Tuesday, 24 April 2018

।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।

                                  ।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।


सालीसकट खाण्याचे फायदे -:  पेरू सफरचंद द्राक्षे ह्या फळांना सालोसाहितच खावे . जर आपण ह्या फळांची साले काढली तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सक्स आपल्या शरीराला मिळणार नाही . 

फळांच्या साली फायबरचा एक मोठा स्रोत असतात . जे अपचन व पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात . आणि पोटाच्या कॅन्सरपासून हि वाचवतात . ज्या प्रकारे सफरचंदाच्या एका सालीमध्ये कॅन्सरशी लढणारे ८५ टक्के फायटो केमिकल्स असतात ते पूर्ण सफरचनापेक्षा सालीत जास्त असतात .

सालीमध्ये खूपच कमी कॅलरीज  साखर आणि कोलेस्ट्रॉल असतात . आणि ते एलडीएल ब्रँड कोलेस्ट्रॉलची थर कमी करण्यास मदत करते . 

संत्र्याच्या सालीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सडेंट असतात जे शरीरात खराब कोलेस्टरच्या स्ट्रेस कमी करतात . आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात . 

सालीसकट फळे व भाज्या खाण्यामुले पोट जास्त वेळपर्यंत भरलेले रहाते . वजन घटवण्यासाठी ह्याची मदत होते . 

त्यांच्या सालीमध्ये  कॅल्शिअम . व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . त्यांना शिजवण्याआधी फक्त धुवावे लागते . बटाट्याचा डीप   फ्राय करू नका . तसे केल्याने त्यात अतिरिक्त कॅलरी जमा होतात . त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचत असते . 

बटाट्याची साले -: बटाट्यापेक्षया बटाट्याच्या साली मध्ये जास्त पोषक द्रव्ये असतात . साली काढल्यामुळे बटाट्यामधील पोषक द्रव्ये कमी होतात . त्यांच्या सालमध्ये   कॅल्शिअम व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . बटाटा नेहेमी फायबर युक्त भाज्याबरोबर जसे बीन्स. सिमला मिरची . पालक ,
आणि दुसऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शिजवाव्यात . 

ब्रोकोलीची पाने आणि देठ -: बरेच लोकं ब्रोकोली शिजवताना त्याची पाने आणि देठ फेकून देतात . तसे करू नये कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ऐ भरपूर प्रमाणत असते . ब्रोकोलीबरोबर त्याची पाने आणि देठ . ह्यांना कापून भाजी करा. हवे तर त्यास सूपमध्ये टाकू शकता . तसेच बारीक करून घ्या . व हवे तर त्यात चाट मसाला टाकून खाऊ शकता . 

टरबुजाची साले -: साधारण पणे  टरबुजाची सालीला आपण कोणत्याच कामाचे मानत नाही . आणि नेहेमी फेकून देतो . पण त्यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते . ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार चांगल्या प्रकारे होतो . टरबुजांच्या सालीना दह्याबरोबर बारीक करून हि पेस्ट आपल्या डायट मध्ये सामील करू शकता .

डाळिंबाची साले -:   ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जाडा बल्डींग होते . त्यांना डाळिंबाची साले सुकवून आणि त्यांची पावडर रोज एक चमचा खायला  हवी . ह्यामुळे पिरियड दरम्यान बल्डींग कमी होते . डाळिंबाचे साल तोंडात धरून शोषण्याने खोकल्याचा वेग कमी होतो . ह्या व्यतिरिक्त डाळिंबाला बारीक कुटून त्यात दही मिसळून त्याची घट्ट पेस्ट मिसळून डोक्यावर लावा . त्यामुळे  केस मुलायम मऊ रहातात . 

काकडीची साल -: जर तुम्हाला काकडी पसंत असेल तर भरपूर पोषण मिळवण्यासाठी काकडीचे साले काढून खाऊ नका . काकडीच्या व्हिटॅमिन के . अँटीऑक्सडेंट्स . आणि पोट्याशिअम भरपूर मात्रेत असते . काकडीच्या सालेत भरपूर प्रमाणात फायबर असते . अपचनापासून आराम देते . काकडीच्या कोशिंबीर मध्य हि काकडीचे साल काढू नये . सालीसकट खाणे त्रासदायक असेल तर त्याचे रायते बनवावे . चवीत फरक होणार नाही . दक्षिण भारतात व विशेषतः आंध्र प्रदेशात काकडीचे लोणचे बनविले जाते . ते साली शकत बनवले जाते . 

