Tuesday, 6 February 2018

।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-3

                                                     ।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-3


शक्ती आणि आरोग्यासाठी दूध प्यावयास हवे असे जगाच्या बहुकेक भागात मानले जाते . त्यामुळे दुधासाठी गुरांचे पालन हा एक फार मोठा व्यवसाय आहे . ह्या दुधापासून नाना प्रकारचे पदार्थ चीज . योगर्ट . कोंडेन्सड मिल्क . वगैरे बनवून मिठाई मध्ये वापरले जातात . 

     माणूस हा एकच प्राणी असा आहे कि जो आईचे दूध पितो. आणि त्याच बरोबर गाई .म्हशींचे . उंटिणीचे . याकचे . आणि इतर काही प्राण्यांचे हि दूध पितो . माणसाने हि इतर प्राण्यांचे दूध पिण्याचे सवय त्याने पाळलेल्या प्राण्यांनाही लावली आहे . उदा. -कुत्री .मांजर ,वानर . 

उंटिणीचे दूध भविष्यातील सुपर फूड - असा दावाही काही भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे . गेल्या १०/१५ वर्षांपासून उंटाच्या पर्यायी उपुक्ततेबद्धल संशोधन सुरु आहे. ह्याचा  उद्धेश लोकांनी उंटेंनीच्या दुधाचा गाय म्हशीच्या दुधाप्रमाणे वापर करावा . हा आहे . त्यावेळी उंटिणीच्या दुधाचे आईस्क्रीम दाखवण्यात आले होते .. २००६ साली मध्ये युनाइटेड नेशन्स फूड अँड ऍग्रीकल्चर ऑरगॅनिझशनने उंटीणीच्या दुधाला उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन केले होते.. उंटीणीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा तीन पट सी व्हिटॅमिन्स असते . पूर्वी उंटीणीच्या दुधाचा वापर फक्त औषधे तयार करण्यासाठी होत असे . आता उंटीणीच्या दुधापासून चॉकलेट . केक . चिक्की .आणि डेझर्ट . हे खाद्यपदार्थ तयार करण्यात येत आहेत /

         २००८ साला मध्ये संयुक्त अरब अमिरातमधील दुबई येथील अल नास्मा कंपनीने असा दावा केला होता कि उंटीणीच्या दुधापासून  सर्वप्रथम ब्रँडेड चॉकलेट.आम्हीच तयार केले . आता हि कंपनी उंटीणीच्या दुधापासून विविध फ्लेव्हरचे चॉकलेट तयार करीत आहे . ह्या कंपनीची चॉकलेट्स २०१५ सालापासून लंडन मधील हैरोड्स मध्ये हि विकली जात आहे . 

अबुधाबी येथे उंटीणीच्या दुधापासून तयार केलेली सुगंधी कॉफी खूपच लोकप्रिय झाली . आणि तेथे खजुराचा केक तयार करताना उंटीणीच्या दुधाचा वापर केला होता . 

भारतात राजस्थान मधील N,R,C,C, मध्ये उंटीणीच्या दुधापासून  विविध प्रकारचे खाद्य पदार्थ करण्यात येत आहेत . थे`तेथे .चहा . कॉफी . चॉकलेट . चिक्की. केक. डेझर्ट . चीझ . साबण . इत्यादी तयार करण्यासाठी .बिकानेरी .मेवाडी . जैसलमेरी . आणि क्चशी . या ४ प्रजातीच्या  उंटीणीचे दूध वापरतात . 

  


No comments:

Post a Comment