Wednesday, 14 February 2018

किडनी निरोगी राहावी ह्यासाठी

                                                       किडनी निरोगी राहावी ह्यासाठी 

मनुष्याची किडनी निरोगी राहणे खूप गरजेचे आहे . विशेष आहाराने किडनीतील विषारी पदार्थे बाहेर पडतात  खाली दिलेल्या पदार्थाने किडनी स्टोन होण्याची शक्यता कामी होऊ शकते . 

जांभूळ-: ह्यामध्ये अँटी ओक्सडेन्ट असतात त्यामुळे किडनीतून युरिक ऍसिड बाहेर पडते . करवंद हे छोटे फळ सुद्धा उत्तम औषध मानले जाते . करवंदात युरिक ऍसिड आणि युरियाला शरीरातून बाहेर काढण्याची क्षमता आहे .

कोथिंबीर -:  किडनी  स्टोनच्या इलाजात कोथिंबीर खूप महत्वाची ठरते . किडनीच्या आजारावर औषधातही ह्याचा उपयोग केला जातो . तुम्ही आहारात  कोथिंबिरीचा समावेश करू शकता . 


आले-:   शरीराची स्वच्छता करण्यात आले महत्वाचे काम  करते . रक्ताच्या स्वच्छतेबरोबर किडनीतील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम आले करते . विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णाच्या किडनीचे संरक्षण करण्याचे काम आले करते. 

हळद-:   जर तुम्हाला किडनी स्वच्छ करायची असेल तर हळद खा . आहारात हळदीचा समावेश करून अथवा आल्याचा तुकडा खाऊन शरीराला आल्याचे फायदे मिळवून देऊ शकतो . हळदीत अँटिसेप्टिक गुण हि असतात 


दही -:  दह्यामध्ये चांगले बॅक्टरीया आढळतात . जे किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात . हे बॅक्टरीया किडनीतील घाण बाहेर काढतात आणि रोग प्रतिकारक शक्तीही मजबूत करतात . 


असे करू नका-:   किडनीमध्ये स्टोन असल्यास दूध किंवा दुग्धजन्य उत्पादनाचे सेवन कमी करा . लोणचे . चटणी . मास . मासे . चिकन . जंक फूड ह्यांचे सेवन करा . पालेभाज्या धुवून वापरा ... 


  



No comments:

Post a Comment