Thursday, 18 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -१।।

   मानवी शरीर रचनेनुसार प्रामुख्याने केला जाणारा आहार म्हणजे शाकाहारी आहार . निसर्गापासून मिळणारे अन्नघटकांचा प्रामुख्याने उपयोग शरीर व मनाला .तरतरी ,टिकाऊपणा .व अन्नपोषणाबरोबर  मानवाचे दैनदिन कर्म करण्यासाठी मिळणारा उत्साह . शाकाहारी आहार बऱ्याच अंशी निसर्ग अभ्यासानुसार त्यांच्या पूर्व पारंपरिक पद्धतीनुसार मानव घेत आलेला आहे.

त्या त्या देशातील संस्कृती.उत्सव .फेस्टिवल .स्पर्धा . स्पोर्ट्स .परंपरा  ह्या मधून त्या त्या देशातील मानवाचे मन व शरीर सतत उत्साही राहत असते. त्यामुळे त्याला आहाराची जोड़ असलीच पाहिजे . मानव हा समाजप्रिय व बुद्धिमान समजला जातो . भारतामध्ये शाकाहार लोकप्रिय असण्याचे प्रमुख कारण म्हणजे -पूर्वीपासून निसर्गाचे म्हणजेच निसर्गापासून मिळण्याऱ्या शाकाहारी आहाराचे प्रमुख स्थान मानवी आहारात आहे . भारतीय तत्वज्ञानानुसार मानवाला निसर्गपुत्र मानवाचा परमपिता समजले जाते. आपले मन व शरीर ह्यांचा संगम फक्त नैसर्गिक आहारामुळे होत असतो . कारण निसर्ग आपल्या शाकाहारी आहाराद्वारे मानवाला शेवटपर्यंत सांभाळत असतो . कारण निसर्गामुळे जमिनीत मिळणारे धान्ये भाजीपाला हे प्रमुख अन्न मानवाला जमिनीत शास्त्रशुद्ध रीतीने  शेती केल्यामुळे  मिळत असते .हि शेती मानवाने चांगल्या पद्धतीने केल्यामुळे ह्या बदलत्या निसर्गनियमाने मानवाचे जीवन जर बदलले तर -मानवाने निसर्गाला मित्र मानून आपले जीवन त्याच बरोबर इतर मानवाचे जीवन यशस्वी होऊ शकते. आणी म्हणूनच असे सांगतात कि -  नॅचरल सौन्दर्य हे अमर असते ते सौन्दर्य कृत्रिम असते तर टिकले नसते.

आपला आहार जर निसर्गानुसार व आपल्या पवित्र धार्मिक तत्वानुसार ठेवला तर मानवाचे आयुष्य चांगल्याप्रकारे घडत असते .. विज्ञान नियम सांगतो की एक्शन झाल्यावर त्या विरुद्ध  लगेच  रीएक्शन  हि होतच असते ..

पंचमहाभूते व पंचतत्त्व - ह्या आपल्या निसर्गामध्ये मानवाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे .ह्या पंचमहाभूतांच्या कृपेने मानव शरीरातील पंच तत्वे निर्माण झालेली आहे ..-

पंचमहाभूते म्हणजे -आकाश ,पाणी ,वारा (वात ), अग्नी. भूमी (जमीन ).ह्या प्रमाणे आहेत ,प्रामुख्याने ह्या पाच तत्वानुसार -निसर्गातून अन्न निर्मिती होत असते .आपल्या पुरातन इतिहासानुसार  मानव जसा आदिमानवानुसार विकसित होत गेला म्हणजे मानवी बुद्धी व शरीर काळानुसार जसे विकसित होत गेले तेव्हापासून निसर्ग आपल्या बरोबर आहे कि जो निसर्ग आजसुद्धा मानव आपल्या प्रचंड बुद्धीने विकसित झाला तरी आज आधुनिक काळातही तो आपल्या बरोबर आहे किंवा  आपण मानव कधीच निसर्गावर मात करू शकत नाही तर मानव निसर्गाच्या साथीने विकसित होत आहे .जेव्हा कधी.... निसर्ग संपेतत्वे विकसित होऊन ल तेव्हा निसर्गाच्या 2आधीच मानव संपलेला असेल , हे विज्ञान कितीही विकसित झाले तरी मनुष्य निसर्गविना अपुरा आहे .


No comments:

Post a Comment