Wednesday, 31 January 2018

।। माणूस घेत असलेला आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

                     ।। माणूस  घेत असलेला  आहार म्हणजे त्या माणसाचे घडणारे चारित्र्य होय ।।

माणसाची सगळी धडपड त्याच्या २/३/ वेळेच्या जेवणासाठी असते. माणूस केवळ अन्न  खाऊन जगू शकत नाही . सुख व समाधानाने जगण्यासाठी त्याला शिक्षणाची .एखाद्या छंदाची .किंवा कौशल्याची गरज असते . 
म्हणून आपल्या शहाण्या पूर्वजांनी २ गाष्टी सांगून ठेवल्या आहेत . त्यांच्यापैके पहिली म्हणजे -अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे .-यज्ञ कर्म आहे . केवळ उदार किंवा पोट भरणे नाही . माणसाच्या मेंदूला, बुद्धीला . सुद्धा खाद्य लागते व ते जरुरी आहे . ह्या २ गाष्टी संस्काराने जो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तोच.  खरा माणूस . 
 केवळ फक्त २ हात २ पाय . २ डोळे . असणे किंवा बढाई मरावाची तर . मेंदू असणे म्हणजे माणूस नाही . 
माणसाचे चांगुलपण. त्याच्या चारित्र्यात असते . माणसाचे चरित्र त्याला जन्मतः मिळत नसते . आई वडिलांचे संस्कार शैक्षणिक जीवन. समाज आणि  जगण्याची परिस्थिती . यातून माणसाचे चरित्र घडते . उच्च शिक्षण . किंवा खंडणी नावलौकिक म्हणजेच चरित्र नव्हे .चरित्र ही बाह्यतः दिसणारी चीज नाही . ती जाणवणारी - जाणून घेण्याची गोष्ट आहे . केवळ खोटे न बोलणे . आणि चोरी न करणे म्हणजे हि चारित्र नाही. कारण बहुतेक माणसे ह्या गोष्टी उघडकीला आल्या तर बदनामी होईल . किंवा कायद्याने शिक्षा होईल . ह्या न भीतीने त्या करत नसतात . आणि जिथे भीती . तिथे चारित्र्य नाही . खोटे न बोलणे आणि चोरी न करणे हे सतगुण आहेत युगात दुमत होऊ शकत नाही . पण ह्या गोष्टीपासून स्वेच्छेने दूर रहाणे . वेगळे आणी लोकलज्जेच्या भीतीने त्या न करणे वेगळं , चारित्र्य हा एक वृक्ष आहे . त्याचे रोप बालपणापासून लावावे .तेव्हा कुठे १०/१५ वर्षाने त्याचा वृक्ष बनतो . डिग्री  मिळवण्यासाठी १५ वर्ष शिक्षण घावे लागते . चारित्र्याची डिग्री मिळवण्यासाठी आहारापासून आचरणापर्यंत अनेक गोष्टी लागतात , पण  आहार हि वस्तुस्थिती आहे . माणसाच्या जडण व घडणीतसुद्धा आहार महत्वाचा आहे . व्यक्तिमत्व आणि चारित्र्य ह्यांचे जवळचे नाते बघता दोघांच्या निर्मितीत आहाराचा सहभाग असणे ओघाने आलेच , ताजा .स्वच्छ .सात्विक आहार ह्या दोन्हींच्या उत्पत्तीत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतो . 

