषक द्रव्ये असतात . साली काढल्यामुळे बटाट्यामधील पोषक द्रव्ये कमी होतात . त्यांच्या सालमध्ये   कॅल्शिअम व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . बटाटा नेहेमी फायबर युक्त भाज्याबरोबर जसे बीन्स. सिमला मिरची . पालक ,
आणि दुसऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शिजवाव्यात . 

ब्रोकोलीची पाने आणि देठ -: बरेच लोकं ब्रोकोली शिजवताना त्याची पाने आणि देठ फेकून देतात . तसे करू नये कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ऐ भरपूर प्रमाणत असते . ब्रोकोलीबरोबर त्याची पाने आणि देठ . ह्यांना कापून भाजी करा. हवे तर त्यास सूपमध्ये टाकू शकता . तसेच बारीक करून घ्या . व हवे तर त्यात चाट मसाला टाकून खाऊ शकता . 

टरबुजाची साले -: साधारण पणे  टरबुजाची सालीला आपण कोणत्याच कामाचे मानत नाही . आणि नेहेमी फेकून देतो . पण त्यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते . ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार चांगल्या प्रकारे होतो . टरबुजांच्या सालीना दह्याबरोबर बारीक करून हि पेस्ट आपल्या डायट मध्ये सामील करू शकता .

डाळिंबाची साले -:   ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जाडा बल्डींग होते . त्यांना डाळिंबाची साले सुकवून आणि त्यांची पावडर रोज एक चमचा खायला  हवी . ह्यामुळे पिरियड दरम्यान बल्डींग कमी होते . डाळिंबाचे साल तोंडात धरून शोषण्याने खोकल्याचा वेग कमी होतो . ह्या व्यतिरिक्त डाळिंबाला बारीक कुटून त्यात दही मिसळून त्याची घट्ट पेस्ट मिसळून डोक्यावर लावा . त्यामुळे  केस मुलायम मऊ रहातात . 

काकडीची साल -: जर तुम्हाला काकडी पसंत असेल तर भरपूर पोषण मिळवण्यासाठी काकडीचे साले काढून खाऊ नका . काकडीच्या व्हिटॅमिन के . अँटीऑक्सडेंट्स . आणि पोट्याशिअम भरपूर मात्रेत असते . काकडीच्या सालेत भरपूर प्रमाणात फायबर असते . अपचनापासून आराम देते . काकडीच्या कोशिंबीर मध्य हि काकडीचे साल काढू नये . सालीसकट खाणे त्रासदायक असेल तर त्याचे रायते बनवावे . चवीत फरक होणार नाही . दक्षिण भारतात व विशेषतः आंध्र प्रदेशात काकडीचे लोणचे बनविले जाते . ते साली शकत बनवले जाते . 

   








    

No comments:

Post a Comment