Wednesday, 31 January 2018

।। माणूस घेत असलेला आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

                     ।। माणूस  घेत असलेला  आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

माणसाची सगळी धडपड त्याच्या २/३/ वेळेच्या जेवणासाठी असते. माणूस केवळ अन्न  खाऊन जगू शकत नाही . सुख व समाधानाने जगण्यासाठी त्याला शिक्षणाची .एखाद्या छंदाची .किंवा कौशल्याची गरज असते . 
म्हणून आपल्या शहाण्या पूर्वजांनी २ गाष्टी सांगून ठेवल्या आहेत . त्यांच्यापैके पहिली म्हणजे -अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे .-यज्ञ कर्म आहे . केवळ उदार किंवा पोट भरणे नाही . माणसाच्या मेंदूला, बुद्धीला . सुद्धा खाद्य लागते व ते जरुरी आहे . ह्या २ गाष्टी संस्काराने जो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तोच.  खरा माणूस . 
 केवळ फक्त २ हात २ पाय . २ डोळे . असणे किंवा बढाई मरावाची तर . मेंदू असणे म्हणजे माणूस नाही . 
माणसाचे चांगुलपण. त्याच्या चारित्र्यात असते . माणसाचे चरित्र त्याला जन्मतः मिळत नसते . आई वडिलांचे संस्कार शैक्षणिक जीवन. समाज आणि  जगण्याची परिस्थिती . यातून माणसाचे चरित्र घडते . उच्च शिक्षण . किंवा खंडणी नावलौकिक म्हणजेच चरित्र नव्हे .चरित्र ही बाह्यतः दिसणारी चीज नाही . ती जाणवणारी - जाणून घेण्याची गोष्ट आहे . केवळ खोटे न बोलणे . आणि चोरी न करणे म्हणजे हि चारित्र नाही. कारण बहुतेक माणसे ह्या गोष्टी उघडकीला आल्या तर बदनामी होईल . किंवा कायद्याने शिक्षा होईल . ह्या न भीतीने त्या करत नसतात . आणि जिथे भीती . तिथे चारित्र्य नाही . खोटे न बोलणे आणि चोरी न करणे हे सतगुण आहेत युगात दुमत होऊ शकत नाही . पण ह्या गोष्टीपासून स्वेच्छेने दूर रहाणे . वेगळे आणी लोकलज्जेच्या भीतीने त्या न करणे वेगळं , चारित्र्य हा एक वृक्ष आहे . त्याचे रोप बालपणापासून लावावे .तेव्हा कुठे १०/१५ वर्षाने त्याचा वृक्ष बनतो . डिग्री  मिळवण्यासाठी १५ वर्ष शिक्षण घावे लागते . चारित्र्याची डिग्री मिळवण्यासाठी आहारापासून आचरणापर्यंत अनेक गोष्टी लागतात , पण  आहार हि वस्तुस्थिती आहे . माणसाच्या जडण व घडणीतसुद्धा आहार महत्वाचा आहे . व्यक्तिमत्व आणि चारित्र्य ह्यांचे जवळचे नाते बघता दोघांच्या निर्मितीत आहाराचा सहभाग असणे ओघाने आलेच , ताजा .स्वच्छ .सात्विक आहार ह्या दोन्हींच्या उत्पत्तीत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतो . 

