Wednesday, 14 February 2018

किडनी निरोगी राहावी ह्यासाठी

                                                       किडनी निरोगी राहावी ह्यासाठी 

मनुष्याची किडनी निरोगी राहणे खूप गरजेचे आहे . विशेष आहाराने किडनीतील विषारी पदार्थे बाहेर पडतात  खाली दिलेल्या पदार्थाने किडनी स्टोन होण्याची शक्यता कामी होऊ शकते . 

जांभूळ-: ह्यामध्ये अँटी ओक्सडेन्ट असतात त्यामुळे किडनीतून युरिक ऍसिड बाहेर पडते . करवंद हे छोटे फळ सुद्धा उत्तम औषध मानले जाते . करवंदात युरिक ऍसिड आणि युरियाला शरीरातून बाहेर काढण्याची क्षमता आहे .

कोथिंबीर -:  किडनी  स्टोनच्या इलाजात कोथिंबीर खूप महत्वाची ठरते . किडनीच्या आजारावर औषधातही ह्याचा उपयोग केला जातो . तुम्ही आहारात  कोथिंबिरीचा समावेश करू शकता . 


आले-:   शरीराची स्वच्छता करण्यात आले महत्वाचे काम  करते . रक्ताच्या स्वच्छतेबरोबर किडनीतील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम आले करते . विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णाच्या किडनीचे संरक्षण करण्याचे काम आले करते. 

हळद-:   जर तुम्हाला किडनी स्वच्छ करायची असेल तर हळद खा . आहारात हळदीचा समावेश करून अथवा आल्याचा तुकडा खाऊन शरीराला आल्याचे फायदे मिळवून देऊ शकतो . हळदीत अँटिसेप्टिक गुण हि असतात 


दही -:  दह्यामध्ये चांगले बॅक्टरीया आढळतात . जे किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात . हे बॅक्टरीया किडनीतील घाण बाहेर काढतात आणि रोग प्रतिकारक शक्तीही मजबूत करतात . 


असे करू नका-:   किडनीमध्ये स्टोन असल्यास दूध किंवा दुग्धजन्य उत्पादनाचे सेवन कमी करा . लोणचे . चटणी . मास . मासे . चिकन . जंक फूड ह्यांचे सेवन करा . पालेभाज्या धुवून वापरा ... 


  



Monday, 12 February 2018

फळांच्या सालींमधे असतात पोषक घटक -:

                                                फळांच्या सालींमधे असतात पोषक घटक -:


बटाटाचेची साले - : बटाटयापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त पोषक द्रवे असतात . साली काढल्याने त्याची पोषक द्रवये कमी होतात . त्यांच्या सालामध्ये कॅल्शिअम . व्हिटॅमिन बे. कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सी आणि आयर्न आदी असतात . ताण शिजवण्याआधी फक्त धुवावे लागते . बटाट्यास डीप फ्राय करू नका . तसे केल्याने त्यात अतिरिक्त कॅलरी जमा होते . त्यामुळे औरोग्यास नुकसान पोहचते . बटाटा नेहेमी फायबर युक्त भाज्यांबरोबर जसे बीन्स . सिमला मिरची. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांबरोबर शिजवावा . 

ब्रोकलीची पाने आणि वेत -:  ब्रोकोली शिजवताना आपणहवे तयार त्यावर चाट मसाला त्याची पाने आणि देठ फेकून देतो . तसे करू नका कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते . ब्रोकोलीबरोबर त्याची पाने आणि देठ ह्यांना कापून भाजी करा . हवे तर त्यास सूप मध्ये हि टाकू शकतात . तसेचबारिक करून घ्या व त्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकतात . 

टरबुजाची साल -:    टरबुजाची सालीला आपण कोणत्याच कामाचे मानत नाही . आणि नेहेमी फेकून देतो. पण त्यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे शरीरात रक्त संचार चांगला होतो . तारबुजांच्या सालीना दह्याबरोबर बारीक करून हि पेस्ट आपल्या डायट  मध्ये सामील करू शकता . 

डाळिंबाची साले-:   ज्या महिलांना पिरिएडच्या च्या दरम्यान जादा ब्लीडींग होते . त्यात डाळिंबाची साले सुकवून आणि त्याची पावडर रोज एक चमचा ख्याल हवी . त्यामुळे पिरिएडदरम्यान ब्लीडींग कमी होते . डाळिंबाचे साल तोंडात धरून शोषण्याने खोकल्याचा वेग कमी होतो . ह्या  व्यतिरिक्त डाळिंबाला बारीक कुटून त्यात दही मिसळून घट्ट पेस्ट मिसळून डोक्याला लावा , त्यामुळे केस मुलायम होतात . 

