Friday, 20 April 2018

।। हळदीचे गुण ।।

                                                            ।। हळदीचे गुण ।।


 हळदीच्या सेवनाने नैराश्य व विस्मरणाच्या आजारात कमालीचा फायदा होतो . 

हळदीमधील  कर्क्यूमीन  हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आले आहे . 

हळद हा निव्वळ मसाला नसून तो भारतीयांच्या आहारात नित्य असणारा आरोग्यपूर्ण घटक आहे . व्य वाढल्यानंतर ज्यांची स्मरणशक्ती कमी होते त्यांनी हळदीच्या सेवनाने खूपच चांगला परिणाम होतो असं संशोधनाचा निष्कर्ष आहे . 

" अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकिऍस्ट्री " मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास प्रबंधाप्रमाणे हळदीत कर्क्यूमीन नावाच्या  रसायनात प्रतिरोधक शक्ती आणि शरीरातील बाह्य आणि आंतरिक सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे . 

स्मरणशक्तीवर करीकुलम `ह्या रसायनाचा काय परिणाम  होतो ह्यासाठी काही वयस्क व्यक्तीवर प्रयोग कारणात आला . स्मरणशक्ती काही प्रमाणात कमी झालेल्या व्यक्तींना  करीकुलम रसायनांचा रोज ९० मिलिग्रॅमचा डोस देण्यात आला . ह्या प्रयोगात जे लोकं सहभागी झाले होते त्यांची आकलन शक्ती आणी डोळ्यांच्या क्षमतेची चाचणी सहा महिने घेण्यात आली . हा प्रयोग पुढे १८ महिने करण्यात आला . रक्तातील कर कुल्यम ह्या रसायनाचा काय परिणाम होतो ? हे दर विशिष्ट्य कालावधीनंतर तपासण्यात आले . 

  ज्या लोकांच्या आहारात हळदीचाच म्हणजे कर कुल्यम ह्या रसायनाचा वापर होत होता . त्यांच्या स्मरणशक्तीत आणि आकलन क्षमतेत कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून आले . ह्या लोकांच्या मानसिक अवस्थेतही कमालीची सुधारणा झालेली होती . हळदीमधील करीकुलम हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांनी मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आलेले आहे . असे अभ्यासकांनी म्हंटले आहे . ह्यामुळे स्मरणशक्ती अत्यंत सक्रिय बनत असते . 





No comments:

Post a Comment