Friday, 30 March 2018

।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

                                  ।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

             मेट्रो सिटीबरोबर छोट्या छोट्या शहरांमध्येही प्रदूषण . खराब जीवनशैली . ताण ह्यांचा नकारात्मक परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे . आपल्या शरीराचा अनेक विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करायला हवा . खरे तर मानवी शरीरातून वेस्ट . रसायने . विषारी पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला " डिटॉक्स " असे म्हणतात ,
             जर तुम्हाला आळसावल्यासारखे . अस्वस्थ . थकल्यासारखे . जाणवत असेल तर "डिटॉक्स " हा त्याच्यासाठी चांगला उपाय आहे . त्यामुळे तुमची एनर्जी लेवल वाढू शकते . तसेच त्वचाही साफ होते (क्लीन )
आणि पेशींची ताकदही वाढते . चांगल्या आरोग्यासाठी तन व मन दोन्ही निरोगी रहाणे आवश्यक आहे . 
  
            डॉक्टर बेन किम ह्यांनी शरीर स्वासच`स्वच्छ रहाण्यासाठी डिटॉक्स प्रोग्रॅम तयार केला आहे . ह्यामुळे शरीराचे वजन उंचीनुसार नियंत्रित रहात नाही तर त्यामुळे निरोगी जीवनशैली टिकून रहाण्यास मदत होते . खरे तर डिटॉक्स डाएट आणि नॅचरल हेअल्थ प्रोग्रॅम वजन कमी करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता . सध्याच्या काळात आपल्या शरीरावर अनारोग्यादायी आहार , ताण , प्रदूषण , वाईट जीवन शैलीचा परनीआं होत आहे . त्यामुळे शरीरावर वाईट घटकांचा हल्ला होतो . आशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकत असाल तर डिटॉक्स प्रोग्रॅमची तुम्हाला निश्चितपणे मदत होईल . त्यामुळे शरीराची आतुन स्वच्छता होईल . बरेच लोकं ह्यासाठी उपास करतात . पण ह्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतुलित आहार . आणि व्यायाम करणे हा आहे . 

      पाणी प्या -: तहानेकडे कधीच दुर्लक्ष करू नका . भरपूर पाणी प्यायला हवे . ह्याशिवाय पाणीदार फळे . -
काकडी . टरबूज . कलिंगड . टॉमॅटो चेही सेवन अधिक प्रमाणात करावयास हवे . एवढेच नाही  तर तुम्हाला 
चिप्स . कुकीज . ब्रॉउनिज . पेस्टीज ह्यापासून दूर राहावयास हवे . 

शांत झोप -: " लवकर झोपणे आणी लवकर उठणे " मुखतः आपली घरची ऑफिस .कारखाने ह्यांची कामे दिवसभर करणे (शक्यतो परिस्थितीप्रमाणे ) हि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व नैसर्गिक सवय आहे . कारण निसर्ग तत्वानुसार सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत (सन रायीझ तो सन सेट ) पर्यंत कामाची विभागणी हवी . त्यामुळे आपले मानवी शरीर बदलत्या नेसर्गिक परिस्थितीशी अनुकूल राहते. पण ह्याचे चांगले परिणाम तेव्हाच मिळतात . जेव्हा आपण आपल्या शरीराच्या  स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देतो . खूप गरम किंवा खूप थंड खोलीत झोपू नये . झोपताना खोलीचे तापमान संतुलित असेल ह्याची काळजी घ्यावी . तुमचा डिटॉक्स प्रोग्रॅम तेव्हाच यशस्वी होईल तेव्हा तुम्ही आठ तास व्यवस्थित झोपाल . 

मसाज -: शरीर निरोगी रहाण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याबरोबर मसाज थेरपी ही उपयुक्त ठरते . जर स्पा ट्रेंटमेण्टचा खर्च तुमच्या खिशाला परवडत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करू शकतो. ज्या व्यक्ती ऑफिसेमध्य तासंतास खुर्चीवर  बसून काम करतात त्यांचे मान . हाथ ..खांदे . पाय . दुखतात  मसाजनंतर तुम्हाला स्टीम किंवा हॉट  वॉटर बाथ घ्यालाल हवे . त्यामुळे तुमच्या शरीरातून तेल बाहेर येइल आणि तुम्हाला चांगले वाटेल . 

जूस अप -:  रात्री झोपण्यापूर्वी चहा - कॉफि पासून लांब राहा . कॅफीनच्या जास्त सेवनाने झोप येत नाही . मग बेडवर बऱ्याच वेळा जागे राहावे लागते . रात्री तुम्ही जर काही पिणार असाल तर ताज्या फळांचे रस प्या . त्यामुळे तुमचे पोट साफ होईल . हर्बल चहा सुद्धा  शरीर निरोगी राहण्यास सहायक ठरतो . एकंदरीत रात्री झोपताना शरीरास आवश्यक असणाऱ्या आणि तुम्हाला चांगली झोप येइल असाच आहार घ्यायला हवा . 

शाकाहारी व्हा -: जर तुम्ही डिटॉक्स प्रोग्रामवर असाल तर तुमच्या आहारात मांसाहाराचा समावेश करण्याऐवजी भरपूर पालेभाज्या खा . वनस्पतीजन्य आहारात फाईटोनियट्रीट्स असतात . जे आपल्या पचन व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात . ह्यामुळे आपल्या शरीरातले यकृत हि आरामात काम करते . कोबी . फ्लॉवर . मुळा . लिची . इतर पालेभाज्यामध्ये ही फायटोन्यूट्रीट्स अधिक असतात . जर सलाड मुळे  तुमची भूक भागत नसेल तर तुम्ही फळेही खाऊ शकता . बहुतांश फळामध्ये अँटी ऑक्सिडेन्ट असतात . त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते .   



  

No comments:

Post a Comment