   








    

Monday, 23 April 2018

।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

                                                   ।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे . ते थंड प्रदेशात होते . सुगंध . लाल रंग. रसाळपणा .आणि गोडवा ह्यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे . स्टोबेरी हि एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे . ह्या फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला असे मानले जाते . सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात . नंतर जस जशी त्याची वाढ होत जाते तास तश्या त्या लाल रंगाच्या होत जातात . 

पोषक आणि आरोग्यदाई -: स्ट्रॉबेरी ह्या लालेलाल रसाळ फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला  हे फळ नुसते चवीतच नाही तर पोषकतत्वात देखील अग्रगण्य आहे . वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी एक पर्वणीच आहे . 
१ कप स्ट्रॉबेरीत  अवघे ४४ उष्मांक असतात  व पाण्याची मात्र भरपूर असते . दोन जेवणाच्या मधील पोटपूजेसाठी हे उत्तम आहे . रोजच्या ब्रेकफास्ट सिरीयल मध्ये स्ट्रॉबेरी घातल्यास कॅलरी न वाढत पोषक मूल्ये वाढतात . व पोटही व्यस्थित भरते . हृद्य विकार.  उच्चा रक्तदाब . व मधुमेह ह्या मोठ्या विकारामध्ये ह्या फळातील कफ जीवनसत्वाचा निश्चितच फायदा मिळतो . 

हंगाम -: लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीचा तिच्या मोहक सुगंध व चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून उपोयोग आहे . ज्यांनी एकदा हे फळ खाऊन पहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरी चे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटते . अगदी अपवादात्मक लोकांना हे फळ आवडत नाही . पण स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपोयोग केला जातो . वेगवेगळ्या आईस्क्रीम . मिल्क शेक मध्ये . चॉकलेट आणि जाम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो . 

स्ट्रॉबीरी चे  फायदे -स्ट्रॉबेरी खाण्यामुळे हृद्य विकार आणि मधुमेहावर मात करता येते . स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणार थकवा कमी होतो . 

स्ट्रॉबेरी ऑक्ससाईड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी हि लाभदायक आहे . स्ट्रॉबेरीमुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील क  जीवनसत्वामुळे डोळ्यांना  प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबीरीत असणारे अँटिऑक्सिडेन्ट . प्लेवोनाइडे . फोलेट आणि कॅफेरॉल हे घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत होणाऱ्या पेशी नष्ट करतात . ह्यातील क  जीवनसत्व  त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते . त्यामुळे त्वचा तजेलदार होते . पोट्याशिअम हे द्रव स्ट्रॉबेरीत मुबलक असल्याने हृद्य विकाराचा झटका टाळण्यास मदत होते . 

           तांबड्या रक्तपेशींच्या अभावामुळे स्त्रीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण भारतात मोठे आहे . स्ट्रॉबेरीच्या फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींचे वाढ करण्यास मदत करतात . सायट्रिक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीत  असल्याने दात चमकदार होऊन हिरड्या मजबूत होण्यास मदत होते . 

सांधेदुखीपासून स्ट्रॉबेरी दिलासा देते . ह्यातील अँटीऑक्सडेन्ट आणि फायटो केमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात . स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्चा रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते . मॅगनीज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीच्या असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो . आणि हाडे दुखीपासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबेरी मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो . म्हणून आपल्या आरोग्यासाठी हे फळ खाल्लेच पाहिजे  .. 



















         