           आपल्या पूर्वजांच्या आणि अनेक आहारतज्ञांचा मते सात्विक आहार म्हणजे शाकाहारी आहार . त्यात तेल .मसाले .हि प्रमाणाबाहेर नास्न्हे अपेक्षित आहे . शरीर स्वच्छ आणि हलके ठेवण्यासाठीच तर सात्विक आहाराचीच  गरज आहे . शिवाय मन हलके ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते . कोणत्याही कारणाने मनात खळबळ असेल तर . ती अशांती अन्न  पचनावर व झोपेववाईट परिणाम करते . म्हणूनच डॉक्टर .आहारतज्ज्ञ आणि मानसतज्ञ सांगतात कि रात्रीच्या जेवणानंतर झोपी जाण्याच्या मधल्या काळात मनाला अस्वस्थ करणारे विचार करू नयेत . टी.व्ही. वरचे प्रक्षोभक अथवा भीतीदायक कार्यक्रम बघू नयेत . किंवा त्या प्रकारचे वाचन करू नयेत , कुटुंबियांशी वाद विवाद भांडणे करू नयेत . आहारात तिखट तेलकट- मसालेदार  पदार्थ असतील तर आणि ताशा जेवणानंतर वरील प्रकारचे वाचन केले किंवा  टी.व्ही.  प्रक्षेपण पाहिले तर पचनाचे आणखी तीव्र दुष्परिणाम होतात. मन अस्वस्थ करणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिवसभर घडत असतात . हिंसा हि त्याच्यापैकि एक . माणूस मांसाहार करतो तेव्हा विशिष्ट प्राण्याचे फक्त मास खात नसतो . तो त्या प्राण्याचा भावना . आकांशा . आयामुळे राग आणि णि ऊर्जा ह्यांचेही भक्षण करीत असतो . माणसाच्या मांसाहारासाठी त्या प्राण्याचा जीव घेतला जातो . तेव्हा भीतीपोटी त्या प्राण्याची होणारी तडफड .त्याची वेदना . त्याच्या शरीरात पसरते . आणि ते शरीर खाणाऱ्याच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो . मासांहारमुळे मनात हिंसक विचार उसळतात . आणि ते काबूत आणता येत नाहीत. मांसाहारामुळे मानवी संवेदना थिजतात आणि इतर माणसाच्या भाव-भावनांचा विचार मनात येत नाही . कुणाच्या वेदनेने . दुःखाने मन हालत नाही . मांसाहारामुळे तमोगुण . म्हणजेच तामसपणा वाढतो . राग आणि चिडचिड ह्यांच्याबरोबर आळस . जडपणा . निराशा . व गुन्हेगारी वृत्ती हे दुर्गुण उसळतात . 

   मांसाहार हि प्रत्यक्ष हत्त्या  नसते. मांसाहार कारण्याऱ्याने ती केलेली नसते . तरीही मांसाहार करणे हि अप्रत्यक्ष हत्याच ठरते . मांसाहार करणाऱ्याना हे माहित नसते पुष्कळदा ते सवयीने मांसाहार करीत असतात . म्हणजेच त्यांच्या घरी अस अन्न शिजत असते. आणि हे लहानपणापासून ते खात असतात . साहजिक हे खाणे बरे कि वाईट ह्याचा विचार न करता खाल्ले जाते. त्याची सवय होऊन जाते .              
अशा माणसांना प्राण्यांचे प्रेम नसते असेही नाही . ते एखादा कुत्रा व मांजर पाळून असतात . व त्यापलीकडे ते प्राण्यावर प्रेमही करतात . त्यांच्यापैके अनेक जण समाज आली कि मांसाहार सोडून देखील देतात . कोणतीही `गोष्ट का कार्याची नाही हे कळले तर अनेकजण तो सोडून देतील   मांसाहाराच्या शक्ती वाढते . मांसाहारात अनेक जीवनसत्व असतात . लढाईवर जाणाऱ्यांना आणि मैदानी खेळ  खेळणाऱ्याना ऊर्जेसाठी मांसाहार आवश्यक आहे  . वगैरे. वगैरे   बरेच काही सांगितले जाते . पण त्यात मुळीच तथ्य नाही , 

  मांसाहारातील  उपयुक्त  जीवनसत्व शाकाहारात सुद्धा आहेत . भारतासारख्या देशात विपुल वनस्पती . व भाज्या पिकतात .त्यांच्यात वैविध्यही मुबलक आहे. भारतीय आहारामुळे डाएट ची आवश्यकताही राहिलेली नाही. मनुष्यच काय .चार पायाचे प्राणीदेखील शाकाहारावर उत्तम वाढतात . ह्या उपरही ज्यांना मांसाहार प्रिय आहे त्यांनी तो करावा ; पण मांसाहारात अधिक जीवनसत्व असतात . किंवा मांसाहारात मर्दुमकी आहे . ते क्षत्रियांचे खाणे आहे . मांसाहाराच्या बुद्धी वाढते . वगैरे. वगैरे हैस्यास्पद बकवास करू नये . 

