Wednesday, 4 April 2018

।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।

                          ।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।


कोणत्या आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांना वाढताना बघावे.  त्यांची प्रगती बघावी . पण आजची व्यस्त जीवनशैली आणि अनियंत्रित  आहार ह्यामुळे आयुष्य कमी होत चालेले आहे . 

कॅलरी कमी खा -: कॅलरी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत . पण गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा . मधुमेह . हृद्य रोग . कर्करोग ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते . जे आपले आयुष्य कमी करतात . आपला आहार असा असावा ज्यामध्ये पौष्ठिक पदार्थ अधिक असावेत . तसेच कॅलरी हि संतुलित प्रमाणात असाव्यात . 

शाकाहारी व्हा -:  वय वाढते तसे आपल्या शरीरातील काही पेशी नष्ट होतात . त्यांना ठीक करण्यासाठी अँटी ऑक्सिडेन्ट महत्वाची भूमिका बजावतात . अशावेळेस जे लोकं शाकाहारी असतात . भरपूर प्रमाणात फळे भाज्या खातात . त्यांना भरपूर प्रमाणात  अँटीऑक्सिडेन्ट मिळतात . ताजी फळे आणि भाज्यांमध्ये फाईटो न्यूट्रियंट्स असतात . त्यामुळे डिमेंशिया . अलझिएमेर होण्याची शक्यता कमी होते . 

मेंदूची कार्यक्षमता वाढवा -:  एखादी व्यक्ती तेव्हाच दिसते . जेव्हा ती शाररिक दृष्ट्या नवे तर मानसिकदृष्टही हि उत्साही असते . अक्रोड हे कोरडे फळ हृदयाशी संबधीत आजारापासून दूर ठेवतो . त्याच प्रमाणे मेंदूच्या आजारापासूनही शरीराचे संरक्षण करतो . 

व्यायाम जास्त करा -:  दररोज कमीतकमी एक तास व्यायाम करण्याने आपण निरोगी राहू शकतो . त्याच बरोबर हृदयाशी संबधीत आजारापासून संरक्षण होऊ शकेल . जागतिक आरोग्य संघटनेच्या मते - दर  आठवड्याला साधारणतः १५० मिनिटे म्हणजे अडीच तास व्यायाम केल्याने आयुष्य सडे चार वर्षाने वाढते .. 

सामाजिक व्हा -:  मित्रांची कमतरता आणि सामाजिक एकटेपणा मृत्यूला लवकर आमंत्रण देतात . त्यासाठी खुश रहा . आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा . ह्यामुळे तुम्ही सक्रिय तर रहालाच त्याचबरोबर तुमचे आयुष्यही वाढेल ... 












No comments:

Post a Comment