काकडीची साल -:   जर तुम्हाला काकडी पसंत असेल तर भरपूर पोषणासाठी काकडीची साल काढून खाऊ नका . काकडीच्या व्हिटॅमिन के ,अँटी ऑक्सिडेंट्स आणि पोटाशींउईम भरपूर मात्रेत असते . काकडीच्या शाळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते . जे अपचनापासून आराम देते . काकडीच्या कोशिंबेरीतही काकडीचे साल काढू नयेत . सालीसकट खावयास त्रास होत असेल तर त्याचे रायते बनवावेत . चवीत अंतर येणार नाहीत आणि काकडीचे साळी खाता येईल , दक्षिण भारतात विशेषतः आन्ध्र प्रदेशात काकडीचे लोणचे बनवले जाते , ते सुद्धा सालीसकट बनवले जाते . 

सालीसकट खाण्याचे फायदे-: पेरू . सफरचंद. दरेकशे ह्या फळांना सालीसहित खावे . जर आपण ह्या फळांची साले काढली तर व्हिटॅमिन बी .कॉम्प्लेक्स आपल्या शरीराला मिळणार नाहीत . कारण ते शाळांमध्ये अस्तित्वात असते . 

 साली फायबरचा मोठा स्रोत असतात . जे अपचन . पोटाचे विकार. दूर करण्यास मदत करतात . आणि पोटाच्या कॅन्सरपासूनही वाचवतात . ज्या प्रकारे सफरचंदाच्या फक्त सालीमध्ये कॅन्सरशी लढणारे ८५ % फाईटो केमिकल असतात जे पुतण्या सफरचंदापेक्षा जास्त आहे .  

सालीमध्ये खूपच कमी कॅलरीज ,साखर . आणि कोलेस्ट्रॉल असतात आणि ते ऐल डी ऐल ब्रँड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करते . 

संत्र्याच्या सालींमधे शक्तिशाली अँटीऑक्सडेंट्स असतात जे शरीरातील खराब कोलेस्टोलच्या स्ट्रेस कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात . 

सालीसकट फळ आणि भाज्या खाण्यामुळे पोट जास्त वेळपर्यंत भरलेले रहाते . वजन घटवण्यासाठी ह्याची मदत होते,
  
















शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -3

                                                    शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -3

सुंदर त्वचेसाठी खा ताजी फळे -: 

   फळ आणि भाज्यांच्या सेवनाने आपल्या सौंदर्यात भर पडते . फळ आणि भाज्या सौंदर्यात कशी भर घालतात ते पाहू. -:

गाजर -:   गाजरामध्ये बीट कॅरोटीन असते . जे केवळ रणरणत्या उन्हात त्वचेचे संरक्षण करते . असाच नव्हे तर  कापले  लागले कि अँटिसेप्टिक म्हणून काम करते . 

काकडी -:  काकडीला ब्युटी वेजिटेबलें म्हणतात . डोळ्यांना ताजे तवाने ठेवण्यासाठी आणि थकवा दूर ठेवण्यासाठी काकडीचे काप डोळ्यावर ठेवण्याचा सल्ला सौंदर्य तज्ञ् देतात . संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी काकडी विशेष लाभदायक ठरते . 

टोमॅट्टो -:  टोमॅटो भाजी म्हणून समाजाला जातो. पण खरे तर हे फळ आहे. ह्यास पोषक घटकाचा पॉवर हाऊस समजले जाते . ह्यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडेन्ट प्रदूषण आणि सूर्याच्या पॅरो बेंगनी किरणांपासून त्वचेचे होणारे नुकसान रोखण्यास कारणीभूत ठरतात . 

सफरचंद -:  सफरचंदात भरपूर आम्ल असते . जे मृत पेशींना  काढून फेकून देते . व त्वचा चमकदार बनवते . 

तुळस-: तुळशीच्या तेलाचे मालिश मोठं मोठ्या स्पा सेन्टर आणि हेअल्थ सेन्टर मध्ये केले जाते . रोनोज तुळशीची ३/४/ पाने खाल्ली तरी गाला- नाकाशी संबंधीत आजारांपासून मुक्ती मिळते . तसेच त्वचाही चमकदार होते . 