  जे आवडते ते करायला कारण लागत नाही . आपले मन आपली सद्सद्विवेकबुद्धी जे करायला अडवत नाही ते माणसाने खुशाल करावे ..    
  ब्रिटन व अमेरिका इथे आज अनेक लोकं ठरवून शाकाहाराकडे वळले आहेत . - काही जण निरोगी जीवनासाठी . काही मनःशांतीसाठी , काही प्राणीप्रेमासाठी , तर काही दीर्घायुष्यासाठी . आणि काहीजण शाकाहारात वैविध्यपूर्ण लज्जतदार घटकासाठी .  

चांगला आहार माणसातल्या चांगल्या प्रवृत्ती जाग्या करतो . त्यांच्या कडून चांगले काम करवून घेतो  














।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-2

                               ।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।।  (शाकाहारी धान्ये )-2

चपाती -: चपाती आरोग्यदायी बनवण्यासाठी .सोयाबीन. काळे चणे , आणी गहू समप्रमाणात घयावे ह्या पिठामध्ये कोंड्याचा समावेश हि असावा . त्यामुळे शरीराला उत्तम वर्ग मिळते . 

पांढरा भात -: आपण पांढरा भट खातो. त्यावरील तांबट थराला पॉलिशच्या साह्याने नष्ट केले जाते . खर तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून हातसडीचा  तांदूळ उत्तम कारण ह्यामध्ये कॅर्बोदक आणी तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात . साधारण २०० ग्राम पांढरा तांदूळ खाण्याने शरीराला साधारण ४०० कॅलरी मिळतात ,ज्या अधिक आहेत . 

भाज्या -: चांगल्या तयारीने भाज्या स्वादिष्ट बनतात .म्हणजे भाजी तयार करताना .मसाले जेवढे चांगले भाजले जातील .तेवढी भाजी चांगली होते . त्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करणे योग्य नाही . अख्या मसाल्याची पूड करून किंवा त्याना कोरडे भाजून भाज्यांमध्ये वापर करा . त्यामुळे तेलाची आवश्यकता भासणार नाही . क्रीम एवजी दही किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता. 

दही -: दही आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवत नाही . जर तुम्ही फॅट्सयुक्त खाद्य पदार्थ्यांच्या सेवनाविषयी अधिक सतर्क असाल तर .टोन्ड दुधापासून तयार झालेले दही खा . दही पचनक्रिये साठी उत्तम . टोन्ड दुधापासून तयार झालेल्या २५० ग्राम दह्यात १५० कॅलरी असतात . कर्बोदके प्रथिने ह्याबरोबर कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे दही . 

डाळी-:   डाळीत प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात ह्याशिवाय डाळीमध्ये तंतुमय घटक .फोलेट . जीवनसत्व ब -१. लोह .आणी खनिजे असतात . २३० ग्रॅम डाळीत साधारण २०० कॅलरी असतात . डाळ कोलेस्ट्रॉल आणि शर्करेचा (साखर) स्तर संतुलित करण्यास सहायक ठरते . 

लाल मिरची-: लाल मिरचीची फोडणी दिल्याशिवाय आपल्या भाज्या आणी अपूर्ण रहातात . ही लाल मिरची आरोग्यदाई सुद्धा आहे . १०० ग्रॅम लाल मिरचीमध्ये साधारण ४० कॅलरी असतात . मिरची अँटी बॅक्टरिअल . अँटी डायबेटिक . अँटी कॅन्सर . आणि वेदनाशामक आहे . 

     भारतात शहरी भागात राहण्याऱ्या १० लाख भारतीयांचे निरीक्षण केले तेव्हा सकाळचा ब्रेकफास्ट मध्ये सगळ्यात जास्त फॅट्स व  कर्बोदकांचे सेवन केले जाते . स्नॅक्स रूपात केले जाणारे हे पदार्थ आरोग्यास नुकसानकारक आहे . शास्त्र शुद्ध आहाराला समजून घेण्याआधी आपण वाढत्या आजारांना समजून घयावे .गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह .हृदयाचे आजार . लठ्ठपणा .कर्करोग .ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढली आहे . देशातील ५५ हुन अधिक वय असलेली ४०% लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे . अमेरिका आणि चीन नंतर भारतातही लोकं लठ्ठपणाने ग्रस्त आहे . हृदयाच्या आजाराविषयी बोलवायचे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार . भारतीय लोकं हार्ट अटॅक ने मृत्युमुखी पाडण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे . भारतात दर ३३ व्या सेंकंदाला एक व्यक्तीला हार्ट अटॅक येतो . ह्या सर्व आजारांचे मूळ आपल्या आहारात आहे . भारतीय आहाराचे ताट चविष्ट तर आहे पण आरोग्य व पोषणाच्या दृष्टीने त्यात बदल करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देऊ लागलेले आहेत ...        