Saturday, 21 April 2018

।। आंबा, व शेंगदाणे हे घटक मानवी आहारावर कसा परिणाम करतात ? ।।

                        ।। आंबा, व  शेंगदाणे हे घटक मानवी आहारावर  कसा परिणाम करतात ? ।।


      सध्या मार्केटमध्ये आंबा दाखल झाला आहे, मात्र महाराष्ट्राची शान असलेला हा आंबा आजकाल घरांमध्ये पूर्वीइतका खाल्ला जात नाही.खाण्यापिण्याबद्दल जागरूक असलेले नागरिक गेल्या काही वर्षांमध्ये हे फळ फारच जपून खात आहेत.आंब्याने वजन वाढते, रक्तातील साखर वाढते ही भीती तरुणांपासून अट्टल खाणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच वाटू लागली आहे. आंबाच नाही तर रोजच्या आहारातील खोबऱ्यालाही अनेकांनी तिलांजली दिली आहे.
        शेंगदाणेही गायब झाले आहेत. फणसही आपण खात नाही. ही फळे खायला हवीत
           मधुमेह झालेल्यांना आहारतज्ज्ञ आंबट फळे खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र गोड फळे खाऊ नका         सांगतात यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.
       आपला डाएटबद्दल नेहमी गोंधळ होतो. आहाराबद्दल इतका गोंधळ का होतो? आंबा खावा, असे सगळ्यांना वाटते. मात्र त्याचवेळी वजन वाढण्याची भीतीही वाटते.आंब्याला बाहेरून मागणी आहे. मात्र आंबा जिथे पिकतो तिथे खाल्ला जात नाही. मात्र मधुमेही, पीसीओडी, थायरॉइड, केस गळण्याचा त्रास होणाऱ्यांनी आंबा जरुर खावा.
आंबा खाऊन रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. गोड फळे खाऊ नयेत असे सांगितले जाते. मात्र चिकू, फणस, सिताफळ, द्राक्षे, केळी ही फळे आपल्या मातीत पिकतात म्हणून ती गोड असतात. ही फळे खाल्ली पाहिजेत. या फळांमध्ये आंबट फळांत जे फ्रुक्टोजअसते तेच असते,
                     फ्रुक्टोजमुळे रक्तीतील साखर हळुहळू चढते. *अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने आंबा हे फळ खावे, असे सांगितले आहे.


ओट्समुळे फायबर मिळते, असे सांगितले जाते. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायला फायबर महत्त्वाचे असते. मात्र *आंब्यामध्येही हेच फायबर आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आंब्याचा उपयोग होतो.

आंब्यामध्ये फायटिक अॅसिड असते. हे पाण्यामध्ये विद्राव्य आहे. त्यामुळे आंबा पाण्यात बुडवून ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आपल्याला गरजेचे घटक त्यातून मिळतात.
आपण जेव्हा फॅट आहारात घालतो तेव्हा अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. हाय ग्लायसेमिक इंडेक्स अन्न खाल्ल्याने आपली रक्तातील साखर चटकन वाढते. रक्तातील साखर नियंत्रित असावी यासाठी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खावे आमरसामध्ये थोडे तूप घालणे गरजेचे आहे. तूपामध्ये अत्यावश्यक फॅट्स असतात. त्याचप्रमाणे पुरीमध्ये अधिक फॅट्स असतात. या फॅट्समुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आमरसासोबत तळलेली पुरी खावी. न्यूट्रिशन म्हणजे केवळ कॅलरीचा अभ्यास नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. न्यूट्रिशन म्हणजे विविध शाखांचा एकत्रित अभ्यास आहे. आरोग्य, स्थानिक अर्थकारण आणि जागतिक परिससंस्था संवर्धनासाठी मदत याचा विचार करून आहार ठरवला पाहिजे.
फणसही खाऊ नका, असे आपल्याला सांगितले जाते. युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने फणसाला निग्लेक्टेड अँड अंडरयुटिलाइज्ड स्पिशिज म्हणून घोषित केले आहे. यामध्ये आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या मात्र ज्याकडे दुर्लक्ष झालेे त्याचा समावेश होतो  मधुमेहींना मारी बिस्किट खाण्याची परवानगी दिली जाते. मात्र या बिस्किटांमध्ये साखर असते. कॅलरीज कमी करा, प्रोटिन वाढवा’, असे सल्ले दिले जातात. मात्र हा सल्ला आहारपद्धतीनुसार दिला जायला पाहिजे
आपण एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीने खाऊ शकतो, ते सांगायला हवे. म्हणजे आंबा कापून, आमरस, आंबाच्या साटे, आंब्याचे लोणचे अशा पद्धतीने खाता येईल पण आंब्याचा स्वाद असलेली बिस्किटे, आंब्याची चॉकलेट या पद्धतीने आंबा खाऊ नये, हे सांगितले जायला हवे.
आहार ठरवताना तो आपण कायमस्वरूपी पाळू शकू का, हा विचार व्हायला हवा. त्याचवेळी हा आहार आपण पूर्वापार खात आहोत का, हेही समजून घ्यायला हवे.
आपण काजूगर खात नाही. काजूगरामध्ये जीवनसत्व असते. संत्र्यापेक्षा पाच ते सहा पटीने जास्त जीवनसत्व यातून मिळते.
मात्र तरी आपण काजूगर नाकारला आहे. हातसडीचा तांदूळ, सिंगल पॉलिश्ड तांदूळ खाल्ला तर काहीच हरकत नाही. आपण वरण भात तूप, असे खायला हवे. दूधसुद्धा देशी गाईचेच प्यायला हवे. हे फुल फॅट मिल्क असते.
आपल्याकडे शुक्राणूशी संबंधित समस्याही तूप, शेंगदाणे, नारळ आहारातून काढून टाकल्याने सुरू झाल्या आहेत. नारळ, तूप, शेंगदाण्यामध्ये गरजेचे फॅट्स आहेत. आपली आहारपद्धती शास्त्राधारित आहे, असे सांगितले जाते. हे शास्त्र म्हणजे शरीराचा विचार, अन्नातील घटकांचा विचार करून ठरवलेल्या पद्धती आहेत.  अतिरिक्त फॅट्समध्ये साखर घातल्याने ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे इन्शुलीन रेझिस्टन्सही कमी होतो.