Sunday, 11 February 2018

शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -2,

                                            शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -2


आरोग्यदायी औषधी गुणाचे अंजीर फळ -:  अंजीरातून शरीराला लोह. व्हिटॅमिन्स ए . बी . सि . बऱ्याच प्रमाणात मिळते . अंजीर क्याला थंड व पचायला जड असतात . त्यांच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते . तसेच पित्त विकार . रक्त विकार . व वात विकार, यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात . 
अपचन . एसिडिटी . गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ . संध्याकाळ . १ ती  २ अंजीर खावीत किंवा याचा रस घ्यावा . वरिल त्रासांपासून  आराम मिळेल . अंजीर खाल्याने बौद्धिक व शाररिक थकवा दूर होण्यास मदत होते . लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून ३/४/अंजीर नेहेमी खावीत . त्यामुळे मूत्र विकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजीराचा रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात . त्वचा विकार . त्वचेची आग होणे . व कांजण्या ह्या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत . दररोज कोणताही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते . 

   अंजीर खाल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्याने त्याचे पाणी होते . असे म्हणतात . अंजीर शक्तिवर्धक आहे . तसेच ते सारक हि आहे . म्हणजे ओली किंवा सुकी २ अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे . थोड्याच दिवसात तक्रार दूर होते . 

  अंजीर शीत वीर्याचे , शरीर तृप्त करणारे . मांसधातूला पोषक असते . अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच  . पण रस रक्तरधातूसाठी पोषक ठरते . संगणकावर काम करणार्यांनी  व सातत्याने उपवास करणार्यांनी , रात्रपाळी किंवा जागरणे करणार्यांनी अंजिराच्या ऋतूत मौसमात रोज १/२ अंजीर खावीत . पिकलेल्या अंजीराचा जॅमही रक्त वृद्धी करण्यास उत्तम असतो . 

आवळ्याच्या सेवनाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढून आजार दूर राहातात -:

जुन्या पद्धती -: आवळा  अत्यंत महत्वाचा आहे ,आवळा खोकला . सर्दी . व श्वसनप्रणालीतील इतर उपचारासाठीहि वापरला जातो . तो शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवतो . आवळ्यात संत्यापेक्षा २० पॅट जास्त व्हिटॅमिन   सी ' असते . सफर्चंटापेक्षा तिप्पट जास्त प्रोटीन व १६० पट जास्त अस्कर्बिक ऍसिड असते . खूपशी खनिजे व अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर असते . 

आल्याचा चहा ताप घालवतो . व नाक . घास . व फुफुसातील कफ हटवतो . जर सर्दी पडसे जास्त असेल तर २ चमचे ताजा आल्याचा रस २ कप पाण्यात टाकून ३० मिनिटे मंद जाळावर उकळा . दर २ तासानंतर ह्या गुणकारी चहाचा आनंद घ्या . सर्दी पडश्यात भाज्यांचे सूप खूपच फायदेशीर असते . त्यात काळी मिरी मिसळली तयार अनेक त्रासांपासून सुटका होईल . 

आधुनिक उपचार -:  खोकल्याचे सिरप घशाचा स्प्रे वा ओटीसि पेन  / कोल्ड औषादांचा वापर करावा . सोबत कोमट पाणी .व खरात पाण्याच्या गुळण्या करव्यात  बंद नाक मोकळे करण्यासाठी नोझल ड्रॉप्स वापरावे किंवा  बाम  मिसळलेल्या गरम पाण्याचा वाफारा घयावा . कॉफी . चहा . कोल्ड्रिंक्स . व दारू टाळावी ,

पारंपरिक उपचार व आधुनिक औषधें ह्यांचे योग्य संयोजन सर्दी अंडासे हटवू शकते . सर्दी पडसे व खोकला टाळण्यासाठी आपल्याकडे कोणतेही सटीक उपाय नाहीत . त्यामुळे हे रोग हटवण्यासाठी बहुविध योजना आखावयास  हवी त्यासाठी झिंक व आवळ्याचे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे . 









Saturday, 10 February 2018

शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -१

                                           शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -१


१ आरोग्यासाठी केळाचे फायदे  -:

सालामुळे केळ नेहेमी सुद्धा आणि संसर्गापासून लांब रहाते . केळाच्या ३३० हुन अधिक जाती आहेत . हाचि शेती मोठा प्रमाणावर केली जाते . केळ ९५६ याव्या शताब्धी मध्ये भूमध्यसागरी देशामध्ये आढळते आणि अत्ता संपूर्णं जगभरात सहज मिळते .केळाचू लांबी ४ इंच ते १५ इंचापर्यंत असते . केळाच्या जातीनुसार त्याच्या चवीत फरक पडतो .केल्याबरोबर वेलची खाण्याने केळ सहज पचते . केळ सकाळच्या वेळी खाणे योग्य . केल्याची साल काढल्यानंतर लगेच ते खायला  हवे . केळ अन्न पचवण्यास सहायक ठरते . त्याच बरोबर उत्साहही देते . 