Sunday, 28 January 2018

।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-१

                                         ।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।।  (शाकाहारी धान्ये )-१

          पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर.  ज्वारी ,बाजरी . यासारख्या धान्याचा समावेश असावयाचा आणी त्यामुळे ते निरोगी रहात असत. सध्या लोकांनी इतर धान्यांचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत . बाजरी पचायला हलकी असते . प्रथिने कॅल्शिअम , लोह . फॉस्फरस . फायबर्सचा समावेश बाजारामध्ये असतो . म्हणून बाजरी  शरीर आणी मेंदूला निरोगी ठेवण्यास पूरक असते.

                                                                 ग्रीनटी -
अनेक औषादांचा खजिना असणारा ग्रीनटी आपल्या हृदयाची देखभाल करण्यास सहायक ठरतो . ग्रीन टी ह्यके मिलिया साईनेनिन्सस नावाच्या वनस्पतीच्या पानापासून फर्मेंटेशन न करता तयार केला जातो . त्यामध्ये आजारापासून संरक्षण करणारे अनेक अँटी ओक्ससिडेन्ट असतात . ह्यामध्ये अनेक पॉलीफिनॉल असतात , जे आजारापासून लढण्याची क्षमता वाढवतात . रक्ताला पातळ करण्यास मदत करतात . व धमन्यांचे संरक्षण करतात . ग्रीन टी ला फॉर्मेंटेशन करून जेव्हा जेव्हा सामान्य काळा चहा बनवलं जातो तेव्हा त्यातील अनेक फायदेशीर घटक नाहीसे होतात . असे घटक जे कोलेस्ट्रॉलला कमी करून कर्करोग आणी अनेक विषाणापासून संरक्षण करतात . ग्रीन टी यकृतासाठी देखील फायदेशीर आहे . ग्रीन टी यकृतातुन विषारी रस्त्याने बाहेर काढण्यासही मदत करतो . जर तुम्ही रोज अनेक कप चहा कॉफी पीत असाल तयार त्या ऐवजी ग्रीन टी पिणे हा उत्तम पर्याय आहे .

                                                        मोड आलेली कडधान्ये      

 जेव्हा आपण डाळ बीन्स किंवा एखाद्या कडध्यान्याला मोड आणतो तेव्हा त्यातील जीवनसत्व आणी एन्जाईमचा  प्रमाण खूप प्रमाणात वाढते. त्यामध्ये असणारे स्टार्च ह्या सिम्पल शुगर अशा कार्बो हैड्रेटमध्ये बदलते. त्याला आपले शरीर सहज पचवू शकते . प्रथिने अमिनो ऍसिड  मध्ये बदलतात, तर फॅट फॅटी असिडमध्ये रूपांतरित होते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने , क जीवनसत्व . कॅल्शिअम .मॅग्नेशियम . आणी अनेक आवश्यक एन्झाईम्स असतात . ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे .अशा व्यक्तींनी मोड आलेली कडधान्ये थोडीसी शिजवून मग खावीत . पचनाचा त्रास नसल्यास कच्ची खाणे अति उत्तम .

                                                   बाजरी व ज्वारी

पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर ज्वारी बाजरी ह्या धान्याचा समावेश असायचा त्यामुळे ते निरोगी रहात असत . सध्या लोकांनी इतर धान्याचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. बाजरी पचवावंसं हलकी असते . प्रथिने ,कॅल्शिअम .लोह. फॉस्फरस . फायबरचा समावेश बाजारामध्ये असतो म्हणून बाजरी शरीर आणी मेंदूला निरोगी ठरण्यास पूरक असते , ह्यामध्ये असणारे मॅग्नेशियम डोकेदुखी आणी हार्ट अटैक ची शक्यता कमी करते. नियासिन (जीवनसत्व ब -३) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते . फॉस्फरस चरबीचे पचन . व त्यांची देखभाल .ऊर्जा देण्याचे काम करतो.मधुमेहाचा धोका ही  कमी होतो. बाजारामध्ये आढळणारे फायबर कर्करोगाचा धोका कमी करते . मोठ्या आतड्यात पाण्याची कमतरता होऊ देत नाही .
         बाजरीची भाकरी खाण्याऱ्या व्यक्तींना हाडाच्या कमतरतेने निर्माण होणारा ऑस्टिओपोरोसिस आणी रक्ताच्या कमतरतेमुळे होणार अनिमिया होत नाही, बाजारामुळे यकृताशी संबधीत आजार होण्याची शक्यताही कमी होते  .