           आपल्या पूर्वजांच्या आणि अनेक आहारतज्ञांचा मते सात्विक आहार म्हणजे शाकाहारी आहार . त्यात तेल .मसाले .हि प्रमाणाबाहेर नास्न्हे अपेक्षित आहे . शरीर स्वच्छ आणि हलके ठेवण्यासाठीच तर सात्विक आहाराचीच  गरज आहे . शिवाय मन हलके ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते . कोणत्याही कारणाने मनात खळबळ असेल तर . ती अशांती अन्न  पचनावर व झोपेववाईट परिणाम करते . म्हणूनच डॉक्टर .आहारतज्ज्ञ आणि मानसतज्ञ सांगतात कि रात्रीच्या जेवणानंतर झोपी जाण्याच्या मधल्या काळात मनाला अस्वस्थ करणारे विचार करू नयेत . टी.व्ही. वरचे प्रक्षोभक अथवा भीतीदायक कार्यक्रम बघू नयेत . किंवा त्या प्रकारचे वाचन करू नयेत , कुटुंबियांशी वाद विवाद भांडणे करू नयेत . आहारात तिखट तेलकट- मसालेदार  पदार्थ असतील तर आणि ताशा जेवणानंतर वरील प्रकारचे वाचन केले किंवा  टी.व्ही.  प्रक्षेपण पाहिले तर पचनाचे आणखी तीव्र दुष्परिणाम होतात. मन अस्वस्थ करणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिवसभर घडत असतात . हिंसा हि त्याच्यापैकि एक . माणूस मांसाहार करतो तेव्हा विशिष्ट प्राण्याचे फक्त मास खात नसतो . तो त्या प्राण्याचा भावना . आकांशा . आयामुळे राग आणि णि ऊर्जा ह्यांचेही भक्षण करीत असतो . माणसाच्या मांसाहारासाठी त्या प्राण्याचा जीव घेतला जातो . तेव्हा भीतीपोटी त्या प्राण्याची होणारी तडफड .त्याची वेदना . त्याच्या शरीरात पसरते . आणि ते शरीर खाणाऱ्याच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो . मासांहारमुळे मनात हिंसक विचार उसळतात . आणि ते काबूत आणता येत नाहीत. मांसाहारामुळे मानवी संवेदना थिजतात आणि इतर माणसाच्या भाव-भावनांचा विचार मनात येत नाही . कुणाच्या वेदनेने . दुःखाने मन हालत नाही . मांसाहारामुळे तमोगुण . म्हणजेच तामसपणा वाढतो . राग आणि चिडचिड ह्यांच्याबरोबर आळस . जडपणा . निराशा . व गुन्हेगारी वृत्ती हे दुर्गुण उसळतात . 

   मांसाहार हि प्रत्यक्ष हत्त्या  नसते. मांसाहार कारण्याऱ्याने ती केलेली नसते . तरीही मांसाहार करणे हि अप्रत्यक्ष हत्याच ठरते . मांसाहार करणाऱ्याना हे माहित नसते पुष्कळदा ते सवयीने मांसाहार करीत असतात . म्हणजेच त्यांच्या घरी अस अन्न शिजत असते. आणि हे लहानपणापासून ते खात असतात . साहजिक हे खाणे बरे कि वाईट ह्याचा विचार न करता खाल्ले जाते. त्याची सवय होऊन जाते .              
अशा माणसांना प्राण्यांचे प्रेम नसते असेही नाही . ते एखादा कुत्रा व मांजर पाळून असतात . व त्यापलीकडे ते प्राण्यावर प्रेमही करतात . त्यांच्यापैके अनेक जण समाज आली कि मांसाहार सोडून देखील देतात . कोणतीही `गोष्ट का कार्याची नाही हे कळले तर अनेकजण तो सोडून देतील   मांसाहाराच्या शक्ती वाढते . मांसाहारात अनेक जीवनसत्व असतात . लढाईवर जाणाऱ्यांना आणि मैदानी खेळ  खेळणाऱ्याना ऊर्जेसाठी मांसाहार आवश्यक आहे  . वगैरे. वगैरे   बरेच काही सांगितले जाते . पण त्यात मुळीच तथ्य नाही , 

  मांसाहारातील  उपयुक्त  जीवनसत्व शाकाहारात सुद्धा आहेत . भारतासारख्या देशात विपुल वनस्पती . व भाज्या पिकतात .त्यांच्यात वैविध्यही मुबलक आहे. भारतीय आहारामुळे डाएट ची आवश्यकताही राहिलेली नाही. मनुष्यच काय .चार पायाचे प्राणीदेखील शाकाहारावर उत्तम वाढतात . ह्या उपरही ज्यांना मांसाहार प्रिय आहे त्यांनी तो करावा ; पण मांसाहारात अधिक जीवनसत्व असतात . किंवा मांसाहारात मर्दुमकी आहे . ते क्षत्रियांचे खाणे आहे . मांसाहाराच्या बुद्धी वाढते . वगैरे. वगैरे हैस्यास्पद बकवास करू नये . 

  जे आवडते ते करायला कारण लागत नाही . आपले मन आपली सद्सद्विवेकबुद्धी जे करायला अडवत नाही ते माणसाने खुशाल करावे ..    
  ब्रिटन व अमेरिका इथे आज अनेक लोकं ठरवून शाकाहाराकडे वळले आहेत . - काही जण निरोगी जीवनासाठी . काही मनःशांतीसाठी , काही प्राणीप्रेमासाठी , तर काही दीर्घायुष्यासाठी . आणि काहीजण शाकाहारात वैविध्यपूर्ण लज्जतदार घटकासाठी .  

चांगला आहार माणसातल्या चांगल्या प्रवृत्ती जाग्या करतो . त्यांच्या कडून चांगले काम करवून घेतो  














No comments:

Post a Comment