Friday, 20 April 2018

।। हळदीचे गुण ।।

                                                            ।। हळदीचे गुण ।।


 हळदीच्या सेवनाने नैराश्य व विस्मरणाच्या आजारात कमालीचा फायदा होतो . 

हळदीमधील  कर्क्यूमीन  हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आले आहे . 

हळद हा निव्वळ मसाला नसून तो भारतीयांच्या आहारात नित्य असणारा आरोग्यपूर्ण घटक आहे . व्य वाढल्यानंतर ज्यांची स्मरणशक्ती कमी होते त्यांनी हळदीच्या सेवनाने खूपच चांगला परिणाम होतो असं संशोधनाचा निष्कर्ष आहे . 

" अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकिऍस्ट्री " मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास प्रबंधाप्रमाणे हळदीत कर्क्यूमीन नावाच्या  रसायनात प्रतिरोधक शक्ती आणि शरीरातील बाह्य आणि आंतरिक सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे . 

स्मरणशक्तीवर करीकुलम `ह्या रसायनाचा काय परिणाम  होतो ह्यासाठी काही वयस्क व्यक्तीवर प्रयोग कारणात आला . स्मरणशक्ती काही प्रमाणात कमी झालेल्या व्यक्तींना  करीकुलम रसायनांचा रोज ९० मिलिग्रॅमचा डोस देण्यात आला . ह्या प्रयोगात जे लोकं सहभागी झाले होते त्यांची आकलन शक्ती आणी डोळ्यांच्या क्षमतेची चाचणी सहा महिने घेण्यात आली . हा प्रयोग पुढे १८ महिने करण्यात आला . रक्तातील कर कुल्यम ह्या रसायनाचा काय परिणाम होतो ? हे दर विशिष्ट्य कालावधीनंतर तपासण्यात आले . 

  ज्या लोकांच्या आहारात हळदीचाच म्हणजे कर कुल्यम ह्या रसायनाचा वापर होत होता . त्यांच्या स्मरणशक्तीत आणि आकलन क्षमतेत कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून आले . ह्या लोकांच्या मानसिक अवस्थेतही कमालीची सुधारणा झालेली होती . हळदीमधील करीकुलम हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांनी मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आलेले आहे . असे अभ्यासकांनी म्हंटले आहे . ह्यामुळे स्मरणशक्ती अत्यंत सक्रिय बनत असते . 





Thursday, 19 April 2018

।। गुलकंद हे आपल्या शरीराला ऊर्जा देणारे टॉनिक ।।

                                 ।। गुलकंद हे आपल्या शरीराला ऊर्जा देणारे टॉनिक ।।


गुलकंदामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व थकवा दूर होतो . पित्त जळजळ होत असेल तर गुलकंद खा फायदा होतो उन्ह्याळ्यात गुलकंद खाल्याने डिहायड्रेशन होत नाही . शरीरात थंडावा निर्माण होतो . 

सुंदर कोमल सुगंधी असलेल्या गुलाबाच्या गुलाब पाकळ्यांपासून तयार केलेला गुलकंद हा चांगले टॉनिक आहे . तसेच तो उन्हाळ्याचा दाह  कमी करतो . 