                                                  गव्हाचे अंकुर   

पोषक घटकांविषयी बोलावयाचे   तर गव्हाच्या अंकुराना गावाचे सोने म्हंटले जाते . हा प्रथिने ब जीवनसत्व .इ जीवनसत्व .लोह .कॉपर .मॅग्निशियम .मॅग्नीज कॅल्शिअम ,फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे . लक्षात ठेवा गव्हाचे अंकुर लगेच शिळे होतात . म्हणून त्याना एखाद्या घट्ट झाकणाच्या भांड्यात ठेवून फ्रीझ मध्ये ठेवावे .गव्हाचे अंकुर जरी घरी उगवता आले नाही तरी ते भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात .

                                                      ओट्स    
ओट्स मध्ये अनेक धान्यांचा समावेश असतो . ह्यामध्ये विद्राव्य फायबर्सही असतात . त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते . मधुमेहाच्या रुग्णांनी ओटसचे सेवन अवश्य करावे. तसेच पचन ठीक करण्याचा गुणधर्मही ओट्समध्ये आहे. यामध्ये चरबी आणी सोडियम कमी प्रमाणात असते . त्यामुळे हृदयाचे नुकसान होत नाही .

                                                      ब्रान 

व्हेंटब्रार्न  म्हणजे कोंड्यासहित बनवलेली चपाती आतड्यासाठी वंगणाचे काम करते, त्यामुळे गॅसेसचा त्रास दूर होतो . ह्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोट साफ रहाण्यास मदत होते . ब जीवनसत्व हि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असते . हल्ली शहरांमध्ये पेस्ट्री . चॉकलेट . पांढरा  ब्रेड.पांढरा तांदूळ . नान . रुमाली रोटी ह्यासारखे रिफाईंड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले  जातात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते .
 


(शाकाहारी धान्ये )-१

    

Thursday, 25 January 2018

। शुद्ध शाकाहारी जेवणाचे विज्ञान ।। (वेगन डायट )

                                            ।। शुद्ध शाकाहारी जेवणाचे विज्ञान ।।  (वेगन  डायट )

                   शाकाहारात अशा आहाराचा समावेश असतो .ज्यामध्ये जीवांची हिंसा किंवा शोषण केले जात नाही वेगन डायट मध्ये कोणत्याही प्रकारचे मटण .पोल्ट्री .डेअरी प्रॉडक्ट्स यांचा समावेश होत नाही . यामध्ये मध आणि अंडी  ह्यांचे सेवन केले जात नाही . वेगन डायट सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी सुरक्षित आहे .  वेगन डायट प्लॅन मध्ये जीवनसत्व ब -१२. झिंक क्लोरीन .ओमेगा . ३ फॅटी ऍसिडस . सप्लिमेंट्सचा समावेश केला जातो . या आहारात सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात .फळे ,भाज्या धान्यावर अधिक भर दिला जातो . दुग्ध जन्य पदार्थांचा ह्यामध्ये समावेश नसल्याने वजन वाढण्याची शक्यताही नसते . 

क्षार आणी अल्कलाईन डायट व आम्लीय म्हणजे एसिडिक डाएट दोनीही मध्ये निसर्गोपचारावर भर दिला जातो . निसर्गउपचाराच्या मते क्षार प्रकृतीचे शरीर निरोगी असते . आम्लाच्या अधिक्यामध्ये शरीर अस्वस्थ होते. सामान्य शरीराचे ऍसिड संतुलन ७.४ पी एच . असते आम्लाच्या अधिक्यामुळे शरीरात चरबी जमण्यास सुरुवात होते . विषारी पदार्थ शरीरात जमा होण्यास सुरुवात होते. बॅक्टरीया वेगाने वाढतात . त्यामुळे शरीरात संसर्ग बळावतो. परिणामी थकवा आणी आळस वाढतो . असं मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे होते . जेव्हा शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढते . तेव्हा शरीरात पाणी एकत्र होते . चयापचयाची क्रिया असंतुलित होते . किडनी आणी लिव्हरस्टोन होण्याबरोबरच केसही वेगाने गळायला लागतात . निसर्गओपचारांच्या मते. क्षार प्रकृतीच्या व्यक्ती अधिक निरोगी असतात . तुलनात्मकदृष्ट्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवतात . 

