Thursday, 18 January 2018

Natural Veg Food Background-: ।।नैसर्गिक `व्हेज फूडची पाश्वभुमी ।।

                                                  ।।नैसर्गिक `व्हेज फूडची पाश्वभुमी ।।
                                                                      

          व्हिक्टरी -विजय  .. किती सुंदर उत्साह वर्धक शब्ध -  पण विजय म्हणजे फक्त कोणत्या मानवी युद्धाचा किंवा एखादा स्पर्धेचा नाही तर . मानवाने निसर्गाच्या मदतीने . निसर्गाच्या मार्गदर्शनाने मिळवलेला आपल्या अमर निरोगी मानवी आयुष्याचा  विजय आहे.   म्हणजे मानवाने आपल्या जन्मात लाभलेल्या बुद्धिमतेनुसार कोणता आहार घेऊन मानव निरोगी व यशस्वी आयुष्य जगू शकतो . ह्याचा लावलेला अभ्यासपूर्ण व आपल्या आदिमानवाच्या वंशजांच्या आहारावर मिळवलेला विजय . 

                          पूर्वी मानव आदिमानव असताना निसर्गाच्या विरुद्ध आहार घेत होता . केवळ जंगलात दिसेल त्या प्राण्याची हत्या करून त्याना मारूंन .त्यांचे मास खाऊन आयुष्य जगत होता.   जगण्यासाठी व आहार मिळवण्यासाठी लागणाऱ्या इंधना साठी  जंगलात व वनात जाऊन झाडांची तोड करून जाळण्यासाठी व स्वतःला राहण्यासाठी लाकडी सरपण म्हणून उपयोग करत होता . आहारासाठी सततच्या प्राण्याच्या हत्त्या . 
व लाकडी सरपणासाठी जंगलतोड त्यामुळे आपले पूर्वज अज्ञानाने जीवन जगत होते. व स्वतःचे नुकसान करीत होते त्यांच्या ह्या कृत्याने ते  निसर्गाच्या  समतोलाचा पर्यावरणाचा विचार करीत नव्हते . त्यांच्या रानटी पणामुळे त्यांची विचार आचार पण रानटी होत होते . 
       
                   जस जशी मानवी विचारसरणी निसर्गाचे महत्व समजू लागली  तेव्हा मानव मग निसर्गाच्या मदतीने शेती करू लागला व आपला आहार जमिनीमध्ये धान्य पिकवून आपला आहार घेऊ लागला . 
आपण निसर्गाच्या मदतीने जगलो तर आपण निरोगी राहू शकू एवढे मात्र त्या प्राचीन मानवाला कळू लागले होते . 
          त्यानंतर मानवी बुद्धी जसजशी विकसित होत गेली-  तस तशी त्याची विचार शक्ती वाढत गेली कि तो विचार करू लागला -'आपण प्राण्याची हत्त्या करून त्यांचे मास खाऊन पोट भरावयाचे  व जंगलच्या प्राण्यांनी सुद्धा दुसऱ्या प्राण्याची हत्या  करून त्या प्राण्यांनी दुसऱ्या प्राण्याचे मास खायचे मग.. आपण मानव व इतर प्राणी जनावरे ह्यांच्यात फरक काय ? आपल्या मानवाला निसर्गतः बुद्धी दिली आहे आपण विचार करू शकतो मग आपल्याला मिळणारा आहार हा आपण निसर्गतःच शोधला पाहिजे . ह्या विचाराने मानव विकसित होत गेला . व मानव आपल्या अवती भवतीच्या निसर्गाला आवाहन देऊन .निसर्गाचा शोध घेऊ लागला . 
     
               निसर्गाचा शोध घेता घेता तो निसर्गाच्या साथीने शेतीचे आहाराचा  शोध घेऊ लागला तेव्हा त्याला निरनिराळे औषधी वनस्पती. भाज्या .फळ फळे ह्यांच्या मधुर व कसदार चवीने मानव अत्यंत आनंदित होऊन त्यांचा आहार घेऊ लागला . तेव्हा त्यांना संशोधन करून असे कळले कि आपणच नाही तर निसर्गातील अत्यंत बलवान प्राणी शाकाहारी आहेत ते मास खाऊन पोट भरत नाही केवळ निसर्गात मिळणारा आहार ते घेतात . उदाहरणार्थ -हत्ती. माकड .व इतर वन्य प्राणी त्यांच्या आरोग्य व आहाराने मानवाला आवाहन देत होत्या . 

                  त्यानंतर मानव त्याच्या सुधारित विचाराने कपडे घालू लागला  कपड्यासाठी लागणार कापूस त्याला निसर्गाचा शोध लागल्यामुळे मिळाला . मग मानव कापूस पिकवून त्यांच्यावर संशोधन करून वेगवेगळे कपडे घालू लागला कपडे शिवू लागला . त्यानंतर जंगलातील लाकडे तोडून घरे बांधणारा मानव घरासाठी पक्की माती शोधून घरे बांधू लागला .नंतर जसा मानव बुद्धीने विकसित होत गेला तसा घरासाठी नित्य वाहतुकीसाठी लोखंड व इतर खनिजे शोधू लागला  हि खनिजे त्याला खाण म्हणजे निसर्गतःच मिळाले . लोखंडाचा शोध लागल्यावर तो जलद वाहतुकीसाठी वाहने तयार करू लागलं . मानवाच्या विकासाच्या सर्व टप्प्यावर निसर्ग मानवास साथ देऊ लागला . व मानव विकसित होत गेला कि हि विकसितपणाची प्रक्रिया अजूनही चालू आहे . 

               मग मानव निसर्गाला  समजून घेता घेता निसर्गाला देव व परम पिता मानत गेला . कारण मानवाच्या ३ मूलभूत गरजा निसर्गातूनच मिळाल्या -अन्न -वस्त्र -निवारा .  ह्यात अन्न म्हणून भाजीपाला .फळे धान्य .वस्त्र म्हणजे -कापूस .ताग . रेशीम . इत्यादी बराच काही . निवारा म्हणून -लोखंड. लाकूड खाणीतले खनिजे . 
  
             अजूनही भारतात नवीन इमारत .कारखाना .अवजड  मशीनरी .ह्यांच्या कारखान्यामध्ये .दसऱ्याचा दिवशी व उद्योग उभारताना भूमिपूजन केले जाते . शेतकरी पावसाळाच्या वेळी नांगराची प्रथम पूजा करून शेती करण्यास सुरुवात करतात . नवीन पिकलेल्या पिकाची.  धान्याची .पूजा करतात . व त्याचा प्रथम वाटा देवाला व गरिबांना दान करतात . निसर्गाला देव मानता मानता एक सुंदर पवित्र मानवी संस्कृतीची अमर धारा जन्माला आली ,

    हि दीर्घ आयुष्याची सुंदर कहाणी निसर्ग माहात्म्यामुळे सुरु आहे कारण गेले अनेक वर्षे अगदी कितीतरी हजारो वर्षांपासून निसर्ग अमर आहे कि मानवाच्या किती तरी पिढ्यांच्या जन्माआधी पासून निसर्ग आहे त्याला समजून घेतले तर तो तंतोतंत मानवाच्या परम पित्याची भूमिका जागवून दाखवतो . 

      आपले आरोग्य सांभाळणारा . आपल्या किमयातून माणसाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जगवणारा . आपल्याकडील दुर्मिळ खजिना दाखवण्यास मानवाला आवाहन देणारा . अगदी आपल्या मोटार गाड्या .दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल . `डिझेल.समुद्रातून व जमिनीतून देणारा   फक्त निसर्गच आहे 





  

No comments:

Post a Comment