मानसिक त्रास चिडचिड नैराश्य कमी करण्यासाठी गुलकंदाचा उपोयोग होतो . 

गुलकंदात गुलाबाबरोबर साखर हि असल्याने शरीराला व्हिटॅमिन सि आणि इ चा पुरवठा होतो . 

गुलकंदामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि थकवा दूर होतो . 

पित्त व जळजळ होत असेल तर गुलकंद खावा . 

गुलकंद खाल्याने त्वचेचा पोत सुधारतो . 

जेवणानंतर गुलकंद खाल्यास पचन चांगले होते . 

रात्रपाळी व प्रखर प्रकाशात काम करणार्यांनी गुलकंद घेणे चांगले असते . 

गुलकंद कसा तयार कराल -:

गुलकंदासाठी गावठी गुलाब वापरावेत . 

गुलकंदासाठी एक पातेल्यात गुलाब पाकळ्या आणि साखर सॅम प्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर  घालून घ्यावा . हे पातेले आठवडाभर चांगले उन्हात ठेवावे . रोज एकदा चमच्याने ढवळावे . गुलकंदल चॅन लाला रंग येतो . आहे प्रकारे तयार झालेले गुलकंद तुम्ही नियमित खाऊ शकता . गुलाबाचा दैनंदिन जीवनात निरनिरळ्या पद्धतीने उपोयोग केला जातो ह्यापासून बनलेल्या गुलाबी जलाचा  सुगंध हि गर्व निर्माण करतो .. 

                       










Wednesday, 18 April 2018

1) प्रत्येंक डाळींचे वैशिष्ट/ 2) कशाबरोबर काय खाऊ नये ?

प्रत्येंक डाळींचे वैशिष्ट -: 
मुगडाळ -: मुगडाळ हि पचण्यास हलकी असते . प्रथिने शरीरात शोषिले जाण्याचे घटक ह्या डाळीत आहेत .  
                मूगडाळीत बी जीवनसत्व असते सि जीवनसत्व व फॉलीक ऍसिड ह्यात असते . ह्यामुळे मानवाची                 प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हि डाळ उपयोगी आहे . 

मसूर डाळ -: मसूर डाळीहे  मध्ये मॉलेबडनेम द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत                              करते . 

हरभरा डाळ -:  हरभरा डाळीत सि व के व्हिटॅमिन असते . 
                       हरभरा डाळीतील कॅल्शिअम हाडे. दात . व नखे मजबूत करतात . 
                       हरभरा डाळीत पोट्याशिअम भरपूर आहे त्यामुळे हृदयाचे ठोके व रक्तदाब योग्य रहाते . 

उडीद डाळ -:  उडीद डाळ पचायला जड व पौष्ठिक असते . त्यामुले शरीराच्या पोषणासाठी अत्यंत चांगली                               असते . 
                     केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यास फायदा होतो . 
                     उडीद डाळीत पोट्याशिअम चांगले आहे . सी आणि बी जीवनसत्वे  कॅल्शिअम व तांबे ह्या                                  डाळीतून मिळते . 

तूरडाळ -:    तूर डाळ हि रोजच्या जेवणात तर असतेच . तूर डाळीत फॉलिक एसिड . लोह . फॉस्फरस .                                 मॅग्नेशिअम  असते .   

                                         कशाबरोबर काय खाऊ नये ?


१)  कलिंगड आणि मुळ्या बरोबर  मधाचे सेवन करू नये .  
२)  काकडी . थंड पाणी . थंड फळे . चहाबरोबर सेवन करू नये . 
३) खिरींबरोबर खिचडी व सातू सेवन करू नयेत  . 
४) भातामध्ये व्हिनेगरचा वापर टाळावा . 
५) दही . लोणी . दूध . डाळ . भाजी . व कोणतीही आंबट खाद्य वस्तू . तांबे . कसे . वा पितळी भांड्यात ठेवू नये . नाही तर त्याचे रासायनिक प्रक्रिया होऊन विष बनण्याची प्रक्रिया होते . हि अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी .. 


Tuesday, 17 April 2018

।। तेलकट व तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

                               ।। तेलकट व  तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

आरोग्यदाई आहारात तेला तुपाचा वापर किंवा स्निग्ध पदार्थांचा कमीतकमी समावेश करा . 

