Monday, 2 April 2018

।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।

                          ।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।


१) तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी - डाळिंबाच्या सालीतही व्हिटॅमिन ऐ . इ . आणि सि . असतात . हे सर्व व्हिट्यामिन वाढत्या वयाची लक्षणे लवकर येण्यापासून बचाव करतात . अपचन . आम्ल पित्त . ताप . ह्यामुळे जर तोंडावाटे दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्याने तोंड साफ होऊन दुर्गंधी नष्ट होते . डाळिंबाची साल वाळवून त्याची भुकटी तयार करावी . एक ग्लास पाण्यात भुकटी मिसळून गुळण्या केल्यास दातांसंबंधीच्या समस्या . तोंड येणे व दुर्गंधी पासून सुटका होते . 

२) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते -: डाळिंबामध्ये प्रामुख्याने आढळणारे अँटी ऑक्सिडेंटन्ट्स शरीरात पसरणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा त्रास कमी  होतो . डाळिंबामुळे फ्री रॅडिकलसचा रक्त वाहिन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते तासकतसेच कोलेस्ट्रॉचेही प्रमाण नियंत्रणात रहाण्यास मदत होते . कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल्याने रक्तदाब हि सुधारतो . 

३) मेंदू सक्रिय ठेवते -: डाळिंबामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते . अल्झायमर सारख्या आजारामध्ये विसरभोळे पणा वाढण्याचा त्रास अधिक असतो . ह्यामध्ये डाळिंब खाणे हितकारी ठरते . 

४) वात  विकारावर उपयुक्त -: दाह शामक गुणधर्म असल्यामुळे डाळिंबामुळे कमजोर प्रतिकार र्शक्तीमुळे 
बालवणारे वातविकार कमी होण्यास मदत होते . डाळिंबामधील व्हिटॅमिन सि शरीरातील अँटी बॉडी ची निर्मिती व वाढ सुधारते . परिणामी विविध संसर्गापासून आपला बचाव होतो . 

५) खोकल्यावर उपयुक्त -: घश्यात खवखव वाटत असल्यास डाळिंबाच्या दाण्यापासून तयार पावडर पाण्यात उकळून गुळण्या कराव्या . ह्या माध्यमातून घशातील खवखव खोकल्यापासून सुटका होते . 

डाळिंबाला संस्कृतमध्ये दाडिमम म्हणतात . हे एक पित्तशामक फळ आहे . हि वनस्पती साधारण ३ ते पाचमीटर उंच होते.  

                                        २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।
 आवळा चावण्याने दात मजबूत होतात . आवळ्याचा रस दातांना लावण्याने पाय रिया मध्ये फायदा होतो . जेवण पचवण्यासाठी आणि तोंड साफ ठेवण्यासाठी  आवळ्याच्या सुपारीचे सेवन फायदेशीर ठरते . 

छोटासा आणि कडवट आवळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे . ह्याच्या गुणामुळे ह्या फळाला अमृतफळ असे म्हणतात . 

   आवळ्यामधे क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते . संत्रीपेक्षा २० पॅट अधिक का जीवनसत्व असते . आवळा रक्त शुद्ध करतो . अपचनापासून मुक्ती देतो . मानसिक विकाराशी सहायक ठरतो . शरीराला आजारापासून दूर ठेवतो . आवळा  कावीळ. पित्त . ताप . ह्यावर लाभप्रद आहे . 

            वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा उपोयोग करण्याने वेगवेगळ्या आजारामध्ये ह्याचा फायदा होतो . दहा ग्राम आवळ्याचे चूर्ण दुधाबरोबर घेतल्यास रक्त शुद्ध होते . त्वचेसंबंधीत आजार दूर होतात . 

         रात्री झोपण्यापूर्वी आवळ्याचे चूर्ण मध किंवा पाण्याबरोबर घेण्याने पोट साफ होते . डोळ्याशी संबंधित आजारामध्ये फायदा होतो . सुका आवळा शुद्ध तुपात तळून त्याचे चूर्ण डोक्यावर लेप म्हणून लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होते . 

                सुक्या आवळ्याचे चूर्ण चमेलीच्या तेलात मिसळून लावण्याने  अंगावरच्या खाजेचा त्रास दुर होतो 
आवळाच्या रसाचे सेवन करण्याने पोटातील जंत नाहीसे होतात .   











No comments:

Post a Comment