Wednesday, 31 January 2018

।। माणूस घेत असलेला आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

                     ।। माणूस  घेत असलेला  आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

माणसाची सगळी धडपड त्याच्या २/३/ वेळेच्या जेवणासाठी असते. माणूस केवळ अन्न  खाऊन जगू शकत नाही . सुख व समाधानाने जगण्यासाठी त्याला शिक्षणाची .एखाद्या छंदाची .किंवा कौशल्याची गरज असते . 
म्हणून आपल्या शहाण्या पूर्वजांनी २ गाष्टी सांगून ठेवल्या आहेत . त्यांच्यापैके पहिली म्हणजे -अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे .-यज्ञ कर्म आहे . केवळ उदार किंवा पोट भरणे नाही . माणसाच्या मेंदूला, बुद्धीला . सुद्धा खाद्य लागते व ते जरुरी आहे . ह्या २ गाष्टी संस्काराने जो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तोच.  खरा माणूस . 
 केवळ फक्त २ हात २ पाय . २ डोळे . असणे किंवा बढाई मरावाची तर . मेंदू असणे म्हणजे माणूस नाही . 
माणसाचे चांगुलपण. त्याच्या चारित्र्यात असते . माणसाचे चरित्र त्याला जन्मतः मिळत नसते . आई वडिलांचे संस्कार शैक्षणिक जीवन. समाज आणि  जगण्याची परिस्थिती . यातून माणसाचे चरित्र घडते . उच्च शिक्षण . किंवा खंडणी नावलौकिक म्हणजेच चरित्र नव्हे .चरित्र ही बाह्यतः दिसणारी चीज नाही . ती जाणवणारी - जाणून घेण्याची गोष्ट आहे . केवळ खोटे न बोलणे . आणि चोरी न करणे म्हणजे हि चारित्र नाही. कारण बहुतेक माणसे ह्या गोष्टी उघडकीला आल्या तर बदनामी होईल . किंवा कायद्याने शिक्षा होईल . ह्या न भीतीने त्या करत नसतात . आणि जिथे भीती . तिथे चारित्र्य नाही . खोटे न बोलणे आणि चोरी न करणे हे सतगुण आहेत युगात दुमत होऊ शकत नाही . पण ह्या गोष्टीपासून स्वेच्छेने दूर रहाणे . वेगळे आणी लोकलज्जेच्या भीतीने त्या न करणे वेगळं , चारित्र्य हा एक वृक्ष आहे . त्याचे रोप बालपणापासून लावावे .तेव्हा कुठे १०/१५ वर्षाने त्याचा वृक्ष बनतो . डिग्री  मिळवण्यासाठी १५ वर्ष शिक्षण घावे लागते . चारित्र्याची डिग्री मिळवण्यासाठी आहारापासून आचरणापर्यंत अनेक गोष्टी लागतात , पण  आहार हि वस्तुस्थिती आहे . माणसाच्या जडण व घडणीतसुद्धा आहार महत्वाचा आहे . व्यक्तिमत्व आणि चारित्र्य ह्यांचे जवळचे नाते बघता दोघांच्या निर्मितीत आहाराचा सहभाग असणे ओघाने आलेच , ताजा .स्वच्छ .सात्विक आहार ह्या दोन्हींच्या उत्पत्तीत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतो . 

           आपल्या पूर्वजांच्या आणि अनेक आहारतज्ञांचा मते सात्विक आहार म्हणजे शाकाहारी आहार . त्यात तेल .मसाले .हि प्रमाणाबाहेर नास्न्हे अपेक्षित आहे . शरीर स्वच्छ आणि हलके ठेवण्यासाठीच तर सात्विक आहाराचीच  गरज आहे . शिवाय मन हलके ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते . कोणत्याही कारणाने मनात खळबळ असेल तर . ती अशांती अन्न  पचनावर व झोपेववाईट परिणाम करते . म्हणूनच डॉक्टर .आहारतज्ज्ञ आणि मानसतज्ञ सांगतात कि रात्रीच्या जेवणानंतर झोपी जाण्याच्या मधल्या काळात मनाला अस्वस्थ करणारे विचार करू नयेत . टी.व्ही. वरचे प्रक्षोभक अथवा भीतीदायक कार्यक्रम बघू नयेत . किंवा त्या प्रकारचे वाचन करू नयेत , कुटुंबियांशी वाद विवाद भांडणे करू नयेत . आहारात तिखट तेलकट- मसालेदार  पदार्थ असतील तर आणि ताशा जेवणानंतर वरील प्रकारचे वाचन केले किंवा  टी.व्ही.  प्रक्षेपण पाहिले तर पचनाचे आणखी तीव्र दुष्परिणाम होतात. मन अस्वस्थ करणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिवसभर घडत असतात . हिंसा हि त्याच्यापैकि एक . माणूस मांसाहार करतो तेव्हा विशिष्ट प्राण्याचे फक्त मास खात नसतो . तो त्या प्राण्याचा भावना . आकांशा . आयामुळे राग आणि णि ऊर्जा ह्यांचेही भक्षण करीत असतो . माणसाच्या मांसाहारासाठी त्या प्राण्याचा जीव घेतला जातो . तेव्हा भीतीपोटी त्या प्राण्याची होणारी तडफड .त्याची वेदना . त्याच्या शरीरात पसरते . आणि ते शरीर खाणाऱ्याच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो . मासांहारमुळे मनात हिंसक विचार उसळतात . आणि ते काबूत आणता येत नाहीत. मांसाहारामुळे मानवी संवेदना थिजतात आणि इतर माणसाच्या भाव-भावनांचा विचार मनात येत नाही . कुणाच्या वेदनेने . दुःखाने मन हालत नाही . मांसाहारामुळे तमोगुण . म्हणजेच तामसपणा वाढतो . राग आणि चिडचिड ह्यांच्याबरोबर आळस . जडपणा . निराशा . व गुन्हेगारी वृत्ती हे दुर्गुण उसळतात . 

   मांसाहार हि प्रत्यक्ष हत्त्या  नसते. मांसाहार कारण्याऱ्याने ती केलेली नसते . तरीही मांसाहार करणे हि अप्रत्यक्ष हत्याच ठरते . मांसाहार करणाऱ्याना हे माहित नसते पुष्कळदा ते सवयीने मांसाहार करीत असतात . म्हणजेच त्यांच्या घरी अस अन्न शिजत असते. आणि हे लहानपणापासून ते खात असतात . साहजिक हे खाणे बरे कि वाईट ह्याचा विचार न करता खाल्ले जाते. त्याची सवय होऊन जाते .              
अशा माणसांना प्राण्यांचे प्रेम नसते असेही नाही . ते एखादा कुत्रा व मांजर पाळून असतात . व त्यापलीकडे ते प्राण्यावर प्रेमही करतात . त्यांच्यापैके अनेक जण समाज आली कि मांसाहार सोडून देखील देतात . कोणतीही `गोष्ट का कार्याची नाही हे कळले तर अनेकजण तो सोडून देतील   मांसाहाराच्या शक्ती वाढते . मांसाहारात अनेक जीवनसत्व असतात . लढाईवर जाणाऱ्यांना आणि मैदानी खेळ  खेळणाऱ्याना ऊर्जेसाठी मांसाहार आवश्यक आहे  . वगैरे. वगैरे   बरेच काही सांगितले जाते . पण त्यात मुळीच तथ्य नाही , 

  मांसाहारातील  उपयुक्त  जीवनसत्व शाकाहारात सुद्धा आहेत . भारतासारख्या देशात विपुल वनस्पती . व भाज्या पिकतात .त्यांच्यात वैविध्यही मुबलक आहे. भारतीय आहारामुळे डाएट ची आवश्यकताही राहिलेली नाही. मनुष्यच काय .चार पायाचे प्राणीदेखील शाकाहारावर उत्तम वाढतात . ह्या उपरही ज्यांना मांसाहार प्रिय आहे त्यांनी तो करावा ; पण मांसाहारात अधिक जीवनसत्व असतात . किंवा मांसाहारात मर्दुमकी आहे . ते क्षत्रियांचे खाणे आहे . मांसाहाराच्या बुद्धी वाढते . वगैरे. वगैरे हैस्यास्पद बकवास करू नये . 

  जे आवडते ते करायला कारण लागत नाही . आपले मन आपली सद्सद्विवेकबुद्धी जे करायला अडवत नाही ते माणसाने खुशाल करावे ..    
  ब्रिटन व अमेरिका इथे आज अनेक लोकं ठरवून शाकाहाराकडे वळले आहेत . - काही जण निरोगी जीवनासाठी . काही मनःशांतीसाठी , काही प्राणीप्रेमासाठी , तर काही दीर्घायुष्यासाठी . आणि काहीजण शाकाहारात वैविध्यपूर्ण लज्जतदार घटकासाठी .  

चांगला आहार माणसातल्या चांगल्या प्रवृत्ती जाग्या करतो . त्यांच्या कडून चांगले काम करवून घेतो  














।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-2

                               ।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।।  (शाकाहारी धान्ये )-2

चपाती -: चपाती आरोग्यदायी बनवण्यासाठी .सोयाबीन. काळे चणे , आणी गहू समप्रमाणात घयावे ह्या पिठामध्ये कोंड्याचा समावेश हि असावा . त्यामुळे शरीराला उत्तम वर्ग मिळते . 

पांढरा भात -: आपण पांढरा भट खातो. त्यावरील तांबट थराला पॉलिशच्या साह्याने नष्ट केले जाते . खर तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून हातसडीचा  तांदूळ उत्तम कारण ह्यामध्ये कॅर्बोदक आणी तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात . साधारण २०० ग्राम पांढरा तांदूळ खाण्याने शरीराला साधारण ४०० कॅलरी मिळतात ,ज्या अधिक आहेत . 

