Sunday, 21 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -11।।

                                                             || निसर्ग संपत्ती योगदान -11।।
  
                     आहाराचे मानसशास्त्र -
बरेच लोकं ३/४ कारणांसाठी सतत खात असतात त्यातील प्रकार -
१) फक्त खाण्यासाठी जगणे - मनुष्याला केवळ जिभेला चविष्ठ व खमंग लागते म्हणून खाणारे लोक त्यामध्ये आपल्याला उद्या मिळेल कि नाही ह्या शंकेने आजच सतत खाणे ह्याला विकृती म्हणतात . 
२) फक्त जगण्यासाठी खाणे-आपला आहार घेताना आपले शरीर . मन आरोग्य .व उद्याच्या आहाराचा विचार करून खाणारे लोकं . फक्त ईश्वरावर उद्याचा भरवसा ठेवून खाणारे लोकं , कमी व शरीरास किमान आधार मिळेल म्हणून भविष्यातील आहाराचा विचार करणारे लोकं . त्याचप्रमाणे आपल्याबरोबर ईतर सर्व माणसांना खायला मिळते कि नाही ?ह्यांचा विचार करणारे लोकं ह्यामध्ये मिळतात ,
शाकाहारी मानवास   केव्हा खावे ? कोणत्या वेळी  खावे ? व कोणत्या मौसमात ? ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार किती खावे ? हे त्यांच्या वंशपरंपरानुसार संपूर्ण माहित असते. तर निसर्गातील बदलत्या परंपरेनुसार मानव निसर्गाशी समरसतेने एकरूप झाला तर त्याची काळजी व पालकत्व निसर्गच घेत असतो .. त्यामुळे निसर्गातील बदलास शाकाहारी मनुष्याचे शरीर बरोबर संतुलित होते व निसर्गानुसार बदलण्याचे निर्णय घेते .  

उदाहरणादाखल -१)निसर्गातील बदलांचा जीव .प्राणी ह्यांना अंदाज असतो त्यांना निसर्गतः सहावे इंद्रिय प्राप्त आहे .भूकंपाची जाणीव अगोदर सुक्षम कंपनीद्वारे उंदीर व ईतर प्राण्यांना मिळते . दुसरे उदाहरण म्हणजे साधारणतः उन्हाळ्याच्या गरम मौसमात सर्व मनुष्याची भूक मंद होते कारण बाहेरील उष्णतामान हे मानवाच्या शरीरांतर्गत उष्णतेपेक्षा जास्त असते हे शरीर तापमान बाहेरील तापमानाशी मिळवून घेता यावे म्हणून मानवी आहार कमी प्रमाणात घेतला जातो . म्हणून मानवाने घेतलेल्या नैसर्गिक शाकाहार घेतल्यामुळे किंवा त्या आहाराच्या नित्य सवय ह्यामुळे शाकाहारी व्यक्तीची शरीररचना घडते . थंडीत गार तापमानात आहाराद्वारे उष्णता मिळवण्यासाठी मनुष्याला भूक जास्त लागते . जास्त आहारामुळे उष्णता शरीराला थंड वातावरणातही मिळत असते . शाकाहारी व्यक्ती व निसर्ग एकमेकाला अप्रत्यक्षपणे सांभाळून घेतात . 

त्याप्रमाणे हिवाळ्यात  संत्री हिरवे मटार .मौसंबी सफरचंद पपई फळे खातात उन्हाळ्यात आंबा द्राक्ष खातात . 
पावसाळी मौसमात जांभळे .पालेभाज्या खाल्या जातात .  


No comments:

Post a Comment