२) संत्रामध्ये अनेक आजार दूर होतात -:`  

उच्चा रक्त दाबाच्या रुग्णांसाठी : संत्र्यामध्ये मॅग्नेशियम व पोटयशियम अधिक प्रमाणात आढळते .म्हणून ते उच्चा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते . 

३) ताप आणि थंडीपासून बचाव -: क . जीवनसत्वाचे प्रमाण संत्रामध्ये अधिक असते संत्रा च्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते, थंडी आणि तापाचा संसर्ग कमी होतो . 

४) कर्क रोगाची जोखीम कमी -: दररोज संत्र्याचा रस पिण्याने कोणत्याही प्रकारचा कर्क रोग होण्याची शक्यता कमीहोते कारण संत्र्याच्या रसात अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते . 

५) संधिवाताच्या रुग्णांसाठी -: सांधे दुखणे त्रस्त असणाऱ्या व्यक्तीनेही संत्र्याचे सेवन जरूर करावे . त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळते . वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते. 

६) जखम भरते -: संत्र्याच्या रसात फोलेट आढळते .फोलेट जखम भरून येण्यासाठी व नव्या पेशींच्या निर्मितीसाठी सहायक ठरते . 

७) लक्षात ठेवण्यासारखे -:  संत्र्याच्या रसात कॅलेरीचे प्रमाण अधिक असते. म्हणून त्याचे सेवन खूप अधिक प्रमाणात करू नका . जेवण झाल्यानंतर लगेच किंवा जेवणाच्या आधी अगोदर संत्र्याचा रस पियू नये . 
पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी संत्र्याचे नियंत्रित प्रमाणात सेवन करावे . संत्र्याचा रास आरोग्यदायी हे खरे असले तरी कोणत्याही ठिकाणचा रस आणि कधीही पिणे चुकीचे आहे . रस नेहेमी अशा ठिकाणचा प्यावा कि जे ठिकाण स्वच्छ आणि हायजिनिक आहे . 
















Friday, 9 February 2018

आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या पालेभाज्या -1

                                        आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या  पालेभाज्या -1


   थंडीच्या दिवसात पालेभाज्या मुबलक व स्वस्त प्रमाणात मिळतात जेव्हा भारतात पाऊस पडून गेल्यावर निसर्गातील हिरवे पण घेऊन हिरव्या पालेभाज्या बाजारात येतात . 

पाले भज्यामंध्ये भरपूर प्रमाणात  ए  जीवनसत्व आढळते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते . त्यापैके एक म्हणजे पालक .   पालक सलाड म्हणजे भाजी म्हणून किंवा सूप ह्या स्वरूपात तुम्ही सेवन करू शकतात . पालक खाण्यापूर्वी तो भरपूर पाण्यामध्ये स्वछ करणे आवश्यक आहे. 

पालकाचे सेवन कां करावे-। ?

पालकांमध्ये अनेक पोषक घटक असतात ह्यामध्ये असणारे कॅल्शिअव हरित घटक आपल्या हाडांना मजबूत करण्यास सहायक ठरतात .  पालकांमध्ये आढळणाऱ्या अ . क जीवनसत्वे .फायबर .फॉलीक ऍसिड . मॅग्नेशिअम . कर्करोगाशी लढण्यास सहायक ठरतात . विशेषतः कोलन . फुफुप्साचा . व स्टॅन कर्करोगांपासून वाचण्यासाठी पालकाचे सेवन अवश्य करावे . हृदयाशी संबंधित आजारापासून लढण्यासाठीही पालक मदत करतो . पालकाच्या नियमित सेवनाने दृढ व्यक्तीमधील अशक्तपणा व स्मरण शक्ती संबधी तक्रारी दूर होतात . 

पालकात असण्याऱ्या कॅलरी -:

पालक हि एक अशी भाजी आहे , जी वजन कमी करू पाहणारया व्यक्ती  अगदी निश्चितपणे  खाऊ शकतात .
कारण पालक मध्ये कॅलरी कमी आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात . पालकांमध्ये प्रथिनेही भरपूर प्रमाणात असतात . ह्याशिवाय  पालकमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड असते . 

पोषक घटकांचा खजाना -: 

  पालकात असणारे प्लवोनाईड्स अँटी ऑक्सिडंट्सचे काम करतात . ह्यामुळे रोगप्रतिकारक्षमता तर वाढतेच . 
शिवाय हृदयाशी संबधीत आजारांशी लढण्यापासून ताकद मिळते . म्हणून दररोज सलाड ह्या रूपात पालकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते ..  