भाज्या -: चांगल्या तयारीने भाज्या स्वादिष्ट बनतात .म्हणजे भाजी तयार करताना .मसाले जेवढे चांगले भाजले जातील .तेवढी भाजी चांगली होते . त्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करणे योग्य नाही . अख्या मसाल्याची पूड करून किंवा त्याना कोरडे भाजून भाज्यांमध्ये वापर करा . त्यामुळे तेलाची आवश्यकता भासणार नाही . क्रीम एवजी दही किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता. 

दही -: दही आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवत नाही . जर तुम्ही फॅट्सयुक्त खाद्य पदार्थ्यांच्या सेवनाविषयी अधिक सतर्क असाल तर .टोन्ड दुधापासून तयार झालेले दही खा . दही पचनक्रिये साठी उत्तम . टोन्ड दुधापासून तयार झालेल्या २५० ग्राम दह्यात १५० कॅलरी असतात . कर्बोदके प्रथिने ह्याबरोबर कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे दही . 

डाळी-:   डाळीत प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात ह्याशिवाय डाळीमध्ये तंतुमय घटक .फोलेट . जीवनसत्व ब -१. लोह .आणी खनिजे असतात . २३० ग्रॅम डाळीत साधारण २०० कॅलरी असतात . डाळ कोलेस्ट्रॉल आणि शर्करेचा (साखर) स्तर संतुलित करण्यास सहायक ठरते . 

लाल मिरची-: लाल मिरचीची फोडणी दिल्याशिवाय आपल्या भाज्या आणी अपूर्ण रहातात . ही लाल मिरची आरोग्यदाई सुद्धा आहे . १०० ग्रॅम लाल मिरचीमध्ये साधारण ४० कॅलरी असतात . मिरची अँटी बॅक्टरिअल . अँटी डायबेटिक . अँटी कॅन्सर . आणि वेदनाशामक आहे . 

     भारतात शहरी भागात राहण्याऱ्या १० लाख भारतीयांचे निरीक्षण केले तेव्हा सकाळचा ब्रेकफास्ट मध्ये सगळ्यात जास्त फॅट्स व  कर्बोदकांचे सेवन केले जाते . स्नॅक्स रूपात केले जाणारे हे पदार्थ आरोग्यास नुकसानकारक आहे . शास्त्र शुद्ध आहाराला समजून घेण्याआधी आपण वाढत्या आजारांना समजून घयावे .गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह .हृदयाचे आजार . लठ्ठपणा .कर्करोग .ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढली आहे . देशातील ५५ हुन अधिक वय असलेली ४०% लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे . अमेरिका आणि चीन नंतर भारतातही लोकं लठ्ठपणाने ग्रस्त आहे . हृदयाच्या आजाराविषयी बोलवायचे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार . भारतीय लोकं हार्ट अटॅक ने मृत्युमुखी पाडण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे . भारतात दर ३३ व्या सेंकंदाला एक व्यक्तीला हार्ट अटॅक येतो . ह्या सर्व आजारांचे मूळ आपल्या आहारात आहे . भारतीय आहाराचे ताट चविष्ट तर आहे पण आरोग्य व पोषणाच्या दृष्टीने त्यात बदल करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देऊ लागलेले आहेत ...        









Sunday, 28 January 2018

।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-१

                                         ।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।।  (शाकाहारी धान्ये )-१

          पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर.  ज्वारी ,बाजरी . यासारख्या धान्याचा समावेश असावयाचा आणी त्यामुळे ते निरोगी रहात असत. सध्या लोकांनी इतर धान्यांचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत . बाजरी पचायला हलकी असते . प्रथिने कॅल्शिअम , लोह . फॉस्फरस . फायबर्सचा समावेश बाजारामध्ये असतो . म्हणून बाजरी  शरीर आणी मेंदूला निरोगी ठेवण्यास पूरक असते.

                                                                 ग्रीनटी -
अनेक औषादांचा खजिना असणारा ग्रीनटी आपल्या हृदयाची देखभाल करण्यास सहायक ठरतो . ग्रीन टी ह्यके मिलिया साईनेनिन्सस नावाच्या वनस्पतीच्या पानापासून फर्मेंटेशन न करता तयार केला जातो . त्यामध्ये आजारापासून संरक्षण करणारे अनेक अँटी ओक्ससिडेन्ट असतात . ह्यामध्ये अनेक पॉलीफिनॉल असतात , जे आजारापासून लढण्याची क्षमता वाढवतात . रक्ताला पातळ करण्यास मदत करतात . व धमन्यांचे संरक्षण करतात . ग्रीन टी ला फॉर्मेंटेशन करून जेव्हा जेव्हा सामान्य काळा चहा बनवलं जातो तेव्हा त्यातील अनेक फायदेशीर घटक नाहीसे होतात . असे घटक जे कोलेस्ट्रॉलला कमी करून कर्करोग आणी अनेक विषाणापासून संरक्षण करतात . ग्रीन टी यकृतासाठी देखील फायदेशीर आहे . ग्रीन टी यकृतातुन विषारी रस्त्याने बाहेर काढण्यासही मदत करतो . जर तुम्ही रोज अनेक कप चहा कॉफी पीत असाल तयार त्या ऐवजी ग्रीन टी पिणे हा उत्तम पर्याय आहे .

                                                        मोड आलेली कडधान्ये      

 जेव्हा आपण डाळ बीन्स किंवा एखाद्या कडध्यान्याला मोड आणतो तेव्हा त्यातील जीवनसत्व आणी एन्जाईमचा  प्रमाण खूप प्रमाणात वाढते. त्यामध्ये असणारे स्टार्च ह्या सिम्पल शुगर अशा कार्बो हैड्रेटमध्ये बदलते. त्याला आपले शरीर सहज पचवू शकते . प्रथिने अमिनो ऍसिड  मध्ये बदलतात, तर फॅट फॅटी असिडमध्ये रूपांतरित होते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने , क जीवनसत्व . कॅल्शिअम .मॅग्नेशियम . आणी अनेक आवश्यक एन्झाईम्स असतात . ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे .अशा व्यक्तींनी मोड आलेली कडधान्ये थोडीसी शिजवून मग खावीत . पचनाचा त्रास नसल्यास कच्ची खाणे अति उत्तम .

                                                   बाजरी व ज्वारी

पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर ज्वारी बाजरी ह्या धान्याचा समावेश असायचा त्यामुळे ते निरोगी रहात असत . सध्या लोकांनी इतर धान्याचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. बाजरी पचवावंसं हलकी असते . प्रथिने ,कॅल्शिअम .लोह. फॉस्फरस . फायबरचा समावेश बाजारामध्ये असतो म्हणून बाजरी शरीर आणी मेंदूला निरोगी ठरण्यास पूरक असते , ह्यामध्ये असणारे मॅग्नेशियम डोकेदुखी आणी हार्ट अटैक ची शक्यता कमी करते. नियासिन (जीवनसत्व ब -३) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते . फॉस्फरस चरबीचे पचन . व त्यांची देखभाल .ऊर्जा देण्याचे काम करतो.मधुमेहाचा धोका ही  कमी होतो. बाजारामध्ये आढळणारे फायबर कर्करोगाचा धोका कमी करते . मोठ्या आतड्यात पाण्याची कमतरता होऊ देत नाही .
         बाजरीची भाकरी खाण्याऱ्या व्यक्तींना हाडाच्या कमतरतेने निर्माण होणारा ऑस्टिओपोरोसिस आणी रक्ताच्या कमतरतेमुळे होणार अनिमिया होत नाही, बाजारामुळे यकृताशी संबधीत आजार होण्याची शक्यताही कमी होते  .

                                                  गव्हाचे अंकुर   

पोषक घटकांविषयी बोलावयाचे   तर गव्हाच्या अंकुराना गावाचे सोने म्हंटले जाते . हा प्रथिने ब जीवनसत्व .इ जीवनसत्व .लोह .कॉपर .मॅग्निशियम .मॅग्नीज कॅल्शिअम ,फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे . लक्षात ठेवा गव्हाचे अंकुर लगेच शिळे होतात . म्हणून त्याना एखाद्या घट्ट झाकणाच्या भांड्यात ठेवून फ्रीझ मध्ये ठेवावे .गव्हाचे अंकुर जरी घरी उगवता आले नाही तरी ते भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात .

                                                      ओट्स    
ओट्स मध्ये अनेक धान्यांचा समावेश असतो . ह्यामध्ये विद्राव्य फायबर्सही असतात . त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते . मधुमेहाच्या रुग्णांनी ओटसचे सेवन अवश्य करावे. तसेच पचन ठीक करण्याचा गुणधर्मही ओट्समध्ये आहे. यामध्ये चरबी आणी सोडियम कमी प्रमाणात असते . त्यामुळे हृदयाचे नुकसान होत नाही .

                                                      ब्रान 

व्हेंटब्रार्न  म्हणजे कोंड्यासहित बनवलेली चपाती आतड्यासाठी वंगणाचे काम करते, त्यामुळे गॅसेसचा त्रास दूर होतो . ह्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोट साफ रहाण्यास मदत होते . ब जीवनसत्व हि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असते . हल्ली शहरांमध्ये पेस्ट्री . चॉकलेट . पांढरा  ब्रेड.पांढरा तांदूळ . नान . रुमाली रोटी ह्यासारखे रिफाईंड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले  जातात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते .
 