                          आम्लीय पदार्थाचं अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या व्यक्तींनाही वजन कमी करण्याची समस्या सतावते . क्षार प्रकृती असलेल्या व्यक्तींनी  आहारात सूप .फळ . नारळ . पाणी . भाज्या . यांचा समावेश करावा . विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात . 

                 कैलिफोर्निया मधील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला की शाकाहारी व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता अनेक पटीने कमी असते . शाकाहारामुळे कोलेरेक्टल कर्करोग २२%. कोलन कर्करोग १९% तर रेक्टल कर्करोग १८ टक्क्यापर्यंत कमी होण्याची असते . ह्या संशोधनादरम्यान ७७००० हुन अधिक लोकांच्या आहाराच्या सवयीचा आणि त्यांच्या आरोग्याचा इतिहास लक्षात घेऊन हे अध्ययन करण्यात आले .      
     
                  

Wednesday, 24 January 2018

।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

                                                   ।।हवामानानुसार व्हेज आरोग्य आहार ।।

 मनुष्याच्या स्थूलतेला रोखणारा शाकाहारी आहार -:

          ब्रेकफास्ट - दररोज सकाळी उठल्यावर १/किंवा २ ग्लास शुद्ध  कोमट पाणी प्यावे , त्यामुळे शरीरातील टॉक्ससिन्स बाहेर टाकले जातात . त्यामुळे पचन क्रिया स्लो होऊन वजन वाढू लागते . 
   
सकाळी दूध दही पनीर ओट्स डायफ्रूट हे पदार्थ नसतील तर पचनक्रिया मंदावते त्यामुळे वजन वाढते . सकाळी लवकर ब्रेकफास्ट केला नाही तर- चयापचया किया मंदावते . त्यामुळे शरीरावरील  जादा चरबी योग्य प्रकारे बर्न होऊ शकत नाही .  परिणामी वजन वाढते . काही खाद्य पदार्थामध्ये भरपूर फायबर असते .त्यामुळे सकाळी फायबर युक्त अन्न खावे . 

 निसर्ग आध्यात्म्याच्या प्रमाणे निकोप आरोग्यासाठी -निसर्गात होणाऱ्या बदलानुसार काय खावे हे जर मानव निसर्गाशी इमान राखून एकरूप झाला तर त्याचे पालकत्व व काळजी निसर्ग घेतो . निसर्गात होणाऱ्या बदलानुसार मानव निसर्गाशी एकरूप झाल्याने मनुष्याचे शरीर त्वरित प्राप्त नैसर्गिक परिस्थितीत जुळवून घेते. उदाहरणार्थ -शाकाहारी माणसाला उन्हाळ्यात भूक कमी प्रमाणात होते . कारण बाहेरील कडक उष्णतामान  व मानवाच्या शरीरातील ऊर्जेचे उष्णतामान ह्यांच्या प्रमाणाशी समतोल राखून आपोआप मानव कमी आहार घेतो . म्हणजे शाकाहारी नैसर्गिक आहारापासून शरीरा अंतर्गत व बाह्य  शरीररचना घडते . 

       हिवाळ्यामुळे थंड वातावरणात मनुष्यास भूक मोठ्या प्रमाणावर लागते कारण शरीराला पचनासाठी लागणारी उष्णता ऊर्जेसाठी  व्हेज खाद्य रूपाने मिळते . त्यामुळे शरीर चालवण्यासाठी तू जास्त आहार घे असे निसर्गच अप्रत्यक्षपणे सांगतो . त्यामुळे थंडीचा त्रास होणार नाही. 

