।। निसर्ग संपत्ती योगदान -९ ।।
१) वस्तुतः सर्व दृष्टीने
भारताचा व्हेज फूड चा अभ्यास केला तर असे हि दिसून येते की -निसर्गातील बदलामुळे व
इतर मानवी दुर्लक्षितेमुळे नाशिवंत असणारे शाकाहारी अन्न हायजिनिक तत्वानुसार ह्या
अन्नाचा योग्य तापमानात साठा (स्टोरेज) व त्याच्या योग्य मागणीनुसार योग्य आवश्यक
ठिकाणी वाटप (वितरण) ह्या सर्वांचे व्यवस्थापन योग्य नाही . त्यामुळे मोठया
प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व मानवी श्रमाबरोबर त्या व्हेज फूड चे हि नुकसान
होते .
गुरुत्वाकर्षण कळाले . म्हणजे सर नवाटांचा शोध
लागण्यापूर्वी हि बरेच कोट्यवधी वर्षे गुरुत्वाकर्षण होतेच .
आज विकसित देशातील अंतराळ
संस्था शोधलेल्या परग्रहांवर तेथील वातावरणानुसार ऑक्सिजन व शेतीसाठी पिके घेता
येतात का ह्यांचा शोध घेत आहे . आधुनिक विचारानुसार मानव हा निसर्ग. भौतिक ज्ञान . मानवी आहार ह्यापलीकडे
अज्ञात सृष्टी आहे का ? हे शोधण्याचा प्रयत्न करीत
आहे ते अवकाशात असो व समुद्रतळाशी असो . परग्रहांवर जीव सृष्टी असेल तर त्या
वातावरणाचा अभ्यास व संशोधन करून तेथील मातीचे नमुने.रासायनिक घटक . शेतीसाठी
कुठल्या वातावरणात पृथ्वीवर पोषक वातावरण शक्य आहे त्यानुसार प्रयोग
करून आपल्या देशातील मातीवर प्रयोग करून वेगवेगळे नवीन पिके .धान्य .भाजीपाला व
फळे .घेता येतील असा सध्या शास्त्रज्ञांना पूर्ण विश्वास आहे.
व्हेज फूड व मानवी जीवन हे
एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत .चांगले राहणीमान . व चांगला आहार हा फक्त वेग फूडचा
जीवनप्रकार आहे . भारतामध्ये मानवी आहाराची गरज लक्षात घेऊन मोठं मोठ्या कंपन्या
सध्या एफ. एम. सी जी . प्रॉडक्ट्स म्हणून प्रसिद्ध असून यशस्वी रित्या पुढे वाटचाल
करीत आहेत . आजच्या काळात सन २०१७ मध्ये किरकोळ अनपॅक लूज फूड साठी जि . एस .टी .टॅक्स नाही . व इतर पॅक फूड साठी ज्यांना
टॅक्स आहे त्यांना कमी जि . एस .टी .टॅक्स लावला
आहे . ह्या टॅक्स लावण्याच्या मागे मानवतेचा दृष्टिकोन आहे . जेणेकरून खाद्य
पदार्थ गोरगरीब लोकांना सहज घेणे परवडेल. हि भूमिका आहे . कारण भारतात अजूनही
उपासमार व गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे . भारतीय तत्वज्ञांनुसार अन्न हे
परब्रम्ह असे म्हंटलेले आहे . म्हणजे अन्न व आहार हा फक्त माणसाचे पोट भरण्यासाठी
नसून मानवाचे आहारामुळे आचार .विचार .व संस्कृती चांगल्या प्रकारे वाढावी . आम्ही
जे अन्न फूड खातो व पोट भरतो ते फूड . अन्न हे आमच्या कष्टाचे व इमानदारीने आहे .
व देशातील कुठलाही मानव उपाशी राहू नये असा उदात्तविचार व त्यामागे भारतीय सरकारी
धोरण आहे . मूलतः भारतामध्ये 'जगा व सर्वाना जगू द्या ' स्वतः सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू
जगवा . हा मानवतेचा संदेश भारतातील सर्व धर्मा मध्ये सांगितला आहे . त्यामुळे भारत
हा देश संपूर्ण जगामध्ये निधर्मी राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात विविध
धर्मामध्ये त्या त्या धर्मानुसार सण व उत्सवाच्या निमित्ताने .जेवणावळी .अन्नदान
.महाप्रसाद हे सर्व गरीब व सर्व थरातील लोकांना दिले जाते . काही धर्म संस्थेत अन्नदान हे गरिबांना रोज दिले जाते.
No comments:
Post a Comment