स्निग्ध पदार्थ ह्यांचे आहारातील प्रमाण करण्याचा उपाय म्हणजे आहाराचे प्रमाण नव्हे  तर  आहाराच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करणे . तेल तुपाचा आहारात कमीतकमी समावेश करण्यासाठी आपण अनेक उपाय अजमावू शकतो . वजन कमी करण्यासाठी तुम्ही पारंपरिक आहार घेण्याऐवजी आहाराचे प्रमाण  कमी करत असाल तर शरीर संतुलित रहाण्यासाठी कॅलरी जाळण्याची क्षमता मंद केली जाते . ह्याचा परिणाम म्हणून चयापचयाचा वेग २५ टक्क्यांनी  कमी होतो . कॅलरी धीम्या गतीने खर्च होतात . परिणामी तुम्ही कमी कॅलरी युक्त आहार घेतला तरी तुमचे वजन घेतात नाही . 

वजन कमी करण्याच्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही कॅलरी मोजता . आणि ह्याकडे हि लक्ष देता कि तुम्ही काय काय खाताय शेवटी ह्या सगळ्या त्रासाने तुम्ही ट्रस्ट होता . उपाशी रहाणे . बेचव अन्नाचे सेवन करणे . अनेक खाद्यपदार्थांपासून वंचित रहाणे . तुम्हाला त्रासदायक वाटते . शेवटी डायटिंग विसरून तुम्ही ठुमहाला हवे ते खाण्यास सुरवात करतात . त्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते . 

संतुलित आहार म्हणजे काय -:

जातील कर्बोदकांमध्ये कॅलेरीचे प्रमाण कमी असते . फायबर चे प्रमाण अधिक असते . हे पचायला जड हि असतात  . परिणामी कमी खाल्यानंतरही पोट  भरते. ह्याउलट साधारण कर्बोदके म्हणजे . साखर . अल्कोहोल . मध . शिरा . इत्तादीने ने पोट भरत  नाही . त्यामध्ये फायबर हि नसतात . त्यामुळे भरत  नाही. 
कैलरीचे प्रमाण कमी करताना . एक गोष्ट महत्वाची आहे कि ती म्हणजे संतुलिती आहार घेण्यावर भर दयावा . ह्यामध्ये कमी चरबीयुक्त व फातरहित पदार्थांचा समावेश करावा . दही . पनीर . तूप नसलेली बिस्किटे . ह्यांचा वापर करा . फॅट्सयोगी आहार सेवन केल्यानंतर कॅलरी नंतर जाळणे तसे अवघड असते . कॅलरी जाळण्यासाठी दररोज २० ते ६० मिनिटे चालणे उपयुक्त ठरते . तेलकट पदार्थाने कॅलेरीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा वाढतो . कमी कॅलरी युक्त संतुलित आहाराचे सेवन आणि व्यायामाचे साह्याने तुम्ही वजन कमी करू शकता . 

तुम्ही पोटभर खाऊ शकता शिव्या तुमच्या आवडीच्या पदार्थावर ताव हि मारू शकता . फक्त फॅट्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण काय खायचे ह्याची निवड विचापूर्वक करा . 

आपले पोट जोपर्यंत भरात नाही तोपर्यंत आपण काही ना काही तरी खातच रहातो . म्हणजे भाज्यांमध्ये मटार
 . सोयाबीन . फळांमध्ये जांभूळ . संत्रे . टरबूज . केळे . नासपती . धान्यांमध्ये मका . तांदूळ. ज्वारी . बाजरी . भाज्यांमध्ये - कोबी . फ्लॉवर . गाजर . सलाडचे पाने . कांदा . रताळे . पालक . मश्रुम . वांगे . ओवाची पाने . मेथी . चवळी . टोमटो ह्यामध्ये  जातील कर्बोदके असतात . 

बौतांश लोकांचा असा समाज असतो कि ब्रेड. किंवा बटाटा . खाण्यामुळे खरे तर अशा  घटकांमुळे वजन वाढते . ज्यांचं आपण त्याबरोबर समावेश करतो . म्हणजे भाजलेल्या बटाटामध्ये कोलेस्ट्रॉल नसते . तसेच फॅट्स हि नसतात पण जेव्हा आपण तळून  किंवा लोणी लावून खाण्याने बटाटा आदर्श आहार रहात नाही . तेल तुपाचा वापर करण्याऐवजी मसाल्याचा  वापर केल्याने फॅट्स कमी होतात..