(शाकाहारी धान्ये )-१

    

Thursday, 25 January 2018

। शुद्ध शाकाहारी जेवणाचे विज्ञान ।। (वेगन डायट )

                                            ।। शुद्ध शाकाहारी जेवणाचे विज्ञान ।।  (वेगन  डायट )

                   शाकाहारात अशा आहाराचा समावेश असतो .ज्यामध्ये जीवांची हिंसा किंवा शोषण केले जात नाही वेगन डायट मध्ये कोणत्याही प्रकारचे मटण .पोल्ट्री .डेअरी प्रॉडक्ट्स यांचा समावेश होत नाही . यामध्ये मध आणि अंडी  ह्यांचे सेवन केले जात नाही . वेगन डायट सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी सुरक्षित आहे .  वेगन डायट प्लॅन मध्ये जीवनसत्व ब -१२. झिंक क्लोरीन .ओमेगा . ३ फॅटी ऍसिडस . सप्लिमेंट्सचा समावेश केला जातो . या आहारात सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात .फळे ,भाज्या धान्यावर अधिक भर दिला जातो . दुग्ध जन्य पदार्थांचा ह्यामध्ये समावेश नसल्याने वजन वाढण्याची शक्यताही नसते . 

क्षार आणी अल्कलाईन डायट व आम्लीय म्हणजे एसिडिक डाएट दोनीही मध्ये निसर्गोपचारावर भर दिला जातो . निसर्गउपचाराच्या मते क्षार प्रकृतीचे शरीर निरोगी असते . आम्लाच्या अधिक्यामध्ये शरीर अस्वस्थ होते. सामान्य शरीराचे ऍसिड संतुलन ७.४ पी एच . असते आम्लाच्या अधिक्यामुळे शरीरात चरबी जमण्यास सुरुवात होते . विषारी पदार्थ शरीरात जमा होण्यास सुरुवात होते. बॅक्टरीया वेगाने वाढतात . त्यामुळे शरीरात संसर्ग बळावतो. परिणामी थकवा आणी आळस वाढतो . असं मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे होते . जेव्हा शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढते . तेव्हा शरीरात पाणी एकत्र होते . चयापचयाची क्रिया असंतुलित होते . किडनी आणी लिव्हरस्टोन होण्याबरोबरच केसही वेगाने गळायला लागतात . निसर्गओपचारांच्या मते. क्षार प्रकृतीच्या व्यक्ती अधिक निरोगी असतात . तुलनात्मकदृष्ट्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवतात . 

                          आम्लीय पदार्थाचं अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या व्यक्तींनाही वजन कमी करण्याची समस्या सतावते . क्षार प्रकृती असलेल्या व्यक्तींनी  आहारात सूप .फळ . नारळ . पाणी . भाज्या . यांचा समावेश करावा . विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात . 

                 कैलिफोर्निया मधील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला की शाकाहारी व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता अनेक पटीने कमी असते . शाकाहारामुळे कोलेरेक्टल कर्करोग २२%. कोलन कर्करोग १९% तर रेक्टल कर्करोग १८ टक्क्यापर्यंत कमी होण्याची असते . ह्या संशोधनादरम्यान ७७००० हुन अधिक लोकांच्या आहाराच्या सवयीचा आणि त्यांच्या आरोग्याचा इतिहास लक्षात घेऊन हे अध्ययन करण्यात आले .      
     
                  

Wednesday, 24 January 2018

।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

                                                   ।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

 मनुष्याच्या स्थूलतेला रोखणारा शाकाहारी आहार -:

          ब्रेकफास्ट - दररोज सकाळी उठल्यावर १/किंवा २ ग्लास शुद्ध  कोमट पाणी प्यावे , त्यामुळे शरीरातील टॉक्ससिन्स बाहेर टाकले जातात . त्यामुळे पचन क्रिया स्लो होऊन वजन वाढू लागते . 
   
सकाळी दूध दही पनीर ओट्स डायफ्रूट हे पदार्थ नसतील तर पचनक्रिया मंदावते त्यामुळे वजन वाढते . सकाळी लवकर ब्रेकफास्ट केला नाही तर- चयापचया किया मंदावते . त्यामुळे शरीरावरील  जादा चरबी योग्य प्रकारे बर्न होऊ शकत नाही .  परिणामी वजन वाढते . काही खाद्य पदार्थामध्ये भरपूर फायबर असते .त्यामुळे सकाळी फायबर युक्त अन्न खावे . 

 निसर्ग आध्यात्म्याच्या प्रमाणे निकोप आरोग्यासाठी -निसर्गात होणाऱ्या बदलानुसार काय खावे हे जर मानव निसर्गाशी इमान राखून एकरूप झाला तर त्याचे पालकत्व व काळजी निसर्ग घेतो . निसर्गात होणाऱ्या बदलानुसार मानव निसर्गाशी एकरूप झाल्याने मनुष्याचे शरीर त्वरित प्राप्त नैसर्गिक परिस्थितीत जुळवून घेते. उदाहरणार्थ -शाकाहारी माणसाला उन्हाळ्यात भूक कमी प्रमाणात होते . कारण बाहेरील कडक उष्णतामान  व मानवाच्या शरीरातील ऊर्जेचे उष्णतामान ह्यांच्या प्रमाणाशी समतोल राखून आपोआप मानव कमी आहार घेतो . म्हणजे शाकाहारी नैसर्गिक आहारापासून शरीरा अंतर्गत व बाह्य  शरीररचना घडते . 

       हिवाळ्यामुळे थंड वातावरणात मनुष्यास भूक मोठ्या प्रमाणावर लागते कारण शरीराला पचनासाठी लागणारी उष्णता ऊर्जेसाठी  व्हेज खाद्य रूपाने मिळते . त्यामुळे शरीर चालवण्यासाठी तू जास्त आहार घे असे निसर्गच अप्रत्यक्षपणे सांगतो . त्यामुळे थंडीचा त्रास होणार नाही. 

           सर्वात महत्वाची बाब म्हणजे निसर्गात जे बदल झपाट्याने होतात तितक्या प्रमाणात मानवाची शरीररचना बदलत नाही म्हणजे.  निसर्ग ज्या वेगात  मध्ये बदलतो त्यावेगाशी आपल्या शरीररचना बदलणे मानवाला जुळवून घ्यावे लागते . उदाहरणार्थ -भारतात ३ मौसम  असतात १) उन्हाळा २)पावसाळा ३)हिवाळा 
ह्याप्रमाणे ऋतू असतात , पण जेव्हा भारतात उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा निसर्गात झपाट्यात बदल होतो त्याप्रमाणे भारतात मानव आपल्या शरीरात बदल करू शकत नाही. त्यामुळे वातावरणात जे व्हायरस वाढतात त्यामुळे शाररिक नाजूक भागावर जलद इन्फेकशन होत असते . त्यामुळे खूप लोकं लगेच आजारी पडतात त्यांचे आरोग्य बिघडते . असे अगदी प्रत्येंक ऋतू बदलताना होत असते . त्यामुळे प्रत्येंक ऋतू बदलानंतर दवाखान्यात आजारी म्हणून माणसाची गर्दी असते . 

                       निसर्गातील बदल व निसर्गाचे स्वरूप मानवामध्ये सामावून घेण्यासाठी मानवाच्या -आचार विचार आहार . ह्यामध्ये सतत बदल करावं लागतो . शरीर प्रकृतीसाठी योग साधना .व शाररिक व्यायाम प्राणायाम . आसने .-आहारासाठी - नैसर्गिक व्हेज आहार . व त्याचे शास्त्र शुध्द नियोजन . विचारासाठी सामाजिक जाणीव .संस्कृतीचे व मानवी आदर्श कामाची विचारसरणी . आरोग्यासाठी निसर्गतःच मिळणारे आयुर्वेदाचा नैसर्गिक औषध उपचार जडी .बुटी. औषधी पानांचे कडवट रस .ह्यांचा वापर केला तर मानवी आरोग्य व मानवी आयुष्य दीर्घायुषी होऊ शकेल. 
                                     




Sunday, 21 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -11।।

                                                             || निसर्ग संपत्ती योगदान -11।।
  
                     आहाराचे मानसशास्त्र -
बरेच लोकं ३/४ कारणांसाठी सतत खात असतात त्यातील प्रकार -
१) फक्त खाण्यासाठी जगणे - मनुष्याला केवळ जिभेला चविष्ठ व खमंग लागते म्हणून खाणारे लोक त्यामध्ये आपल्याला उद्या मिळेल कि नाही ह्या शंकेने आजच सतत खाणे ह्याला विकृती म्हणतात . 
२) फक्त जगण्यासाठी खाणे-आपला आहार घेताना आपले शरीर . मन आरोग्य .व उद्याच्या आहाराचा विचार करून खाणारे लोकं . फक्त ईश्वरावर उद्याचा भरवसा ठेवून खाणारे लोकं , कमी व शरीरास किमान आधार मिळेल म्हणून भविष्यातील आहाराचा विचार करणारे लोकं . त्याचप्रमाणे आपल्याबरोबर ईतर सर्व माणसांना खायला मिळते कि नाही ?ह्यांचा विचार करणारे लोकं ह्यामध्ये मिळतात ,
शाकाहारी मानवास   केव्हा खावे ? कोणत्या वेळी  खावे ? व कोणत्या मौसमात ? ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार किती खावे ? हे त्यांच्या वंशपरंपरानुसार संपूर्ण माहित असते. तर निसर्गातील बदलत्या परंपरेनुसार मानव निसर्गाशी समरसतेने एकरूप झाला तर त्याची काळजी व पालकत्व निसर्गच घेत असतो .. त्यामुळे निसर्गातील बदलास शाकाहारी मनुष्याचे शरीर बरोबर संतुलित होते व निसर्गानुसार बदलण्याचे निर्णय घेते .  