     


Wednesday, 7 February 2018

आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या -2

                                आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या  -2

दुधी भोपळा : औषधी गुणांचा खजिना  

काही भाज्या निसर्गाकडून भेट म्हणून मिळालेल्या आहेत . दुधी भोपळा सर्व भाज्यांच्या दृष्टीने अगदी स्वस्त आहे . हि वेलवर्गीय वनस्पती थोड्या कालावधीत मोठी होते . लांब आणि गोल असे दोन्ही भोपळे . वीर्यवर्धक . पित्त. व कफनाशक आहेत . धातू पुष्ट करणारा भोपळा समजला जातो. कच्चा दुधीभोपळा किंवा त्याचा रस दोन्ही शरीरासाठी वरदान समजले जातात . त्यामुळे पोट साफ होते . शरीर शुद्ध आणि निरोगी रहाते . भोपळ्याचा वापर अशक्तपणा नाहीसा करण्यासाठी .गॅसेस . कावीळ . उच्च रक्तदाब . हृदयरोग . मधुमेह . आतडे आणि यकृतास सूज . शरीरात जळजळ . मानसिक उतेजना . पक्षाघात. संधिवात . स्नायू चे आजार . यामध्ये करावा . 

     वाग्भटांनी भोपळ्याला टरबूज ,कलिंगड . काकडीच्या परिवारात ठेवलेले आहे . वायू आणि कफनाशक म्हणून दुधी भोपळ्याचा वापर केला जातो . 

औषधी गुण -: २५ मिली. दुधीभोपळ्याच्या रसात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून हळू हळू प्या . त्यामुळे लघवी                             भरपूर प्रमाणात होते . 
                       खोकला  . क्षयरोग . छातीत जळजळ ह्यामध्ये दुधी भोपळा  गुणकारी ठरतो . 
                        हृद्य रुग्णांनी जेवणानंतर एक कप दुधीभोपळ्याच्या रसात काळे मिरे आणि पुदिना मिसळून 
                        पिण्याने काही दिवसातच हृद्य रोग बरा  होतो. 
                        जुना ताप किंवा कफ तयार होत असल्यास दुधी भोपळ्याचे सेवन अवश्य करावे . 
                        दुधीभोपळ्यांच्या बियांचे तेल कोलेस्ट्रॉल कमी करते . हृदयाला शक्ती देते . रक्तवाहिन्यांनाही                          निरोगी बनविते , 

लाल भोपळा मधुमेहींसाठी गोड़ खाण्याचा चांगला आरोग्यदायी पर्याय . 

लाल भोपळा खाल्ल्याने थकवा कमी होतो . व्यायामा दरम्यान  जाणवणारा थकवा कमी करण्यास लाल भोपळा मदत करतो . भोपळ्यामुळे रक्तातील लॅक्टिक ऍसिड आणि अमोनिया घटक कमी होण्यास मदत होते . भोपळा मधुमेहांसाठी गुणकारी असतो . कारण चवीला गोड  असला तरी  लाल भोपळा शरीरात साखरेचे प्रमाण वाढवत नाही . त्यामुळे मधुमेहींसाठी हा चांगला पर्याय आहे . 

लाल भोपळ्यात भरपूर पाणी असते त्यामुळे भोपळा खाल्याने तुम्ही हायड्रेटेड रहाण्यासोबत रेफ्रेशही रहातात . लाल भोपळा हा चविष्ट आणि आरोग्यदायी आहे . त्यामुळे पचनक्रिया चांगली रहाते . वाटीभर वाफवलेल्या भोपळ्यातून ११ % फायबर मिळते त्यामुळे भोपळा खाल्याने पचनक्रिया चांगली रहाते . 

  तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लालभोपळ्यातून  ऐ, व्हिटॅमिन मिळते तसेच ह्यातून बिटा कॅरोटीन मिळते , ह्यामुळे मोतीबिंदू आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या कमजोर होणाऱ्या स्नायूची कमतरता पूर्ण होते. लाल भोपळ्यामुळे वजन नियंत्रणात रहाते . ह्यात अधिक प्रमाणात कॅलरीज  असून सोबत फायबर हि आहे . त्यामुळे शरीरात फॅट्स न वाढू देता भुकेवरही नियंत्रण मिळते . त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते . त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते . लाल भोपळ्यामधे व्हिटॅमिन्स  ए . इ . सि . ह्यासोबतच आयर्न चा मुबलक साठा असतो . चांगलय रोग प्रतिकार शक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी असते. लाल भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकामुळे दाह कमी होण्यास मदत होते ..    








   

   

आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या -1

                                  आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या  -१


१) निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिजे -
 मॅग्नेशिअम -:  बाजरी. दूध.  कारले . बीट .खजूर . यात असते ते पेशींचे कार्य सुधारण्यास मदत करते . 

