Wednesday, 24 January 2018

।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

                                                   ।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

 मनुष्याच्या स्थूलतेला रोखणारा शाकाहारी आहार -:

          ब्रेकफास्ट - दररोज सकाळी उठल्यावर १/किंवा २ ग्लास शुद्ध  कोमट पाणी प्यावे , त्यामुळे शरीरातील टॉक्ससिन्स बाहेर टाकले जातात . त्यामुळे पचन क्रिया स्लो होऊन वजन वाढू लागते . 
   
सकाळी दूध दही पनीर ओट्स डायफ्रूट हे पदार्थ नसतील तर पचनक्रिया मंदावते त्यामुळे वजन वाढते . सकाळी लवकर ब्रेकफास्ट केला नाही तर- चयापचया किया मंदावते . त्यामुळे शरीरावरील  जादा चरबी योग्य प्रकारे बर्न होऊ शकत नाही .  परिणामी वजन वाढते . काही खाद्य पदार्थामध्ये भरपूर फायबर असते .त्यामुळे सकाळी फायबर युक्त अन्न खावे . 

 निसर्ग आध्यात्म्याच्या प्रमाणे निकोप आरोग्यासाठी -निसर्गात होणाऱ्या बदलानुसार काय खावे हे जर मानव निसर्गाशी इमान राखून एकरूप झाला तर त्याचे पालकत्व व काळजी निसर्ग घेतो . निसर्गात होणाऱ्या बदलानुसार मानव निसर्गाशी एकरूप झाल्याने मनुष्याचे शरीर त्वरित प्राप्त नैसर्गिक परिस्थितीत जुळवून घेते. उदाहरणार्थ -शाकाहारी माणसाला उन्हाळ्यात भूक कमी प्रमाणात होते . कारण बाहेरील कडक उष्णतामान  व मानवाच्या शरीरातील ऊर्जेचे उष्णतामान ह्यांच्या प्रमाणाशी समतोल राखून आपोआप मानव कमी आहार घेतो . म्हणजे शाकाहारी नैसर्गिक आहारापासून शरीरा अंतर्गत व बाह्य  शरीररचना घडते . 

       हिवाळ्यामुळे थंड वातावरणात मनुष्यास भूक मोठ्या प्रमाणावर लागते कारण शरीराला पचनासाठी लागणारी उष्णता ऊर्जेसाठी  व्हेज खाद्य रूपाने मिळते . त्यामुळे शरीर चालवण्यासाठी तू जास्त आहार घे असे निसर्गच अप्रत्यक्षपणे सांगतो . त्यामुळे थंडीचा त्रास होणार नाही. 

           सर्वात महत्वाची बाब म्हणजे निसर्गात जे बदल झपाट्याने होतात तितक्या प्रमाणात मानवाची शरीररचना बदलत नाही म्हणजे.  निसर्ग ज्या वेगात  मध्ये बदलतो त्यावेगाशी आपल्या शरीररचना बदलणे मानवाला जुळवून घ्यावे लागते . उदाहरणार्थ -भारतात ३ मौसम  असतात १) उन्हाळा २)पावसाळा ३)हिवाळा 
ह्याप्रमाणे ऋतू असतात , पण जेव्हा भारतात उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा निसर्गात झपाट्यात बदल होतो त्याप्रमाणे भारतात मानव आपल्या शरीरात बदल करू शकत नाही. त्यामुळे वातावरणात जे व्हायरस वाढतात त्यामुळे शाररिक नाजूक भागावर जलद इन्फेकशन होत असते . त्यामुळे खूप लोकं लगेच आजारी पडतात त्यांचे आरोग्य बिघडते . असे अगदी प्रत्येंक ऋतू बदलताना होत असते . त्यामुळे प्रत्येंक ऋतू बदलानंतर दवाखान्यात आजारी म्हणून माणसाची गर्दी असते . 

                       निसर्गातील बदल व निसर्गाचे स्वरूप मानवामध्ये सामावून घेण्यासाठी मानवाच्या -आचार विचार आहार . ह्यामध्ये सतत बदल करावं लागतो . शरीर प्रकृतीसाठी योग साधना .व शाररिक व्यायाम प्राणायाम . आसने .-आहारासाठी - नैसर्गिक व्हेज आहार . व त्याचे शास्त्र शुध्द नियोजन . विचारासाठी सामाजिक जाणीव .संस्कृतीचे व मानवी आदर्श कामाची विचारसरणी . आरोग्यासाठी निसर्गतःच मिळणारे आयुर्वेदाचा नैसर्गिक औषध उपचार जडी .बुटी. औषधी पानांचे कडवट रस .ह्यांचा वापर केला तर मानवी आरोग्य व मानवी आयुष्य दीर्घायुषी होऊ शकेल. 
                                     




No comments:

Post a Comment