असले तरी बुद्धिमान मानव
निसर्गावर मात करू शकत नाही .तात्पर्य आजही मानव निसर्ग प्रकोपापासून आपल्या बुद्धिमत्तेनुसार
फक्त बचाव करू शकतो. निसर्गावर मात करू शकत नाही का ?हा १
फार मोठा प्रश्न आहे, कारण निसर्गाचे समतोल
बिघडले तर -महापूर .सुनामी .भूकंप . भीषण आग . युद्धे .दंगली .अतिवृष्टी .-ह्या
सर्वामध्ये बरीच मानव व निसर्ग संपत्ती नष्ट होत असते ,हा व अनेक प्रकोपातून मानव
नष्ट होऊ शकेल परंतु कालांतराने निसर्ग परत बहरू शकेल पण मानव ह्या प्रकोपातून
वाचू शकत नाही . ह्यात मानवाचे निसर्गबद्धल प्रेम वाढत्या आधुनिकीकरणात कमी होत
आहे .त्याचा परिणाम मानवालाच भोगावा लागतो तो म्हणजे वाढते प्रदूषण. जंगले नष्ट
करून अनेक मजली इमारतीची वाढ . झाडे तोडणे .ह्यामुळे नैसर्गिक संपत्तीबरोबर मानवी
संपत्ती नष्ट होत आहे. ह्यामध्ये -मानव जसे निसर्गाशी वागेल तसे बरोबर
त्याचप्रमाणे निसर्गही मानवाशी वागेल . निसर्गाशी एकरूपतेने व प्रेमाने मैत्त्री
केली तर ह्या निसर्गाची प्राणशक्ती हीं मानवाच्या विचारांशी सकारात्मकतेने बदलत
असते,
निसर्ग व्यवस्थापन -मानवी
योग्य नियोजन केले तर निसर्गाच्या मदतीने योग्य नैसर्गिक वातावरणात त्या त्या
मौसमातील वातावरणानुसार शेती व पिके भाजीपाला अन्नधान्ये मानव पिकवू शकतो .
कोणत्या मौसमात कोणता आहार मानवाला उपयुक्त आहे ह्याचे मार्गदर्शन निसर्ग आपल्या
प्रकृतीनुसार करत असतो .
त्याचा सखोल अभ्यास मानवाने
करणे आवश्यक आहे . कारण सर्वात महत्वाचे म्हणजे मानव हा निसर्गाच्या मातीत जन्माला
येतो व शेवटी निसर्गाच्या मातीत मिसळून जातो हे एक जागतिक सत्य आहे ते नाकारून
चालणार नाही. ह्यासाठी शाकाहारी निसर्गाने मिळणारा आहार मानवी जीवनासाठी
आरोग्यपूर्ण आहे.
निसर्ग शाकाहारी आहाराने वाढता वाढता .निसर्ग आपण आजारी पडलो
तर आपल्या आयुर्वेदिक तंत्राद्वारे आरोग्यपूर्ण करू शकतो .कारण मानव आजारी पडला तर
त्याच्या औषधाची जरुरी निसर्गतःच मिळते कारण निसर्गात जंगल डोंगर ह्यामध्ये अनेक
औषधी वेगवेगळ्या आजारासाठी मिळणारी जडी बुटी काढा .झाडांची औषधी रसायने
आयुर्वेदाद्वारे निसर्गतःच मिळतात . निसर्गात मिळणारी वेगवेगळी फळे त्या त्या
मोसमात आपल्याला तंदुरुस्त करतात .वेगवेगळ्या भाज्या पालेभाज्यांमध्ये अमूल्य असे
व्हिटॅमिन्स मिनरल आपल्याला मिळतात. म्हणजे निसर्ग आपल्याला जन्मास घालून अप्रतयक्षपणे आपले भरणं पोषण करीत असतो. ह्याची जाणीव प्रत्येंकाने ठेवली पाहिजे .
No comments:
Post a Comment