Tuesday, 3 April 2018

।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

                                       ।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

  चांगल्या आरोग्यासाठी फळे आणि भाज्या खाणे खूप गरजे चे आहे .जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या असतील तरच तुम्हाला हे फायदे होऊ शकतात . 

     रक्तदाब नियंत्रणात राहतो . कोलेस्टोलची पातळी नियंत्रणात रहाते . धमन्या लवचिक होतात . हाडे मजबूत होतात . मेंदू . पचन यंत्रणेबरोबर सर्व अवयव योग्य रहातात . पण बहुतांश व्यक्ती ह्याकडे दुर्लक्ष करतात . ह्यामागील महत्वाचे कारण म्हणजे फळे व भाज्या ना परवडणे . भाज्या शिजवण्यासाठी लागणार वेळ व खाण्याचा जुन्या सवयी. ह्यामुळे अनेकदा फळ भाज्यांचा समावेश अनेकजण करीत नाही . खालील नोट्स चा वापर करून तुम्ही स्वादिष्ट व पौष्टिक बानू शकतात. ताज्या फळांचा व भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . मात्र  सकाळी सोडा पिणे टाळा . लक्षात ठेवा एक ग्लास जूस पिण्याचा अर्थ आहे . दहा चमचे साखर सेवन करणे . कांडा . काळे मिरे . मशरूम ने  सजवलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत आरोग्यदायी पर्याय आहे .   

१) गरज लक्षात घ्या -:  तज्ज्ञ म्हणतात आपण दिवसभरात कमीतकमी २ वाट्या फळे आणि सव्वा दोन वाट्या कच्चा भाज्या अवश्य खायला हव्यात . ह्यापेक्षा जास्तही खाऊ शकता,

२) लक्ष्य निश्चित करा -: जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या खूप प्रमाणात असतील तर आहारात एक फळ व एक भाजी समाविष्ट करा . जेव्हा याची तुम्हाला सवय होईल तेव्हा हळू हळू फळे व भाज्या ह्यांचे सेवन वाढवा . ह्यामुळे तुमच्या खाण्याच्या बाबतीत बदल होईल .   

३) प्रयोग करा -: किसलेले गाजर किंवा इतर भाज्या . पास्ता . सॉस . दही किंवा पिठात मिसळा . ह्यामुळे आहारातील भाज्यांचे प्रमाण वाढेल . 

४) काहीतरी नवीन करा -: सफरचंद . द्राक्षे . केळ. ह्यांचा कंटाळा येणे साहजिक आहे . म्हणून तुम्ही किवी . आंबा . ताजा अननस . इतर वेगळी फळे भाज्या . ह्यांचा आहारात समावेश करू शकता . 

५) फ्रुट स्मूदी  -:पाऊण कप प्लेन  दही. अर्धा कप स्ट्रॉबेरी . ब्लूएबेरी . किंवा तुमच्या आवडीची बेरी किंवा चेरी . अर्धे पिकलेले केळ . सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवा . त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला . पुदिना किंवा इतर फ्लेव्हरही मिसळू शकता . काही रेसिपी बुकच्या साह्याने तुम्ही तुमच्या आहारातील फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवू शकता . 

६) स्मूदी  सुरवात -: फ्रुट स्मूदी  ने दिवसाची सुरवात करण्यास किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत  तुम्हाला उत्साही ठेवण्यास सहायक ठरते . 

७) दही किंवा क्रीममध्ये बुडवा चव वाढवा -: दही किंवा क्रीममध्ये मसाला घाला . आणि त्यामध्ये फळभाज्या घालून मजा वाढवा . 

८) सॅन्डविच विथ सब्जी पेस्ट -:  टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून सॅन्डविचमध्ये घालून त्याचा वापर करा . 
९) देशी आम्लेट व्हेज  -: सकाळी बटाट्याचे पराठे . मठ्ठा . बटाट्याच्या  सॅन्डविचला नाही म्हणायला शिका . कांदा . काळे मिरे . मशरुमने सजविलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत औरोग्यदायी पर्याय आहे . स्टोबेरी . चेरी किंवा सुका मेव्याबरोबर कॉर्न फ्लेक्स दलिया खाऊ शकता . 

१०) द्रव रूपात घ्या -:ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . 

११) भाज्या धुवून मगच खा -: कोणत्याही भाज्या शिजवण्यापूर्वी चांगली स्वच्छ धुवून घ्या . भाज्या स्वच्छ ना धुणे धोकादायक आहे .. 















         

No comments:

Post a Comment