Sunday, 11 February 2018

शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -2,

                                            शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -2


आरोग्यदायी औषधी गुणाचे अंजीर फळ -:  अंजीरातून शरीराला लोह. व्हिटॅमिन्स ए . बी . सि . बऱ्याच प्रमाणात मिळते . अंजीर क्याला थंड व पचायला जड असतात . त्यांच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते . तसेच पित्त विकार . रक्त विकार . व वात विकार, यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात . 
अपचन . एसिडिटी . गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ . संध्याकाळ . १ ती  २ अंजीर खावीत किंवा याचा रस घ्यावा . वरिल त्रासांपासून  आराम मिळेल . अंजीर खाल्याने बौद्धिक व शाररिक थकवा दूर होण्यास मदत होते . लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून ३/४/अंजीर नेहेमी खावीत . त्यामुळे मूत्र विकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजीराचा रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात . त्वचा विकार . त्वचेची आग होणे . व कांजण्या ह्या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत . दररोज कोणताही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते . 

   अंजीर खाल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्याने त्याचे पाणी होते . असे म्हणतात . अंजीर शक्तिवर्धक आहे . तसेच ते सारक हि आहे . म्हणजे ओली किंवा सुकी २ अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे . थोड्याच दिवसात तक्रार दूर होते . 

  अंजीर शीत वीर्याचे , शरीर तृप्त करणारे . मांसधातूला पोषक असते . अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच  . पण रस रक्तरधातूसाठी पोषक ठरते . संगणकावर काम करणार्यांनी  व सातत्याने उपवास करणार्यांनी , रात्रपाळी किंवा जागरणे करणार्यांनी अंजिराच्या ऋतूत मौसमात रोज १/२ अंजीर खावीत . पिकलेल्या अंजीराचा जॅमही रक्त वृद्धी करण्यास उत्तम असतो . 

आवळ्याच्या सेवनाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढून आजार दूर राहातात -:

जुन्या पद्धती -: आवळा  अत्यंत महत्वाचा आहे ,आवळा खोकला . सर्दी . व श्वसनप्रणालीतील इतर उपचारासाठीहि वापरला जातो . तो शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवतो . आवळ्यात संत्यापेक्षा २० पॅट जास्त व्हिटॅमिन   सी ' असते . सफर्चंटापेक्षा तिप्पट जास्त प्रोटीन व १६० पट जास्त अस्कर्बिक ऍसिड असते . खूपशी खनिजे व अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर असते . 

आल्याचा चहा ताप घालवतो . व नाक . घास . व फुफुसातील कफ हटवतो . जर सर्दी पडसे जास्त असेल तर २ चमचे ताजा आल्याचा रस २ कप पाण्यात टाकून ३० मिनिटे मंद जाळावर उकळा . दर २ तासानंतर ह्या गुणकारी चहाचा आनंद घ्या . सर्दी पडश्यात भाज्यांचे सूप खूपच फायदेशीर असते . त्यात काळी मिरी मिसळली तयार अनेक त्रासांपासून सुटका होईल . 

आधुनिक उपचार -:  खोकल्याचे सिरप घशाचा स्प्रे वा ओटीसि पेन  / कोल्ड औषादांचा वापर करावा . सोबत कोमट पाणी .व खरात पाण्याच्या गुळण्या करव्यात  बंद नाक मोकळे करण्यासाठी नोझल ड्रॉप्स वापरावे किंवा  बाम  मिसळलेल्या गरम पाण्याचा वाफारा घयावा . कॉफी . चहा . कोल्ड्रिंक्स . व दारू टाळावी ,

पारंपरिक उपचार व आधुनिक औषधें ह्यांचे योग्य संयोजन सर्दी अंडासे हटवू शकते . सर्दी पडसे व खोकला टाळण्यासाठी आपल्याकडे कोणतेही सटीक उपाय नाहीत . त्यामुळे हे रोग हटवण्यासाठी बहुविध योजना आखावयास  हवी त्यासाठी झिंक व आवळ्याचे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे . 









No comments:

Post a Comment