Tuesday, 10 April 2018

।। लवंग -मन प्रसन्न करते . औरोग्यास सहाय्यक व जंतूंचा नायनाट।। अत्यंत औषधी देशी तूप ||

                      ।। लवंग -मन प्रसन्न करते . औरोग्यास सहाय्यक व जंतूंचा नायनाट।।

खरी लवंग तीच आहे कि तिचे तेल काढलेले नसते . लवंग 

 लवंगाचे झाड सुंदर आणि सुगंधी  असते . त्याची पाने देखील सुगंधी असतात . त्याच्या फुलांच्या कळ्यांना लवंग असे म्हणतात . बाजारात जी लवंग मिळते त्यापैकी बहुतांश लवंगाचे तैल काढलेले असते . 

लवंग पचनक्रियावंर परिणाम  करते. ह्यामुळे भूक वाढणे . पित्ताशयाच्या रस क्रियेला शक्ती मिळते . व मन प्रसन्न होते . लवंग कृमिनाशक आहे . पित्ताशय आणी आतड्यात राहणाऱ्या सूक्ष्म जंतूमुळे पोट फुगते . त्या सूक्ष्म जंतूंचा नायनाट करण्याचे काम लवंग करते . रक्तातील श्वेत कणांना वाढवण्याचे काम लावणं करते . ह्या गुणांमुळे शरीरात रहाणाऱ्या रोगमूलक किटाणूंचा नाश  होतो , 

लवंग चेतनाशक्ती जागृत करते . यामुळे हृद्य . रक्तसंचार . व वेगाने श्वास घेणे - सोडणे ह्या क्रियांवर स्पष्टपणे दिसतो . म्हणून त्रिदोषात लवंगाचे सेवन अवश्य केले जाते . शरीरात दुर्गंध नष्ट करण्याचे काम हि लवंग करते . कफ . लाळ . मुखदुर्गंधी दूर जाण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो . 

खोकला झाला असल्यास लवंग तव्यावर भाजून तिची पूड करावी . व हि पूड मधात मिसळून चाटावी . 


२) अत्यंत औषधी देशी तूप -: दोन थेम्ब देशी गाईचे तूप नाकात सकाळ संध्याकाळ घालण्याने . मायग्रेन च्या त्रासापासून मुक्ती मिळते . डोकेदुखी होत असल्यास शरीरातील उष्णता वाढते . अश्या वेळेस गाईच्या तुपाने पायाचा तळव्यांना मालिश करावे . डोकेदुखी थांबते . नाकात तूप टाकल्याने नाकातील खाज कमी होते . व मेंदू ताजातवाना होतो . 
                    गाईचे तूप नाकात टाकण्याने मानसिक शांतता हि लाभते . स्मरणशक्ती सुधारते . 
२० ते २५ ग्राम तूप व खडीसाखर एकत्र करून खाण्याने दारू . भांग . गांजा . ह्यांची नशा कमी होते . गाईच्या छातीवर मालिश करण्याने लहान मुलांच्या छातीत साचलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते . 




   

No comments:

Post a Comment