Monday, 5 February 2018

।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-1

                                              ।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-1

रुणांसाठी गाईचे दूध योग्य मानले जाते . गाईच्या दुधात ७८/१० कागदी लिंबाचा रस मिसळून लगेच पिण्याने नैराश्यापासून मुक्तता मिळते . 

            भारतीय आहारात दुधाला एक पूर्णान्न म्हणून उल्लेख केलेला आढळतो . भारतात लहानपणी दुधाचे  सेवन न केलेली व्यक्ती अभावाने आढळेल . दुधामध्ये असे अनेक घटक आढळतात . जे वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी सहायक ठरतात . गाईच्या दुधात अ . ब.  क . ड . इ . जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळतात . ते साहस पचण्यासारखे असते . ते शरीराचे पोषण करून कमजोरी दूर ठेवण्याचे काम करते . 

            रुग्णानासाठी गाईचे दूध योग्य मानले जाते . गाईचे दूध मधाबरोबर सेवन करण्याने शक्ती व बुद्धीही वाढते . दूध नेहेमी उकळून कोमट करून मगच प्यावे . दूध जास्त उकळल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात . दूध पिताना त्यावर आलेली साय  काढून टाकावयास हवी . कारण ती पचण्यास जड . शीतल . तुप्तीकारक . स्निग्ध . पुष्टीदायक . धातू वर्धक व  कफकारक  असते .

    दूध रात्री पिणे योग्य . रात्री दुधाचे सेवन करणे बुद्धिप्रद क्षय नाशक . अनेक आजारामध्ये लाभदायक असते . दूध नेहेमी घोट घोट प्यावे , दूध प्याल्यानंतर त्वरित दही किंवा आंबट पदार्थांचे सेवन करू नये . 

       म्हशीच्या दुधात ब. क . ड ,इ . जीवनसत्व असते . ते बलवर्धक असते . शरीराला पुष्टी देते . गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीचे दूध अधिक स्निग्ध . व पचण्यास जड असते . तर बकरीचे दूध हलके व पचण्यास सुलभ असते . अतिसार .खोकला . ताप .क्षय . रक्तपित्त दूर करण्यास सहायक ठरते .  ह्या दुधाचे सेवन डोळ्यासाठीही उत्तम समजले जाते . 
   


No comments:

Post a Comment