Wednesday, 7 February 2018

आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या -2

                                आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या  -2

दुधी भोपळा : औषधी गुणांचा खजिना  

काही भाज्या निसर्गाकडून भेट म्हणून मिळालेल्या आहेत . दुधी भोपळा सर्व भाज्यांच्या दृष्टीने अगदी स्वस्त आहे . हि वेलवर्गीय वनस्पती थोड्या कालावधीत मोठी होते . लांब आणि गोल असे दोन्ही भोपळे . वीर्यवर्धक . पित्त. व कफनाशक आहेत . धातू पुष्ट करणारा भोपळा समजला जातो. कच्चा दुधीभोपळा किंवा त्याचा रस दोन्ही शरीरासाठी वरदान समजले जातात . त्यामुळे पोट साफ होते . शरीर शुद्ध आणि निरोगी रहाते . भोपळ्याचा वापर अशक्तपणा नाहीसा करण्यासाठी .गॅसेस . कावीळ . उच्च रक्तदाब . हृदयरोग . मधुमेह . आतडे आणि यकृतास सूज . शरीरात जळजळ . मानसिक उतेजना . पक्षाघात. संधिवात . स्नायू चे आजार . यामध्ये करावा . 

     वाग्भटांनी भोपळ्याला टरबूज ,कलिंगड . काकडीच्या परिवारात ठेवलेले आहे . वायू आणि कफनाशक म्हणून दुधी भोपळ्याचा वापर केला जातो . 

औषधी गुण -: २५ मिली. दुधीभोपळ्याच्या रसात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून हळू हळू प्या . त्यामुळे लघवी                             भरपूर प्रमाणात होते . 
                       खोकला  . क्षयरोग . छातीत जळजळ ह्यामध्ये दुधी भोपळा  गुणकारी ठरतो . 
                        हृद्य रुग्णांनी जेवणानंतर एक कप दुधीभोपळ्याच्या रसात काळे मिरे आणि पुदिना मिसळून 
                        पिण्याने काही दिवसातच हृद्य रोग बरा  होतो. 
                        जुना ताप किंवा कफ तयार होत असल्यास दुधी भोपळ्याचे सेवन अवश्य करावे . 
                        दुधीभोपळ्यांच्या बियांचे तेल कोलेस्ट्रॉल कमी करते . हृदयाला शक्ती देते . रक्तवाहिन्यांनाही                          निरोगी बनविते , 

लाल भोपळा मधुमेहींसाठी गोड़ खाण्याचा चांगला आरोग्यदायी पर्याय . 

लाल भोपळा खाल्ल्याने थकवा कमी होतो . व्यायामा दरम्यान  जाणवणारा थकवा कमी करण्यास लाल भोपळा मदत करतो . भोपळ्यामुळे रक्तातील लॅक्टिक ऍसिड आणि अमोनिया घटक कमी होण्यास मदत होते . भोपळा मधुमेहांसाठी गुणकारी असतो . कारण चवीला गोड  असला तरी  लाल भोपळा शरीरात साखरेचे प्रमाण वाढवत नाही . त्यामुळे मधुमेहींसाठी हा चांगला पर्याय आहे . 

लाल भोपळ्यात भरपूर पाणी असते त्यामुळे भोपळा खाल्याने तुम्ही हायड्रेटेड रहाण्यासोबत रेफ्रेशही रहातात . लाल भोपळा हा चविष्ट आणि आरोग्यदायी आहे . त्यामुळे पचनक्रिया चांगली रहाते . वाटीभर वाफवलेल्या भोपळ्यातून ११ % फायबर मिळते त्यामुळे भोपळा खाल्याने पचनक्रिया चांगली रहाते . 

  तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लालभोपळ्यातून  ऐ, व्हिटॅमिन मिळते तसेच ह्यातून बिटा कॅरोटीन मिळते , ह्यामुळे मोतीबिंदू आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या कमजोर होणाऱ्या स्नायूची कमतरता पूर्ण होते. लाल भोपळ्यामुळे वजन नियंत्रणात रहाते . ह्यात अधिक प्रमाणात कॅलरीज  असून सोबत फायबर हि आहे . त्यामुळे शरीरात फॅट्स न वाढू देता भुकेवरही नियंत्रण मिळते . त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते . त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते . लाल भोपळ्यामधे व्हिटॅमिन्स  ए . इ . सि . ह्यासोबतच आयर्न चा मुबलक साठा असतो . चांगलय रोग प्रतिकार शक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी असते. लाल भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकामुळे दाह कमी होण्यास मदत होते ..    








   

   

No comments:

Post a Comment