Friday, 9 February 2018

आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या पालेभाज्या -1

                                        आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या  पालेभाज्या -1


   थंडीच्या दिवसात पालेभाज्या मुबलक व स्वस्त प्रमाणात मिळतात जेव्हा भारतात पाऊस पडून गेल्यावर निसर्गातील हिरवे पण घेऊन हिरव्या पालेभाज्या बाजारात येतात . 

पाले भज्यामंध्ये भरपूर प्रमाणात  ए  जीवनसत्व आढळते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते . त्यापैके एक म्हणजे पालक .   पालक सलाड म्हणजे भाजी म्हणून किंवा सूप ह्या स्वरूपात तुम्ही सेवन करू शकतात . पालक खाण्यापूर्वी तो भरपूर पाण्यामध्ये स्वछ करणे आवश्यक आहे. 

पालकाचे सेवन कां करावे-। ?

पालकांमध्ये अनेक पोषक घटक असतात ह्यामध्ये असणारे कॅल्शिअव हरित घटक आपल्या हाडांना मजबूत करण्यास सहायक ठरतात .  पालकांमध्ये आढळणाऱ्या अ . क जीवनसत्वे .फायबर .फॉलीक ऍसिड . मॅग्नेशिअम . कर्करोगाशी लढण्यास सहायक ठरतात . विशेषतः कोलन . फुफुप्साचा . व स्टॅन कर्करोगांपासून वाचण्यासाठी पालकाचे सेवन अवश्य करावे . हृदयाशी संबंधित आजारापासून लढण्यासाठीही पालक मदत करतो . पालकाच्या नियमित सेवनाने दृढ व्यक्तीमधील अशक्तपणा व स्मरण शक्ती संबधी तक्रारी दूर होतात . 

पालकात असण्याऱ्या कॅलरी -:

पालक हि एक अशी भाजी आहे , जी वजन कमी करू पाहणारया व्यक्ती  अगदी निश्चितपणे  खाऊ शकतात .
कारण पालक मध्ये कॅलरी कमी आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात . पालकांमध्ये प्रथिनेही भरपूर प्रमाणात असतात . ह्याशिवाय  पालकमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड असते . 

पोषक घटकांचा खजाना -: 

  पालकात असणारे प्लवोनाईड्स अँटी ऑक्सिडंट्सचे काम करतात . ह्यामुळे रोगप्रतिकारक्षमता तर वाढतेच . 
शिवाय हृदयाशी संबधीत आजारांशी लढण्यापासून ताकद मिळते . म्हणून दररोज सलाड ह्या रूपात पालकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते ..  


     


No comments:

Post a Comment