उदाहरणादाखल -१)निसर्गातील बदलांचा जीव .प्राणी ह्यांना अंदाज असतो त्यांना निसर्गतः सहावे इंद्रिय प्राप्त आहे .भूकंपाची जाणीव अगोदर सुक्षम कंपनीद्वारे उंदीर व ईतर प्राण्यांना मिळते . दुसरे उदाहरण म्हणजे साधारणतः उन्हाळ्याच्या गरम मौसमात सर्व मनुष्याची भूक मंद होते कारण बाहेरील उष्णतामान हे मानवाच्या शरीरांतर्गत उष्णतेपेक्षा जास्त असते हे शरीर तापमान बाहेरील तापमानाशी मिळवून घेता यावे म्हणून मानवी आहार कमी प्रमाणात घेतला जातो . म्हणून मानवाने घेतलेल्या नैसर्गिक शाकाहार घेतल्यामुळे किंवा त्या आहाराच्या नित्य सवय ह्यामुळे शाकाहारी व्यक्तीची शरीररचना घडते . थंडीत गार तापमानात आहाराद्वारे उष्णता मिळवण्यासाठी मनुष्याला भूक जास्त लागते . जास्त आहारामुळे उष्णता शरीराला थंड वातावरणातही मिळत असते . शाकाहारी व्यक्ती व निसर्ग एकमेकाला अप्रत्यक्षपणे सांभाळून घेतात . 

त्याप्रमाणे हिवाळ्यात  संत्री हिरवे मटार .मौसंबी सफरचंद पपई फळे खातात उन्हाळ्यात आंबा द्राक्ष खातात . 
पावसाळी मौसमात जांभळे .पालेभाज्या खाल्या जातात .  


Saturday, 20 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -10।।

                                                     || निसर्ग संपत्ती योगदान -१०।।

असले तरी बुद्धिमान मानव निसर्गावर मात करू शकत नाही .तात्पर्य आजही मानव निसर्ग प्रकोपापासून आपल्या बुद्धिमत्तेनुसार फक्त बचाव करू शकतो. निसर्गावर मात करू शकत नाही का ?हा १
फार मोठा प्रश्न आहे, कारण निसर्गाचे समतोल बिघडले तर -महापूर .सुनामी .भूकंप . भीषण आग . युद्धे .दंगली .अतिवृष्टी .-ह्या सर्वामध्ये बरीच मानव व निसर्ग संपत्ती नष्ट होत असते ,हा व अनेक प्रकोपातून मानव नष्ट होऊ शकेल परंतु कालांतराने निसर्ग परत बहरू शकेल पण मानव ह्या प्रकोपातून वाचू शकत नाही . ह्यात मानवाचे निसर्गबद्धल प्रेम वाढत्या आधुनिकीकरणात कमी होत आहे .त्याचा परिणाम मानवालाच भोगावा लागतो तो म्हणजे वाढते प्रदूषण. जंगले नष्ट करून अनेक मजली इमारतीची वाढ . झाडे तोडणे .ह्यामुळे नैसर्गिक संपत्तीबरोबर मानवी संपत्ती नष्ट होत आहे. ह्यामध्ये -मानव जसे निसर्गाशी वागेल तसे  बरोबर त्याचप्रमाणे निसर्गही मानवाशी वागेल . निसर्गाशी एकरूपतेने व प्रेमाने मैत्त्री केली तर ह्या निसर्गाची प्राणशक्ती हीं मानवाच्या विचारांशी सकारात्मकतेने बदलत असते,
निसर्ग व्यवस्थापन -मानवी योग्य नियोजन केले तर निसर्गाच्या मदतीने योग्य नैसर्गिक वातावरणात त्या त्या मौसमातील वातावरणानुसार शेती व पिके भाजीपाला अन्नधान्ये मानव पिकवू शकतो . कोणत्या मौसमात कोणता आहार मानवाला उपयुक्त आहे ह्याचे मार्गदर्शन निसर्ग आपल्या प्रकृतीनुसार करत असतो . 
त्याचा सखोल अभ्यास मानवाने करणे आवश्यक आहे . कारण सर्वात महत्वाचे म्हणजे मानव हा निसर्गाच्या मातीत जन्माला येतो व शेवटी निसर्गाच्या मातीत मिसळून जातो हे एक जागतिक सत्य आहे ते नाकारून चालणार नाही. ह्यासाठी शाकाहारी निसर्गाने मिळणारा आहार मानवी जीवनासाठी आरोग्यपूर्ण आहे. 
निसर्ग शाकाहारी आहाराने वाढता  वाढता .निसर्ग आपण आजारी पडलो तर आपल्या आयुर्वेदिक तंत्राद्वारे आरोग्यपूर्ण करू शकतो .कारण मानव आजारी पडला तर त्याच्या औषधाची जरुरी निसर्गतःच मिळते कारण निसर्गात जंगल डोंगर ह्यामध्ये अनेक औषधी वेगवेगळ्या आजारासाठी मिळणारी जडी बुटी काढा .झाडांची औषधी रसायने आयुर्वेदाद्वारे निसर्गतःच मिळतात . निसर्गात मिळणारी वेगवेगळी फळे त्या त्या मोसमात आपल्याला तंदुरुस्त करतात .वेगवेगळ्या भाज्या पालेभाज्यांमध्ये अमूल्य असे व्हिटॅमिन्स मिनरल आपल्याला मिळतात. म्हणजे निसर्ग आपल्याला जन्मास घालून अप्रतयक्षपणे आपले भरणं पोषण करीत असतो. ह्याची जाणीव प्रत्येंकाने ठेवली पाहिजे .    

|| निसर्ग संपत्ती योगदान -9।।

                                                       || निसर्ग संपत्ती योगदान -9।।

२) भारतात लहरी निसर्गा नुसार पाऊस वेळेवर न पडणे -भारतीय शेती संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे शेतीसाठी बी बियाणे शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर काही विशिष्ट दिवसातच पाणी आवश्यक असते पण पाऊसवेळेवर पडत नाही दरम्यान पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सरकार कडून कर्ज घेतलेले असते ते शेतकरी फेडू शकत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या करतो . त्यामुळे जीवनावश्यक अन्न धान्य ह्यांच्या किमती योग्य आर्थिक नियोजनाअभावी वाढल्या जातात . दलाल काळाबाजार करणारे लोकं शेतमाल भाव पाडून नफा कमवतात . 
त्याचप्रमाणे भारतात शेती व फळ बाजारात चांगल्या गुणवतेचे अन्न धान्य  ह्यामध्ये निकृष्ट गुणवतेचे  धान्य मोठ्या प्रमाणावर भेसळ केले जाते .फळे भाजीपाला हा केमिकल प्रक्रिया करून भेसळ केला जातो. ह्यामध्ये राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर फायदा करवून घेतात . काळाबाजार नफेखोरी ह्या चक्रात सामान्य ग्राहक व शेतकरी अजूनही भरडला जात आहे . ह्याचा परिणाम शाकाहारी आहार पुरेश्या प्रमाणात न  मिळाल्याने श्रीमंत व गरीब ह्यांच्यामधील आर्थिक दरी रुंदावली आहे . त्याचा परिणाम लहान मुले कुपोषित पानाचे प्रमाण व उपासमारीचे प्रमाण वाढत आहे . 
बऱ्याच ठिकाणी असाही दिसते कि मोठ्या धार्मिक संस्था .मोठी लग्न कार्यालये व मोठाली हॉटेल्स हे उरलेले अन्न .रस्त्यावर किंवा गटारीत फेकत आहेत . आता आता २०१५ सालापासून निघालेला अन्न सुरक्षा कायद्याने व सर्व लोकांना समजल्याने हे प्रमाण जण जागृती आणि सामाजिक न्याय ह्यामुळे कमी होण्यास सुरवात झालेली आहे.  
निसर्गचक्र -:
निसर्ग हा पंच महाभूतांचा समतोल अविष्कार असे सर्वज्ञात आहे . निसर्ग हा जमीन .पाणी .वारा .अग्नी व आकाश ह्या घटकांनी विशिष्ट समतोलातून निर्मित झालेला आहे . निसर्ग घडविण्यात एक मोठी प्राण शक्ती असते हि प्राणशक्ती वेळोवेळी निसर्गाचा समतोल राखत असते , हि प्राण शक्ती म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात रहाणाऱ्या  ह्या सृष्टीतील प्राणी व मानव  ह्यांचे नियंत्रण होत असते  . मानव प्राणी ह्यावर नियंत्रण ठेवणारी सर्व व्यापक शक्ती म्हणजे देव भगवान होय ह्या ईश्वरी शक्तीला जगातील प्रत्येंक धर्माचे लोकं वेगवेगळ्या नावाने ओळखतात पण समस्त जगाची ईश्वरी शक्ती फक्त एकच असते . 

