Friday, 19 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -5।।

                                                    || निसर्ग संपत्ती योगदान -5।।

३) आपल्याला भूक लागली नसताना बळेच इतरांच्या भुकेचा  विचार न करता अन्न खाणे हि  मानवाची ---... राक्षसी  विकृती     ह्याप्रमाणे काळानुसार मानव हा बराच साक्षर झालेला आहे -केवळ सतत शाकाहारी सात्विक आहार घेऊन तो दुसऱ्या मानवाच्या आहाराचाही विचार करीत असतो . महत्वाचे म्हणजे फक्त आपणच जगण्यासाठी जगणे हा आहाराचा  विचार व हेतू न ठेवता आपणही आनंदाने जगू व इतर  मानवालाही आनंदाने जगू देऊ . ह्या उदात्त विचार सरणीच्या तत्वाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे .हि मानवाची वैचारिक विश्व बंधुत्वं निश्चितपणे निसर्गाच्या आध्यात्माकडे जाण्याची सुंदर सुरवात आहे . त्यामुळे आहार आचार विचार संस्कृतीत वाढ होत आहे ही नैसर्गिक सकारात्मकता नाही काय ?..  
सुरुवातीला दिलेल्या ३ मुद्यांबरोबर आता ४ बाब सध्या पुढे येत आहे ती म्हणजे -:
४) मला रोज शरीराला किती आहार लागतो त्या प्रमाणे आहाराचे व त्याला लागणाऱ्या आर्थिक खर्चाचे नियोजन केले जात आहे .   ह्याचा विचार करून इतर मानव जातीसाठी सुद्धा आहार मिळाला पाहिजे ह्या सर्वव्यापक भावनेतून मित आहार हा विचार पुढे येत आहे .ह्यामुळे सर्व मानवाचे आहार व आहार खर्चाचे आर्थिक नियोजन होत आहे . 

   आहाराबाबत सध्याला उदाहरण घ्यावयाचे म्हणजे भारत हा जगात सर्वात मोठी लोकसंख्या असणारा २  नंबरचा देश आहे .

        ह्या मोठ्या लोकसंखेचा आहार फक्त नैसर्गिक साधनांमुळे मिळणार शाकाहारच देऊ शकतो . कारण भारतात नैसर्गिक साधनसामुग्री मोठ्या प्रमाणावर सध्या उपलब्ध आहे . परंतु शेतीचे योग्य नियोजन वातावरणाचा तांत्रिक अभ्यास मोठा प्रमाणावर नाही त्यामुळे भारतात उपासमारी. कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे.
 २) उपलबध साधन सामुग्रीचे वेळच्यावेळी वितरण होत नाही त्यामुळे गरिबी. उपासमार. देशात दिसत आहे त्यामध्ये सुद्धा भारतात जात भेद .राजकारण . गैर आर्थिक नियोजन . भाषा प्रांतवाद .असल्यामुळे लोकसंख्येच्या मानाने सर्वाना योग्य आहार पुरेसा मिळत नाही. योग्य नियोजन केल्यास कमी आर्थिक खर्चात आपली उपजीविका माणूस करू शकतो . शाकाहारामध्ये मिळणाऱ्या धान्य .भाजीपाला .फळे . सर्वात जास्त प्रथिने व मानवी शरीरास मिळणार व्हिटॅमिन्स मिनरल कमी किमतीत मिळू शकतात . 


भारतात शाकाहारी आहारासाठी लागणारी शेतजमीन फक्त भारतात आहे . भारतीय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ असे म्हणतात की -योग्य शेती व निसर्गापासून व जमिनीअंतर्गत पाण्याचा योग्य वापर केला तर भारत हा देश जगातील ६० % मानवाला  धान्य .भाजीपाला .फळे. पुरवू शकतो .  

No comments:

Post a Comment