सोडियम -:       मीठ .पाणी. . बटाटा . आले . लसूण . कारले. कांदा . मिरची . पालक . सफरचंद ह्यात असते .
                       ते  शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनांची निर्मिती करतात. 

फॉस्फरस -:   दूध . पनीर . डाळी . कांडा. टोमॅटो . गाजर . जांभळे . पेरू . काजू . बदाम , बदाम . बाजरी . चणे 
                    . ह्यात असते ते  मेंदूला अत्यंत उपयुक्त असून मेंदूला ताजे ठेवतात . 

हृदयासाठी फायदेशीर सूर्यफूल तेल -:\
 सूर्य फुल केवळ दिसावयास सुंदर आहे असे न्हवे . तर त्याच्या फुल व बियांमध्ये औषधी गुण लपलेले आहेत . हार्ट अटॅक व हृदयाशी संबंधित अनेक आजारावर सूर्य फुल औषधी म्हणून काम करते . हार्ट अटॅक चे प्रमुख कारण हृद्य धमन्यांमध्ये अडथळा . कमी जास्त रक्तदाब . मानसिक तणाव व अधिक थकवा . हृद्य रोगतज्ज्ञांच्या मते . धमन्यांमध्ये  रक्ताची गाठ जमण्याने हार्ट अटॅक चा धोका वाढतो . धमन्यांमध्ये रक्तांच्या गाठीवर नियंत्रण ठेवण्याचे काम एक ऍसिड करीत असते . ज्यास लिनो लेइक ऍसिड असे म्हणतात . हे एक असंतुप्त आम्ल आहे . ह्याची पूर्तता वनस्पती तेलाद्वारे केली जाते. संशोधकांना आढळले  की  सूर्यफुलाच्या    बियांमध्ये हे ऍसिड वाढते , म्हणून हे तेल हृद्य रुग्णांसाठी फायदेशीर ठरते . 
रक्तातील कोलेस्टरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठीहि सूर्यफूल उपयुक्त ठरते . शरीरात जमलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही सूर्यफूल करते . 

टोमॅटो व काल्याचे औषधी गुण 
टोमॅटोकडे आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर त्यामध्ये लाइको पिन नावाचे पॉवरफुल कॅरोटनाईड अँटिऑक्सिडेन्ट असते, जे आपल्याला कर्करोग .डायरिया . डोळ्यांची जळजळ . त्वचेच्या समस्या . यापासून लढण्यास मदत करतं . 
    एका अध्ययनानुसार कॅरोटनाईड  अँटिऑक्सिडेन्ट , रक्त दाब कमी करण्यासही सहायक ठरते . तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे रोजचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास निश्चितपणे फायदा होतो . 
मधुमेहात कारले रामबाण -:   जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर कारल्याचे सेवन अवश्य करा . १५ ग्राम कारल्याचा रस १०० ग्राम पाण्यातून घेण्याने शरीरातील इन्सुलेशन्स चे प्रमाण वाढते . अस्थमाच्या रुग्णानासाठी कारल्याचे मूळ उपयुक्त ठरते. कावीळ . किडनीस्टोन . ह्यासारख्या आजारातही कारल्याचे सेवन गुणकारी ठरते . कारले रक्तशोधक आहे . तज्ज्ञांच्या मते .उन्हाळाच्या दिवसात कारल्याचे सेवन कोणत्या न कोणत्या रूपात अवश्य करावे . ,





   

Tuesday, 6 February 2018

।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-3

                                                     ।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-3


शक्ती आणि आरोग्यासाठी दूध प्यावयास हवे असे जगाच्या बहुकेक भागात मानले जाते . त्यामुळे दुधासाठी गुरांचे पालन हा एक फार मोठा व्यवसाय आहे . ह्या दुधापासून नाना प्रकारचे पदार्थ चीज . योगर्ट . कोंडेन्सड मिल्क . वगैरे बनवून मिठाई मध्ये वापरले जातात . 

     माणूस हा एकच प्राणी असा आहे कि जो आईचे दूध पितो. आणि त्याच बरोबर गाई .म्हशींचे . उंटिणीचे . याकचे . आणि इतर काही प्राण्यांचे हि दूध पितो . माणसाने हि इतर प्राण्यांचे दूध पिण्याचे सवय त्याने पाळलेल्या प्राण्यांनाही लावली आहे . उदा. -कुत्री .मांजर ,वानर . 