परंतु मानव प्राणी हा जगातील  समस्त प्राणिवर्गात सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान मानला जातो .मानवाने स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने अनेक शोध व सुधारणा केल्या वरकरणी हे शोध कितीही श्रेष्ठ.बौद्धिक,वैज्ञानिक .-

|| निसर्ग संपत्ती योगदान -8।।

                                               ।। निसर्ग  संपत्ती योगदान -९ ।।     

गुरुत्वाकर्षण कळाले . म्हणजे सर नवाटांचा शोध लागण्यापूर्वी हि बरेच कोट्यवधी वर्षे गुरुत्वाकर्षण होतेच . 
 आज विकसित देशातील अंतराळ संस्था शोधलेल्या परग्रहांवर तेथील वातावरणानुसार ऑक्सिजन व शेतीसाठी पिके घेता येतात का ह्यांचा शोध घेत आहे . आधुनिक विचारानुसार मानव हा  निसर्ग. भौतिक ज्ञान . मानवी आहार ह्यापलीकडे अज्ञात सृष्टी आहे का ? हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे ते अवकाशात असो व समुद्रतळाशी असो . परग्रहांवर जीव सृष्टी असेल तर त्या वातावरणाचा अभ्यास व संशोधन करून तेथील मातीचे नमुने.रासायनिक घटक . शेतीसाठी कुठल्या वातावरणात पृथ्वीवर पोषक वातावरण शक्य आहे त्यानुसार प्रयोग करून आपल्या देशातील मातीवर प्रयोग करून वेगवेगळे नवीन पिके .धान्य .भाजीपाला व फळे .घेता येतील असा सध्या शास्त्रज्ञांना पूर्ण विश्वास आहे. 
 व्हेज फूड व मानवी जीवन हे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत .चांगले राहणीमान . व चांगला आहार हा फक्त वेग फूडचा जीवनप्रकार आहे . भारतामध्ये मानवी आहाराची गरज लक्षात घेऊन मोठं मोठ्या कंपन्या सध्या एफ. एम. सी जी . प्रॉडक्ट्स म्हणून प्रसिद्ध असून यशस्वी रित्या पुढे वाटचाल करीत आहेत . आजच्या काळात सन    २०१७ मध्ये किरकोळ अनपॅक लूज फूड साठी जि . एस .टी .टॅक्स नाही . व इतर पॅक फूड साठी ज्यांना टॅक्स आहे त्यांना कमी   जि . एस .टी .टॅक्स लावला आहे . ह्या टॅक्स लावण्याच्या मागे मानवतेचा दृष्टिकोन आहे . जेणेकरून खाद्य पदार्थ गोरगरीब लोकांना सहज घेणे परवडेल. हि भूमिका आहे . कारण भारतात अजूनही उपासमार व गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे . भारतीय तत्वज्ञांनुसार अन्न हे परब्रम्ह असे म्हंटलेले आहे . म्हणजे अन्न व आहार हा फक्त माणसाचे पोट भरण्यासाठी नसून मानवाचे आहारामुळे आचार .विचार .व संस्कृती चांगल्या प्रकारे वाढावी . आम्ही जे अन्न फूड खातो व पोट भरतो ते फूड . अन्न हे आमच्या कष्टाचे व इमानदारीने आहे . व देशातील कुठलाही मानव उपाशी राहू नये असा उदात्तविचार व त्यामागे भारतीय सरकारी धोरण आहे . मूलतः भारतामध्ये 'जगा व सर्वाना जगू द्या स्वतः सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू जगवा . हा मानवतेचा संदेश भारतातील सर्व धर्मा मध्ये सांगितला आहे . त्यामुळे भारत हा देश संपूर्ण जगामध्ये निधर्मी राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात विविध धर्मामध्ये त्या त्या धर्मानुसार सण व उत्सवाच्या निमित्ताने .जेवणावळी .अन्नदान .महाप्रसाद हे सर्व गरीब व सर्व थरातील लोकांना दिले जाते . काही धर्म संस्थेत अन्नदान हे गरिबांना रोज दिले जाते.  
१)   वस्तुतः सर्व दृष्टीने भारताचा व्हेज फूड चा अभ्यास केला तर असे हि दिसून येते की -निसर्गातील बदलामुळे व इतर मानवी दुर्लक्षितेमुळे नाशिवंत असणारे शाकाहारी अन्न हायजिनिक तत्वानुसार ह्या अन्नाचा योग्य तापमानात साठा (स्टोरेज) व त्याच्या योग्य मागणीनुसार योग्य आवश्यक ठिकाणी वाटप (वितरण) ह्या सर्वांचे व्यवस्थापन योग्य नाही . त्यामुळे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व मानवी श्रमाबरोबर त्या व्हेज फूड चे हि नुकसान होते .  

|| निसर्ग संपत्ती योगदान -7।।

                                                        || निसर्ग संपत्ती योगदान -7।।


गुरुत्वाकर्षण कळाले . म्हणजे सर न्यूटनचा शोध लागण्यापूर्वी हि बरेच कोट्यवधी वर्षे गुरुत्वाकर्षण होतेच . 
 आज विकसित देशातील अंतराळ संस्था शोधलेल्या परग्रहांवर तेथील वातावरणानुसार ऑक्सिजन व शेतीसाठी पिके घेता येतात का ह्यांचा शोध घेत आहे . आधुनिक विचारानुसार मानव हा  निसर्ग. भौतिक ज्ञान . मानवी आहार ह्यापलीकडे अज्ञात सृष्टी आहे का ? हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे ते अवकाशात असो व समुद्रतळाशी असो . परग्रहांवर जीव सृष्टी असेल तर त्या वातावरणाचा अभ्यास व संशोधन करून तेथील मातीचे नमुने.रासायनिक घटक . शेतीसाठी कुठल्या वातावरणात पृथ्वीवर पोषक वातावरण शक्य आहे त्यानुसार प्रयोग करून आपल्या देशातील मातीवर प्रयोग करून वेगवेगळे नवीन पिके .धान्य .भाजीपाला व फळे .घेता येतील असा सध्या शास्त्रज्ञांना पूर्ण विश्वास आहे. 
 व्हेज फूड व मानवी जीवन हे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत .चांगले राहणीमान . व चांगला आहार हा फक्त वेग फूडचा जीवनप्रकार आहे . भारतामध्ये मानवी आहाराची गरज लक्षात घेऊन मोठं मोठ्या कंपन्या सध्या एफ. एम. सी जी . प्रॉडक्ट्स म्हणून प्रसिद्ध असून यशस्वी रित्या पुढे वाटचाल करीत आहेत . आजच्या काळात सन    २०१७ मध्ये किरकोळ अनपॅक लूज फूड साठी जि . एस .टी .टॅक्स नाही . व इतर पॅक फूड साठी ज्यांना टॅक्स आहे त्यांना कमी   जि . एस .टी .टॅक्स लावला आहे . ह्या टॅक्स लावण्याच्या मागे मानवतेचा दृष्टिकोन आहे . जेणेकरून खाद्य पदार्थ गोरगरीब लोकांना सहज घेणे परवडेल. हि भूमिका आहे . कारण भारतात अजूनही उपासमार व गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे . भारतीय तत्वज्ञांनुसार अन्न हे परब्रम्ह असे म्हंटलेले आहे . म्हणजे अन्न व आहार हा फक्त माणसाचे पोट भरण्यासाठी नसून मानवाचे आहारामुळे आचार .विचार .व संस्कृती चांगल्या प्रकारे वाढावी . आम्ही जे अन्न फूड खातो व पोट भरतो ते फूड . अन्न हे आमच्या कष्टाचे व इमानदारीने आहे . व देशातील कुठलाही मानव उपाशी राहू नये असा उदात्तविचार व त्यामागे भारतीय सरकारी धोरण आहे . मूलतः भारतामध्ये 'जगा व सर्वाना जगू द्या स्वतः सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू जगवा . हा मानवतेचा संदेश भारतातील सर्व धर्मा मध्ये सांगितला आहे . त्यामुळे भारत हा देश संपूर्ण जगामध्ये निधर्मी राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात विविध धर्मामध्ये त्या त्या धर्मानुसार सण व उत्सवाच्या निमित्ताने .जेवणावळी .अन्नदान .महाप्रसाद हे सर्व गरीब व सर्व थरातील लोकांना दिले जाते . काही धर्म संस्थेत अन्नदान हे गरिबांना रोज दिले जाते.  

१)   वस्तुतः सर्व दृष्टीने भारताचा व्हेज फूड चा अभ्यास केला तर असे हि दिसून येते की -निसर्गातील बदलामुळे व इतर मानवी दुर्लक्षितेमुळे नाशिवंत असणारे शाकाहारी अन्न हायजिनिक तत्वानुसार ह्या अन्नाचा योग्य तापमानात साठा (स्टोरेज) व त्याच्या योग्य मागणीनुसार योग्य आवश्यक ठिकाणी वाटप (वितरण) ह्या सर्वांचे व्यवस्थापन योग्य नाही . त्यामुळे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व मानवी श्रमाबरोबर त्या व्हेजफूडचे ही नुकसान होते . 

|| निसर्ग संपत्ती योगदान -6।।

                                               || निसर्ग संपत्ती योगदान -6।।.

