Monday, 5 February 2018

फॅक्चर साठी गहू धान्याचा उपयोग

                                                   फॅक्चर साठी गहू धान्याचा उपयोग 
अपघातामुळे व पडल्यामुळे हाड मोडते . त्याला भग्न रोग असे नाव दिलेले आहे . साध्य ज्या प्रकारे मोडलेले हाड बसवून प्लास्टर केले जाते अगदी तश्याच प्रकारे पूर्वीच्या काळी सुद्धा विशिष्ट गवत .झाडांच्या साली . आदींचा मदतीने भग्नावर बंधन उपचार केला जात असे . सरकलेले हाड पुन्हा स्वस्थानी कसे बसवावे . वेदना कमी करण्यासाठी काय उपचार घयावे .मोडलेले हाड पुन्हा सुखरूप सांधले जावे ह्यासाठी काय आहार घ्यावा ?
  हाडांच्या बळकटीसाठी गाईचे दूध उत्तम असते .  त्यातल्या त्यात पाहिलांदा व्यालेल्या गाईचं दूध अधिक चांगले असते . 
  गहू हाडांना सशक्त करण्यासाठी उत्तम समजले जातात . गाईच्या दुधात तूप गव्हाचे सत्व . अर्जुन साल . लाखेचे चूर्ण , आणि हाडसांधी नावाच्या वनस्पतीचे चूर्ण मिसळून घेण्याने हाड सांधण्यास मोठी मदत होते . 
हाड चांगली प्रकारे सांधण्यासाठी -कापभर दुधात २ चमचे साजूक तूप आणि १/२/चमचे गव्हाचे सत्व मिसळून घेण्याने हाड सांधण्यास मदत होते . 
काही वेळा फॅक्चर अश्या ठिकाणी होते कि तिथे प्लास्टर घालता येत नाही. किंवा हाडळ छोटीसी क्रॅक असेल तर प्लास्टर केले जात नाही . अश्या वेळी त्या ठिकाणी गव्हाच्या सत्वांचा लेप लावला जातो. 

   

No comments:

Post a Comment