उंटिणीचे दूध भविष्यातील सुपर फूड - असा दावाही काही भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे . गेल्या १०/१५ वर्षांपासून उंटाच्या पर्यायी उपुक्ततेबद्धल संशोधन सुरु आहे. ह्याचा  उद्धेश लोकांनी उंटेंनीच्या दुधाचा गाय म्हशीच्या दुधाप्रमाणे वापर करावा . हा आहे . त्यावेळी उंटिणीच्या दुधाचे आईस्क्रीम दाखवण्यात आले होते .. २००६ साली मध्ये युनाइटेड नेशन्स फूड अँड ऍग्रीकल्चर ऑरगॅनिझशनने उंटीणीच्या दुधाला उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन केले होते.. उंटीणीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा तीन पट सी व्हिटॅमिन्स असते . पूर्वी उंटीणीच्या दुधाचा वापर फक्त औषधे तयार करण्यासाठी होत असे . आता उंटीणीच्या दुधापासून चॉकलेट . केक . चिक्की .आणि डेझर्ट . हे खाद्यपदार्थ तयार करण्यात येत आहेत /

         २००८ साला मध्ये संयुक्त अरब अमिरातमधील दुबई येथील अल नास्मा कंपनीने असा दावा केला होता कि उंटीणीच्या दुधापासून  सर्वप्रथम ब्रँडेड चॉकलेट.आम्हीच तयार केले . आता हि कंपनी उंटीणीच्या दुधापासून विविध फ्लेव्हरचे चॉकलेट तयार करीत आहे . ह्या कंपनीची चॉकलेट्स २०१५ सालापासून लंडन मधील हैरोड्स मध्ये हि विकली जात आहे . 

अबुधाबी येथे उंटीणीच्या दुधापासून तयार केलेली सुगंधी कॉफी खूपच लोकप्रिय झाली . आणि तेथे खजुराचा केक तयार करताना उंटीणीच्या दुधाचा वापर केला होता . 

भारतात राजस्थान मधील N,R,C,C, मध्ये उंटीणीच्या दुधापासून  विविध प्रकारचे खाद्य पदार्थ करण्यात येत आहेत . थे`तेथे .चहा . कॉफी . चॉकलेट . चिक्की. केक. डेझर्ट . चीझ . साबण . इत्यादी तयार करण्यासाठी .बिकानेरी .मेवाडी . जैसलमेरी . आणि क्चशी . या ४ प्रजातीच्या  उंटीणीचे दूध वापरतात . 

  


।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-2

                                     ।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-2


भारतीय गाईचे दूध सर्वात प्रभावी आहार समजला जातो . विदेशी गाईत  मात्र  असे गुणधर्म जाणवत नाही . जाणकारांचे म्हणणे असे आहे कि त्यात 'हुकवर्म ' म्हणजे एक प्रकारचे जंत असतात. गाईचे दही पचायला हलके आणि अनेक आजारांवर उपचार होणारे असते . 

देशी गाय आणि विदेशी गाय यातील महत्वाचा फरक म्हणजे देशी गाईला ४ जठार असतात . आणि विदेशी गाईला ३ जठार असतात . आपल्या कडील  मूळच्या गाईचे शेण हे बांधीव असते .संकरित गाईचे शेण हे  पातळ असते . त्यामुळे आवश्यक ते औषधी गुणधर्मे देशी गाईतच मिळतात . देशी गाईचे गोमूत्र हे औषधे आणि खते ह्यामध्ये अतिशय प्रभावी ठरते. देशी गाईचे गोमूत्र जर एखाद्या जगावर सिंचन केले तर ती जागा अधिक साफ झाली असे खरेच वाटते . अशा शेणाने घर सरावले तर कीटक येत नाहीत . कारण ते विष शोषक असते . आयुर्वेदात त्याला गंगेच्या पाण्याचा दर्जा दिलेला आहे . 

 गेल्या काही वर्षातील देशी आणि विदेशी शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे कि देशी गाईचे दूध . शेण . आणि गोमूत्र .. ह्यामध्ये सोन्याचा अंश असतो . गाईला वशिंड असते त्याला 'सूर्यकेतू नाडी ' असे म्हणतात . वातावरणातले पंचमहाभूतांचे अंश शोषून ती ते सामर्थ्य प्राप्त करते. देशी गाईचे दूध जे आईच्या दुधाइतके प्रभावी मानले जाते. अशा दूध प्रश्नाने शरीराचे सर्वांगीण पोषण होते . दही घुसळल्याने जे ताक बनते ते तयार अधिक लाभदायक असते . पोटाचे अनेक त्रास त्या ताकामुळे बरे होतात .    

 देशी गाईच्या दुधाने जे कोलेस्ट्रॉल विकसित होते ते अतिशय उपयोगी असते . गाईच्या अभ्यासात एक एक पाऊल  पुढे टाकले तयार गोमूत्राच्या एक एक थेंबाने मनाची अस्वस्थता कमी होते . गाईच्या तुपाने अनेक विचार आटोक्यात येतात . माणसाला एका दिवसाला जेवढी शक्ती लागते ती देशी गाईच्या थोड्याशा निरश्या दुधानेही मिळते . ह्याचा अनुभव घयावा . गाईबद्धल अनेक संस्कृत वांग्मयात संस्कृत वेद  ग्रंथात जे  सांगितले आहे  त्याची प्रचिती घेऊन भारतीय ऋषी मुनी पूर्वी गाईला गोमाता म्हणत होते .  







