Saturday, 20 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -9।।

                                                       || निसर्ग संपत्ती योगदान -9।।

२) भारतात लहरी निसर्गा नुसार पाऊस वेळेवर न पडणे -भारतीय शेती संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे शेतीसाठी बी बियाणे शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर काही विशिष्ट दिवसातच पाणी आवश्यक असते पण पाऊसवेळेवर पडत नाही दरम्यान पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सरकार कडून कर्ज घेतलेले असते ते शेतकरी फेडू शकत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या करतो . त्यामुळे जीवनावश्यक अन्न धान्य ह्यांच्या किमती योग्य आर्थिक नियोजनाअभावी वाढल्या जातात . दलाल काळाबाजार करणारे लोकं शेतमाल भाव पाडून नफा कमवतात . 
त्याचप्रमाणे भारतात शेती व फळ बाजारात चांगल्या गुणवतेचे अन्न धान्य  ह्यामध्ये निकृष्ट गुणवतेचे  धान्य मोठ्या प्रमाणावर भेसळ केले जाते .फळे भाजीपाला हा केमिकल प्रक्रिया करून भेसळ केला जातो. ह्यामध्ये राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर फायदा करवून घेतात . काळाबाजार नफेखोरी ह्या चक्रात सामान्य ग्राहक व शेतकरी अजूनही भरडला जात आहे . ह्याचा परिणाम शाकाहारी आहार पुरेश्या प्रमाणात न  मिळाल्याने श्रीमंत व गरीब ह्यांच्यामधील आर्थिक दरी रुंदावली आहे . त्याचा परिणाम लहान मुले कुपोषित पानाचे प्रमाण व उपासमारीचे प्रमाण वाढत आहे . 
बऱ्याच ठिकाणी असाही दिसते कि मोठ्या धार्मिक संस्था .मोठी लग्न कार्यालये व मोठाली हॉटेल्स हे उरलेले अन्न .रस्त्यावर किंवा गटारीत फेकत आहेत . आता आता २०१५ सालापासून निघालेला अन्न सुरक्षा कायद्याने व सर्व लोकांना समजल्याने हे प्रमाण जण जागृती आणि सामाजिक न्याय ह्यामुळे कमी होण्यास सुरवात झालेली आहे.  
निसर्गचक्र -:
निसर्ग हा पंच महाभूतांचा समतोल अविष्कार असे सर्वज्ञात आहे . निसर्ग हा जमीन .पाणी .वारा .अग्नी व आकाश ह्या घटकांनी विशिष्ट समतोलातून निर्मित झालेला आहे . निसर्ग घडविण्यात एक मोठी प्राण शक्ती असते हि प्राणशक्ती वेळोवेळी निसर्गाचा समतोल राखत असते , हि प्राण शक्ती म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात रहाणाऱ्या  ह्या सृष्टीतील प्राणी व मानव  ह्यांचे नियंत्रण होत असते  . मानव प्राणी ह्यावर नियंत्रण ठेवणारी सर्व व्यापक शक्ती म्हणजे देव भगवान होय ह्या ईश्वरी शक्तीला जगातील प्रत्येंक धर्माचे लोकं वेगवेगळ्या नावाने ओळखतात पण समस्त जगाची ईश्वरी शक्ती फक्त एकच असते . 

परंतु मानव प्राणी हा जगातील  समस्त प्राणिवर्गात सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान मानला जातो .मानवाने स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने अनेक शोध व सुधारणा केल्या वरकरणी हे शोध कितीही श्रेष्ठ.बौद्धिक,वैज्ञानिक .-

No comments:

Post a Comment