बरेच डॉक्टर व आहारतज्ज्ञ असे सांगतात कि " नेहेमी ताजा आहार व ताज्या पालेभाज्या व फळे आहार घयावा  "
हेच सतत डॉक्टर लोकांना सांगावे लागणार असे आपल्या प्राचीन नैसर्गिक सिद्धांताने अप्रत्यक्ष रित्या दाखवून दिले आहे. कारण निसर्गतः भाजिपाला व शिजवलेले अन्न त्या त्या वेळातच उपयोगात आणावे कारण ह्या अन्नातील सकस घटक तत्वे शिळे झाल्यामुळे निघून  जातात ते शरीराला उपयोगी पडू शकत नाही . आपली  हैल्थ व आरोग्य चांगले राहावे हे निसर्गच सांगत असतो . कारण मनुष्याला भूक लागल्यावर शरीरातील अंतःस्राव व पाचकरस तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते त्यामुळे गरम व ताजे अन्न त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते व आपली शरीररचना ते सहज पचवू शकते . शिळ्या व गार अन्नामुळे सकस जीवनसत्वे शरीराला मिळू शकत नाही त्याचा परिणाम पाचक शक्तीवर होतो . 
  खरे तर शाकाहारी आहार हा नुसताच निसर्गामुळे अप्रत्यक्ष प्रक्रिया करून  मिळणारा  आहार आहेच .त्याचप्रमाणे मानवाने आधुनिक हायजेनिक तंत्राद्वारे प्रेरणा घेऊन शाकाहारी आहार केलेला आहे . त्याला कारण व पाश्वभुमी ही आहे कि अप्रत्यक्ष रित्या शाकाहारी हा मानवाच्या अंतर्गत व बहिर्गत जडण घडणीसाठी आवश्यक त्याला देश विदेशात मान्यता आहे . त्यानुसार प्रत्येक देशांच्या अर्थधोरणात प्रामुख्याने व्यापार वृद्धी .आयात -निर्यातिला मोठे स्थान आहे ,अब्जावधी रुपयांची उलाढाल प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेतिल मागणी व पुरवठा ह्यानुसार होत असते
 भारत देशामध्ये ५० % पेक्षा उद्योग व्यवसाय शाकाहारी खाद्य पदार्था नुसार होत असतो . त्यामुळे रोजगाराचे प्रमाणही भारतात सध्याला वाढत आहे ,म्हणजेच व्हेज फूड हे त्या त्या देशानुसार राष्ट्रीय उत्पन्नात भर घालीत आहे. उदाहरण दाखल सध्याच्या घडीला भारतात कित्येक बेरोजगार स्त्री आणि पुरुष हे आपले घर चालवण्यासाठी -नाना तऱ्हेच्या चटण्या व लोणचे पापड त्याचप्रमाणे चपाती भाजी केंद्र चालवीत आहार व बऱ्याच निराधार स्त्रिया व्हेज फूड चालवत आहे व काम करीत आहे . व्हेज फूड हे किरकोळ टपरीपासून ते मोठ्या आलिशान हॉटेलपर्यंत दिवस आणि रात्र काम करीत आहे .भारतात व्हेज चपाती भाजीचा व्यवसाय प्रसिद्ध मुंबईचे डबेवाले उमेदीने बऱ्याच वर्षांपासून करीत आहे .त्यामध्ये हजारो लोकं कामाला आहेत ,
व ह्या आणी  वडापाव पावभाजी वाले करोडपती झालेले आहेत ,व स्वतःच्या ब्रँड नुसार प्रचंड यशस्वी झालेले आहेत .हे फार मोठे शाकाहारी पदार्थांचे काळानुसार सिद्ध झालेले आहे त्यामध्ये कोणतेही दुमत नाही . 
भारतीय शेतीच्या शास्त्रानुसार भारतात अनेक कृषी विद्यापीठे पिके .भाजीपाला .फळे .ह्यांच्या नवं नवीन जाती व प्रकार ह्यांच्या संशोधनात प्रगतिशील आहेत . 

भारतीय प्राचीन तत्वानुसार आकाश म्हणजे अवकाश ह्यांचे नाते हे आहेच .पण हे नाते शोधून व सिद्ध करून सर्व जगाला दाखविण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करीत आहे . गुरुत्वाकर्षणाचा शोध सर एऐझॅक न्यूटनने लावला -म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यामुळे सर्वाना

Friday, 19 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -5।।

                                                    || निसर्ग संपत्ती योगदान -5।।

३) आपल्याला भूक लागली नसताना बळेच इतरांच्या भुकेचा  विचार न करता अन्न खाणे हि  मानवाची ---... राक्षसी  विकृती     ह्याप्रमाणे काळानुसार मानव हा बराच साक्षर झालेला आहे -केवळ सतत शाकाहारी सात्विक आहार घेऊन तो दुसऱ्या मानवाच्या आहाराचाही विचार करीत असतो . महत्वाचे म्हणजे फक्त आपणच जगण्यासाठी जगणे हा आहाराचा  विचार व हेतू न ठेवता आपणही आनंदाने जगू व इतर  मानवालाही आनंदाने जगू देऊ . ह्या उदात्त विचार सरणीच्या तत्वाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे .हि मानवाची वैचारिक विश्व बंधुत्वं निश्चितपणे निसर्गाच्या आध्यात्माकडे जाण्याची सुंदर सुरवात आहे . त्यामुळे आहार आचार विचार संस्कृतीत वाढ होत आहे ही नैसर्गिक सकारात्मकता नाही काय ?..  
सुरुवातीला दिलेल्या ३ मुद्यांबरोबर आता ४ बाब सध्या पुढे येत आहे ती म्हणजे -:
४) मला रोज शरीराला किती आहार लागतो त्या प्रमाणे आहाराचे व त्याला लागणाऱ्या आर्थिक खर्चाचे नियोजन केले जात आहे .   ह्याचा विचार करून इतर मानव जातीसाठी सुद्धा आहार मिळाला पाहिजे ह्या सर्वव्यापक भावनेतून मित आहार हा विचार पुढे येत आहे .ह्यामुळे सर्व मानवाचे आहार व आहार खर्चाचे आर्थिक नियोजन होत आहे . 

   आहाराबाबत सध्याला उदाहरण घ्यावयाचे म्हणजे भारत हा जगात सर्वात मोठी लोकसंख्या असणारा २  नंबरचा देश आहे .

        ह्या मोठ्या लोकसंखेचा आहार फक्त नैसर्गिक साधनांमुळे मिळणार शाकाहारच देऊ शकतो . कारण भारतात नैसर्गिक साधनसामुग्री मोठ्या प्रमाणावर सध्या उपलब्ध आहे . परंतु शेतीचे योग्य नियोजन वातावरणाचा तांत्रिक अभ्यास मोठा प्रमाणावर नाही त्यामुळे भारतात उपासमारी. कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे.
 २) उपलबध साधन सामुग्रीचे वेळच्यावेळी वितरण होत नाही त्यामुळे गरिबी. उपासमार. देशात दिसत आहे त्यामध्ये सुद्धा भारतात जात भेद .राजकारण . गैर आर्थिक नियोजन . भाषा प्रांतवाद .असल्यामुळे लोकसंख्येच्या मानाने सर्वाना योग्य आहार पुरेसा मिळत नाही. योग्य नियोजन केल्यास कमी आर्थिक खर्चात आपली उपजीविका माणूस करू शकतो . शाकाहारामध्ये मिळणाऱ्या धान्य .भाजीपाला .फळे . सर्वात जास्त प्रथिने व मानवी शरीरास मिळणार व्हिटॅमिन्स मिनरल कमी किमतीत मिळू शकतात . 


भारतात शाकाहारी आहारासाठी लागणारी शेतजमीन फक्त भारतात आहे . भारतीय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ असे म्हणतात की -योग्य शेती व निसर्गापासून व जमिनीअंतर्गत पाण्याचा योग्य वापर केला तर भारत हा देश जगातील ६० % मानवाला  धान्य .भाजीपाला .फळे. पुरवू शकतो .  

|| निसर्ग संपत्ती योगदान -4।।

                                                    || निसर्ग संपत्ती योगदान -4।।

प्राचीन काळापासून जगभरात भारत हा शेतीप्रधान विकसनशील देश म्हणून ओळखला जात आहे .  उदाहरणार्थ  केवळ भाजीपाला .दूध ह्यांना योग्य भाव व्यापारापासून न मिळाल्याने ह्या शाकाहारी पदार्थ रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडत आहे . शाकाहारी दूध धान्य ह्यांचा साठा व्यवस्थित होत नाही . त्यामुळे आर्थिक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत असतात . हे सर्वे शाकाहारी घटक मानवी जीवनास आवश्यक असल्यामुळे त्याचा काळाबाजार होऊन वाढत्या भावात मागणीनुसार विकावे लागतात .  

फक्त निसर्ग हा अतिजलद गतीने वातावरणात बदल घडवीत असतो त्याच्या जलद गतीच्या वेगाशी मानव आपल्या प्रगतीचा वेग राखू शकत नाही. निसर्गात काही मिनिटामध्ये वातावरण बदलत असते .लगेच तापमान कमी होऊन कडक थंडी पडते .कधी अचानक जोराचा पाऊस होऊन मानवाचे शेतीचे नुकसान होऊन त्याचे नुकसान केले जाते .कधी प्रखर उष्णता वाढून उष्णतेने शेतात पाणी मिळत नाही . त्यातही निसर्गाच्या बदलानुसार शाकाहारी आहारावर परिणाम होत असतात . साधारण पणे आत्ता केलेला शाकाहारी गरम व ताजा पदार्थ हा काही विशिष्ट तासाने शिळा होतो त्यातील गुणधर्म निघून जातात . ह्यासाठी निसर्ग आपणास अप्रत्यक्षरीत्या आपल्याला सल्ला देतो की मानवाने आपली आहार आचार विचाराची कृती आपल्या निसर्ग नियमानुसार करावी परंतु आजचा शिक्षित मानव हा विज्ञान शास्त्रानुसार फक्त चालत असतो परंतु जर विज्ञान शास्त्रातील शास्त्र शुद्ध व्याख्या सांगते कि इतर परिस्थिती कायम असताना .... मग पुढे भौतिक सिद्धांत त्या व्याख्येनुसार घडतात .पण आजचा शिक्षित मानव हे विसरतो कि वैज्ञानिक सिद्धांत व्याख्येत सुरवातीची  इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे नक्की कोणती परिस्थिती ?  ... तर हि परिस्थिती म्हणजे नैसर्गिक परिस्थिती आहे. तर कोणातही वैज्ञानिक सिद्धांत व्याख्या घडविणे हे संपूर्ण रित्या निसर्गाच्या हातात असते . त्यामुळे आजही आपली जुनी पिढी सांगते कि " मानव विज्ञानामध्ये कितीही पुढे गेला तरी मानव निसर्गावर मात करू शकत नाही . त्यात सुद्धा निसर्ग हा आध्यात्म्यावर अवलंबून असावा कारण काही शिक्षित वैज्ञानिकांनी कितीही मानवी संख्येने कितीही वैज्ञानिक प्रयोग केले तरी निसर्गाचे नियम बदलत नसतात त्यासाठी संपूर्ण मानव जातीचे सहकार्य लागेल . हा एक संशोधनाचा व मानवी आव्हानांचा प्रश्न आहे.  

भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी आहाराबद्धल ३ महत्वाची वाक्क्ये म्हटली जातात ती म्हणजे-"

१) वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्या अत्यंत उपाशी माणसाला अन्न देणे ही --देशाची संस्कृती


२) आपल्या स्वतःला अत्यंत भूक लागल्यावर योग्य वेळी अन्न खाणे ही   मानवाची नैसर्गिक प्रकृती 

|| निसर्ग संपत्ती योगदान -3।।

                                                    || निसर्ग संपत्ती योगदान -3।।

देशात आजारपणाचे व मानवी मृत्यूचे प्रमाण सध्या वाढतच आहे त्याचप्रमांणे उलट वेगवेगळ्या नवीन आजारांची दरवर्षी भर पडत आहे हे नवीन रोग व आजार डॉक्टरांना आजार संशोधनासाठी फार मोठे आवाहन ठरलेले आहे .

एका परदेशी आहारतज्ञाने सांगितले आहे कि बरेच लोकं फक्त आपल्या शरीर रचनेचा विचार ना करता फक्त खमंग चवीसाठी आपल्या जिभेने खातात त्यामध्ये आपल्या शरीरातील पचनसंस्था असण्याऱ्या पोटाचा विचार करीत नाही .कारण आपल्या पोटा मार्फेत संपूर्ण शरीर चालत असते .कारण आपली जीभ हि फक्त तोंडाला लागणाऱ्या चवीचा विचार करते चवीची संवेदना आपला मेंदू प्रथम स्वीकारतो त्यानुसार तो आपल्या बुद्धीला आज्ञा देऊन आपण वागत असतो. थोड्क्यात आपण घेणाऱ्या आहाराचे संतुलन हे जिभेवर नसून आपल्या पोटावर पाहिजे . त्यातही बरेच लोकं अनुकरणाने खातात .व आपल्या पारंपरिक आहाराने खातात खरे तर काय आहार घेऊन आपले शरीर व आहार ह्याचे योग्य संतुलन राहील ह्याचा विचार हार ८० % लोकं करीत नाही . ह्याचे सध्याचे ऐकमवे उदाहरण म्हणजे लोकं सध्या घेत असलेला जंक फूड आहार ह्यामध्ये माणसाचे भरपूर पोट भरते परंतु नुसते पोट भरले तरी ज्या शरीराला व्हिटॅमिन व  प्रथिनांची आवश्यकता असते ते मिळत नाही म्हणजे थोडक्यात -माणूस खाऊन पिऊनही उपाशी असतो .व्हिटॅमिन प्रथिने न मिळाल्याने मनुष्याची प्रकृती बदलत्या हवामानाला टिकाव धरू शकत नाही पर्यायाने तो आजारी पडतो . 

एखादी व्यक्ती एखादा खाद्य पदार्थ आवडतो म्हणून एकाच पदार्थाचा पोटभर आस्वाद घेऊन फक्त पोट भरतो. व ह्या खाण्यामुळे जीवनसत्वे व पाचक रस निर्माण न होता -पोट व छातीमध्ये जळजळ होणे .ऍसिडिटी होणे .पोट सुटणे अनावश्यक शरीरावर चरबी साठणे .हृद्य विकार होणे . शरीरावरची हालचाल मंदावणे . 

      शाकाहार फक्त निसर्गावरच अवलंबून नाही तर त्या त्या देशातील आहार परंपरा .सण ,उत्सव .धार्मिक समारंभ ह्यावरही अवलंबून आहे  ह्यामुले  धर्ममंदिरात होणारे अन्नसत्र अशा अनेक भक्कम संस्कृतीचा पाया असणाऱ्या शाकाहारी भारतीय आहाराची प्राचीन इमारत हि मोठ्या दिमाखाने जगात प्रसिद्ध आहे. 

     कारण जर आपण निसर्गाला जर देव मानत असले तर निसर्ग हा भारतीय तत्वज्ञान जोपासून भारतीय मानवाची संस्कृती हे आहार. आचार .विचार ह्यानुसार गेल्या कितीतरी वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करीत आहे. आहार केवळ आहारावरून आहाराची हायजिनिकता पाळून आज मोठमोठे आर्थिक अब्जावधी रूपायांचे व्यवहार होत आहे . त्यावर आजच्या काळात भारतातील जवळ जवळ ७० % लोकं अवलंबून आहे ,कारण अगदी

Thursday, 18 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -2।।



एकूण पंच महाभूतातून पंच तत्वे विकसित होतात जमिनीतून फळे फुले धान्य निर्मिती होऊन मानवाचे भरणं पोषण होत असते. मानवाचे ५ तत्वे म्हणजे -तिखट , गोड़. आंबट . कडू .तुरट . ह्या पासून मानवी शरीरातील रासायनिक दृष्टीने पोषण होते त्यामुळे मानवी हाडे .मज्जातंतू .स्नायू .बळकट व विकसित होतात .

ह्या पंच महाभूतातील पाच तत्वांपैकी एक तत्व जरी बिघडले तरी मानवी शरीराचे त`संतुलन बिघडते मानव आजारी पडतो व ह्या पंचतत्वांचे संतुलन फक्त निसर्ग करू शकतो . ह्या ५ तत्वांचे योग्य प्रमाण मानवी शरीराला आवश्यक आहे . 

ह्या संदर्भात आपल्याला पंचकुर आहाराची कल्पना देता येइल .निसर्गातील पाच तत्त्वापासून मिळणार आहार म्हणजे पंचकुर आहार होय डॉक्टर आपल्याला आहारामध्ये कडधान्ये .उसळी व पालेभाज्या घेण्यास सांगतात कारण हरभरा ,हिरवे वाटणे ,शेंगदाणे .मटकी ,मूग .चवळी  ह्या पाच मध्ये पंचाम्हाभूतांतील तत्वांचा समावेश होतो . आपल्या पालेभाज्यांमध्ये मानवी गंभीर आजारावर पण उपाय आहेत .भाज्यांमध्ये कारले .मेथी .ह्या अत्यंत कडवट भाज्यांमध्ये मधुमेह . कंट्रोल होतो . आजारी पडलेल्या  व्यक्तीला शरीरासाठी संत्री. मोसंबी. व इतर फळांचा रस दिला जातो. ह्या फळांच्या रसामुळे आजारी व्यक्तीचे रक्त शुद्ध होते केवळ हलका भात व फळे सेवन करून आजारी व्यक्ती चे आरोग्य चांगले राहते. 

निसर्ग आपल्याला चौफेर आहार देतोच देतो त्याचप्रमाणे आपल्याला .तुळस. हळद. गूळ . कोरफड . कारले .मेथी कोथिंबीर व अन्य ह्या द्वारे मिळणाऱ्या औषधी तत्वामुळे शरीरात केमिकल प्रक्रिया होऊन शरीर तंदुरुस्त  होण्यास मदत हि होते . 

निसर्गातील विज्ञान व  औषधी तत्वे समजण्यासाठी त्यातील आहारतज्ज्ञ आपण कोणत्यावेळी ,कोणत्या वातावरणात काय आहार घ्यावा ह्याचे निसर्ग घटकांचा अभ्यास करून त्या त्या आजारी .व निरोगी व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन करतात .

परंतु भारतात अजूनही आहाराच्या बाबतीत मोट्या प्रमाणावर मतभेद आहेत ,

जागतिक आहार तज्ज्ञांच्या  मतानुसार शाकाहारी आहाराबद्दल दुमत आहे. बरेच लोकं मांसाहाराशिवाय पर्याय नाही असे म्हणतात . त्यांच्या मतानुसार मांसाहारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने व जीवनसत्वे असतात ,असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, ह्या एकूण शाकाहार व मांसाहार ह्या वादावरून आपण काय खावे व काय खाऊ नये ह्याबाबत जनतेला पूर्ण माहिती व ज्ञान नाही .असे सिद्ध होते . ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे दोन्ही आहार घेऊन सुद्धा सर्व-



|| निसर्ग संपत्ती योगदान -१।।

   मानवी शरीर रचनेनुसार प्रामुख्याने केला जाणारा आहार म्हणजे शाकाहारी आहार . निसर्गापासून मिळणारे अन्नघटकांचा प्रामुख्याने उपयोग शरीर व मनाला .तरतरी ,टिकाऊपणा .व अन्नपोषणाबरोबर  मानवाचे दैनदिन कर्म करण्यासाठी मिळणारा उत्साह . शाकाहारी आहार बऱ्याच अंशी निसर्ग अभ्यासानुसार त्यांच्या पूर्व पारंपरिक पद्धतीनुसार मानव घेत आलेला आहे.

त्या त्या देशातील संस्कृती.उत्सव .फेस्टिवल .स्पर्धा . स्पोर्ट्स .परंपरा  ह्या मधून त्या त्या देशातील मानवाचे मन व शरीर सतत उत्साही राहत असते. त्यामुळे त्याला आहाराची जोड़ असलीच पाहिजे . मानव हा समाजप्रिय व बुद्धिमान समजला जातो . भारतामध्ये शाकाहार लोकप्रिय असण्याचे प्रमुख कारण म्हणजे -पूर्वीपासून निसर्गाचे म्हणजेच निसर्गापासून मिळण्याऱ्या शाकाहारी आहाराचे प्रमुख स्थान मानवी आहारात आहे . भारतीय तत्वज्ञानानुसार मानवाला निसर्गपुत्र मानवाचा परमपिता समजले जाते. आपले मन व शरीर ह्यांचा संगम फक्त नैसर्गिक आहारामुळे होत असतो . कारण निसर्ग आपल्या शाकाहारी आहाराद्वारे मानवाला शेवटपर्यंत सांभाळत असतो . कारण निसर्गामुळे जमिनीत मिळणारे धान्ये भाजीपाला हे प्रमुख अन्न मानवाला जमिनीत शास्त्रशुद्ध रीतीने  शेती केल्यामुळे  मिळत असते .हि शेती मानवाने चांगल्या पद्धतीने केल्यामुळे ह्या बदलत्या निसर्गनियमाने मानवाचे जीवन जर बदलले तर -मानवाने निसर्गाला मित्र मानून आपले जीवन त्याच बरोबर इतर मानवाचे जीवन यशस्वी होऊ शकते. आणी म्हणूनच असे सांगतात कि -  नॅचरल सौन्दर्य हे अमर असते ते सौन्दर्य कृत्रिम असते तर टिकले नसते.