Monday, 5 February 2018

।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-1

                                              ।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-1

रुणांसाठी गाईचे दूध योग्य मानले जाते . गाईच्या दुधात ७८/१० कागदी लिंबाचा रस मिसळून लगेच पिण्याने नैराश्यापासून मुक्तता मिळते . 

            भारतीय आहारात दुधाला एक पूर्णान्न म्हणून उल्लेख केलेला आढळतो . भारतात लहानपणी दुधाचे  सेवन न केलेली व्यक्ती अभावाने आढळेल . दुधामध्ये असे अनेक घटक आढळतात . जे वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी सहायक ठरतात . गाईच्या दुधात अ . ब.  क . ड . इ . जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळतात . ते साहस पचण्यासारखे असते . ते शरीराचे पोषण करून कमजोरी दूर ठेवण्याचे काम करते . 

            रुग्णानासाठी गाईचे दूध योग्य मानले जाते . गाईचे दूध मधाबरोबर सेवन करण्याने शक्ती व बुद्धीही वाढते . दूध नेहेमी उकळून कोमट करून मगच प्यावे . दूध जास्त उकळल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात . दूध पिताना त्यावर आलेली साय  काढून टाकावयास हवी . कारण ती पचण्यास जड . शीतल . तुप्तीकारक . स्निग्ध . पुष्टीदायक . धातू वर्धक व  कफकारक  असते .

    दूध रात्री पिणे योग्य . रात्री दुधाचे सेवन करणे बुद्धिप्रद क्षय नाशक . अनेक आजारामध्ये लाभदायक असते . दूध नेहेमी घोट घोट प्यावे , दूध प्याल्यानंतर त्वरित दही किंवा आंबट पदार्थांचे सेवन करू नये . 

       म्हशीच्या दुधात ब. क . ड ,इ . जीवनसत्व असते . ते बलवर्धक असते . शरीराला पुष्टी देते . गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीचे दूध अधिक स्निग्ध . व पचण्यास जड असते . तर बकरीचे दूध हलके व पचण्यास सुलभ असते . अतिसार .खोकला . ताप .क्षय . रक्तपित्त दूर करण्यास सहायक ठरते .  ह्या दुधाचे सेवन डोळ्यासाठीही उत्तम समजले जाते . 
   


फॅक्चर साठी गहू धान्याचा उपयोग

                                                   फॅक्चर साठी गहू धान्याचा उपयोग 
अपघातामुळे व पडल्यामुळे हाड मोडते . त्याला भग्न रोग असे नाव दिलेले आहे . साध्य ज्या प्रकारे मोडलेले हाड बसवून प्लास्टर केले जाते अगदी तश्याच प्रकारे पूर्वीच्या काळी सुद्धा विशिष्ट गवत .झाडांच्या साली . आदींचा मदतीने भग्नावर बंधन उपचार केला जात असे . सरकलेले हाड पुन्हा स्वस्थानी कसे बसवावे . वेदना कमी करण्यासाठी काय उपचार घयावे .मोडलेले हाड पुन्हा सुखरूप सांधले जावे ह्यासाठी काय आहार घ्यावा ?
  हाडांच्या बळकटीसाठी गाईचे दूध उत्तम असते .  त्यातल्या त्यात पाहिलांदा व्यालेल्या गाईचं दूध अधिक चांगले असते . 
  गहू हाडांना सशक्त करण्यासाठी उत्तम समजले जातात . गाईच्या दुधात तूप गव्हाचे सत्व . अर्जुन साल . लाखेचे चूर्ण , आणि हाडसांधी नावाच्या वनस्पतीचे चूर्ण मिसळून घेण्याने हाड सांधण्यास मोठी मदत होते . 
हाड चांगली प्रकारे सांधण्यासाठी -कापभर दुधात २ चमचे साजूक तूप आणि १/२/चमचे गव्हाचे सत्व मिसळून घेण्याने हाड सांधण्यास मदत होते . 
काही वेळा फॅक्चर अश्या ठिकाणी होते कि तिथे प्लास्टर घालता येत नाही. किंवा हाडळ छोटीसी क्रॅक असेल तर प्लास्टर केले जात नाही . अश्या वेळी त्या ठिकाणी गव्हाच्या सत्वांचा लेप लावला जातो.