आपला आहार जर निसर्गानुसार व आपल्या पवित्र धार्मिक तत्वानुसार ठेवला तर मानवाचे आयुष्य चांगल्याप्रकारे घडत असते .. विज्ञान नियम सांगतो की एक्शन झाल्यावर त्या विरुद्ध  लगेच  रीएक्शन  हि होतच असते ..

पंचमहाभूते व पंचतत्त्व - ह्या आपल्या निसर्गामध्ये मानवाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे .ह्या पंचमहाभूतांच्या कृपेने मानव शरीरातील पंच तत्वे निर्माण झालेली आहे ..-

पंचमहाभूते म्हणजे -आकाश ,पाणी ,वारा (वात ), अग्नी. भूमी (जमीन ).ह्या प्रमाणे आहेत ,प्रामुख्याने ह्या पाच तत्वानुसार -निसर्गातून अन्न निर्मिती होत असते .आपल्या पुरातन इतिहासानुसार  मानव जसा आदिमानवानुसार विकसित होत गेला म्हणजे मानवी बुद्धी व शरीर काळानुसार जसे विकसित होत गेले तेव्हापासून निसर्ग आपल्या बरोबर आहे कि जो निसर्ग आजसुद्धा मानव आपल्या प्रचंड बुद्धीने विकसित झाला तरी आज आधुनिक काळातही तो आपल्या बरोबर आहे किंवा  आपण मानव कधीच निसर्गावर मात करू शकत नाही तर मानव निसर्गाच्या साथीने विकसित होत आहे .जेव्हा कधी.... निसर्ग संपेतत्वे विकसित होऊन ल तेव्हा निसर्गाच्या 2आधीच मानव संपलेला असेल , हे विज्ञान कितीही विकसित झाले तरी मनुष्य निसर्गविना अपुरा आहे .


Natural Veg Food Background-: ।।नैसर्गिक `व्हेज फूडची पाश्वभुमी ।।

                                                  ।।नैसर्गिक `व्हेज फूडची पाश्वभुमी ।।
                                                                      

          व्हिक्टरी -विजय  .. किती सुंदर उत्साह वर्धक शब्ध -  पण विजय म्हणजे फक्त कोणत्या मानवी युद्धाचा किंवा एखादा स्पर्धेचा नाही तर . मानवाने निसर्गाच्या मदतीने . निसर्गाच्या मार्गदर्शनाने मिळवलेला आपल्या अमर निरोगी मानवी आयुष्याचा  विजय आहे.   म्हणजे मानवाने आपल्या जन्मात लाभलेल्या बुद्धिमतेनुसार कोणता आहार घेऊन मानव निरोगी व यशस्वी आयुष्य जगू शकतो . ह्याचा लावलेला अभ्यासपूर्ण व आपल्या आदिमानवाच्या वंशजांच्या आहारावर मिळवलेला विजय . 

                          पूर्वी मानव आदिमानव असताना निसर्गाच्या विरुद्ध आहार घेत होता . केवळ जंगलात दिसेल त्या प्राण्याची हत्या करून त्याना मारूंन .त्यांचे मास खाऊन आयुष्य जगत होता.   जगण्यासाठी व आहार मिळवण्यासाठी लागणाऱ्या इंधना साठी  जंगलात व वनात जाऊन झाडांची तोड करून जाळण्यासाठी व स्वतःला राहण्यासाठी लाकडी सरपण म्हणून उपयोग करत होता . आहारासाठी सततच्या प्राण्याच्या हत्त्या . 
व लाकडी सरपणासाठी जंगलतोड त्यामुळे आपले पूर्वज अज्ञानाने जीवन जगत होते. व स्वतःचे नुकसान करीत होते त्यांच्या ह्या कृत्याने ते  निसर्गाच्या  समतोलाचा पर्यावरणाचा विचार करीत नव्हते . त्यांच्या रानटी पणामुळे त्यांची विचार आचार पण रानटी होत होते . 
       
                   जस जशी मानवी विचारसरणी निसर्गाचे महत्व समजू लागली  तेव्हा मानव मग निसर्गाच्या मदतीने शेती करू लागला व आपला आहार जमिनीमध्ये धान्य पिकवून आपला आहार घेऊ लागला . 
आपण निसर्गाच्या मदतीने जगलो तर आपण निरोगी राहू शकू एवढे मात्र त्या प्राचीन मानवाला कळू लागले होते . 
          त्यानंतर मानवी बुद्धी जसजशी विकसित होत गेली-  तस तशी त्याची विचार शक्ती वाढत गेली कि तो विचार करू लागला -'आपण प्राण्याची हत्त्या करून त्यांचे मास खाऊन पोट भरावयाचे  व जंगलच्या प्राण्यांनी सुद्धा दुसऱ्या प्राण्याची हत्या  करून त्या प्राण्यांनी दुसऱ्या प्राण्याचे मास खायचे मग.. आपण मानव व इतर प्राणी जनावरे ह्यांच्यात फरक काय ? आपल्या मानवाला निसर्गतः बुद्धी दिली आहे आपण विचार करू शकतो मग आपल्याला मिळणारा आहार हा आपण निसर्गतःच शोधला पाहिजे . ह्या विचाराने मानव विकसित होत गेला . व मानव आपल्या अवती भवतीच्या निसर्गाला आवाहन देऊन .निसर्गाचा शोध घेऊ लागला . 
     
               निसर्गाचा शोध घेता घेता तो निसर्गाच्या साथीने शेतीचे आहाराचा  शोध घेऊ लागला तेव्हा त्याला निरनिराळे औषधी वनस्पती. भाज्या .फळ फळे ह्यांच्या मधुर व कसदार चवीने मानव अत्यंत आनंदित होऊन त्यांचा आहार घेऊ लागला . तेव्हा त्यांना संशोधन करून असे कळले कि आपणच नाही तर निसर्गातील अत्यंत बलवान प्राणी शाकाहारी आहेत ते मास खाऊन पोट भरत नाही केवळ निसर्गात मिळणारा आहार ते घेतात . उदाहरणार्थ -हत्ती. माकड .व इतर वन्य प्राणी त्यांच्या आरोग्य व आहाराने मानवाला आवाहन देत होत्या . 

                  त्यानंतर मानव त्याच्या सुधारित विचाराने कपडे घालू लागला  कपड्यासाठी लागणार कापूस त्याला निसर्गाचा शोध लागल्यामुळे मिळाला . मग मानव कापूस पिकवून त्यांच्यावर संशोधन करून वेगवेगळे कपडे घालू लागला कपडे शिवू लागला . त्यानंतर जंगलातील लाकडे तोडून घरे बांधणारा मानव घरासाठी पक्की माती शोधून घरे बांधू लागला .नंतर जसा मानव बुद्धीने विकसित होत गेला तसा घरासाठी नित्य वाहतुकीसाठी लोखंड व इतर खनिजे शोधू लागला  हि खनिजे त्याला खाण म्हणजे निसर्गतःच मिळाले . लोखंडाचा शोध लागल्यावर तो जलद वाहतुकीसाठी वाहने तयार करू लागलं . मानवाच्या विकासाच्या सर्व टप्प्यावर निसर्ग मानवास साथ देऊ लागला . व मानव विकसित होत गेला कि हि विकसितपणाची प्रक्रिया अजूनही चालू आहे . 

               मग मानव निसर्गाला  समजून घेता घेता निसर्गाला देव व परम पिता मानत गेला . कारण मानवाच्या ३ मूलभूत गरजा निसर्गातूनच मिळाल्या -अन्न -वस्त्र -निवारा .  ह्यात अन्न म्हणून भाजीपाला .फळे धान्य .वस्त्र म्हणजे -कापूस .ताग . रेशीम . इत्यादी बराच काही . निवारा म्हणून -लोखंड. लाकूड खाणीतले खनिजे . 
  
             अजूनही भारतात नवीन इमारत .कारखाना .अवजड  मशीनरी .ह्यांच्या कारखान्यामध्ये .दसऱ्याचा दिवशी व उद्योग उभारताना भूमिपूजन केले जाते . शेतकरी पावसाळाच्या वेळी नांगराची प्रथम पूजा करून शेती करण्यास सुरुवात करतात . नवीन पिकलेल्या पिकाची.  धान्याची .पूजा करतात . व त्याचा प्रथम वाटा देवाला व गरिबांना दान करतात . निसर्गाला देव मानता मानता एक सुंदर पवित्र मानवी संस्कृतीची अमर धारा जन्माला आली ,

    हि दीर्घ आयुष्याची सुंदर कहाणी निसर्ग माहात्म्यामुळे सुरु आहे कारण गेले अनेक वर्षे अगदी कितीतरी हजारो वर्षांपासून निसर्ग अमर आहे कि मानवाच्या किती तरी पिढ्यांच्या जन्माआधी पासून निसर्ग आहे त्याला समजून घेतले तर तो तंतोतंत मानवाच्या परम पित्याची भूमिका जागवून दाखवतो . 

      आपले आरोग्य सांभाळणारा . आपल्या किमयातून माणसाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जगवणारा . आपल्याकडील दुर्मिळ खजिना दाखवण्यास मानवाला आवाहन देणारा . अगदी आपल्या मोटार गाड्या .दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल . `डिझेल.समुद्रातून व जमिनीतून देणारा   फक्त निसर्गच आहे