           सर्वात महत्वाची बाब म्हणजे निसर्गात जे बदल झपाट्याने होतात तितक्या प्रमाणात मानवाची शरीररचना बदलत नाही म्हणजे.  निसर्ग ज्या वेगात  मध्ये बदलतो त्यावेगाशी आपल्या शरीररचना बदलणे मानवाला जुळवून घ्यावे लागते . उदाहरणार्थ -भारतात ३ मौसम  असतात १) उन्हाळा २)पावसाळा ३)हिवाळा 
ह्याप्रमाणे ऋतू असतात , पण जेव्हा भारतात उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा निसर्गात झपाट्यात बदल होतो त्याप्रमाणे भारतात मानव आपल्या शरीरात बदल करू शकत नाही. त्यामुळे वातावरणात जे व्हायरस वाढतात त्यामुळे शाररिक नाजूक भागावर जलद इन्फेकशन होत असते . त्यामुळे खूप लोकं लगेच आजारी पडतात त्यांचे आरोग्य बिघडते . असे अगदी प्रत्येंक ऋतू बदलताना होत असते . त्यामुळे प्रत्येंक ऋतू बदलानंतर दवाखान्यात आजारी म्हणून माणसाची गर्दी असते . 

                       निसर्गातील बदल व निसर्गाचे स्वरूप मानवामध्ये सामावून घेण्यासाठी मानवाच्या -आचार विचार आहार . ह्यामध्ये सतत बदल करावं लागतो . शरीर प्रकृतीसाठी योग साधना .व शाररिक व्यायाम प्राणायाम . आसने .-आहारासाठी - नैसर्गिक व्हेज आहार . व त्याचे शास्त्र शुध्द नियोजन . विचारासाठी सामाजिक जाणीव .संस्कृतीचे व मानवी आदर्श कामाची विचारसरणी . आरोग्यासाठी निसर्गतःच मिळणारे आयुर्वेदाचा नैसर्गिक औषध उपचार जडी .बुटी. औषधी पानांचे कडवट रस .ह्यांचा वापर केला तर मानवी आरोग्य व मानवी आयुष्य दीर्घायुषी होऊ शकेल. 
                                     
. 



Sunday, 21 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -11।।

                                                             || निसर्ग संपत्ती योगदान -11।।
  
                     आहाराचे मानसशास्त्र -
बरेच लोकं ३/४ कारणांसाठी सतत खात असतात त्यातील प्रकार -
१) फक्त खाण्यासाठी जगणे - मनुष्याला केवळ जिभेला चविष्ठ व खमंग लागते म्हणून खाणारे लोक त्यामध्ये आपल्याला उद्या मिळेल कि नाही ह्या शंकेने आजच सतत खाणे ह्याला विकृती म्हणतात . 
२) फक्त जगण्यासाठी खाणे-आपला आहार घेताना आपले शरीर . मन आरोग्य .व उद्याच्या आहाराचा विचार करून खाणारे लोकं . फक्त ईश्वरावर उद्याचा भरवसा ठेवून खाणारे लोकं , कमी व शरीरास किमान आधार मिळेल म्हणून भविष्यातील आहाराचा विचार करणारे लोकं . त्याचप्रमाणे आपल्याबरोबर ईतर सर्व माणसांना खायला मिळते कि नाही ?ह्यांचा विचार करणारे लोकं ह्यामध्ये मिळतात ,
शाकाहारी मानवास   केव्हा खावे ? कोणत्या वेळी  खावे ? व कोणत्या मौसमात ? ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार किती खावे ? हे त्यांच्या वंशपरंपरानुसार संपूर्ण माहित असते. तर निसर्गातील बदलत्या परंपरेनुसार मानव निसर्गाशी समरसतेने एकरूप झाला तर त्याची काळजी व पालकत्व निसर्गच घेत असतो .. त्यामुळे निसर्गातील बदलास शाकाहारी मनुष्याचे शरीर बरोबर संतुलित होते व निसर्गानुसार बदलण्याचे निर्णय घेते .  

उदाहरणादाखल -१)निसर्गातील बदलांचा जीव .प्राणी ह्यांना अंदाज असतो त्यांना निसर्गतः सहावे इंद्रिय प्राप्त आहे .भूकंपाची जाणीव अगोदर सुक्षम कंपनीद्वारे उंदीर व ईतर प्राण्यांना मिळते . दुसरे उदाहरण म्हणजे साधारणतः उन्हाळ्याच्या गरम मौसमात सर्व मनुष्याची भूक मंद होते कारण बाहेरील उष्णतामान हे मानवाच्या शरीरांतर्गत उष्णतेपेक्षा जास्त असते हे शरीर तापमान बाहेरील तापमानाशी मिळवून घेता यावे म्हणून मानवी आहार कमी प्रमाणात घेतला जातो . म्हणून मानवाने घेतलेल्या नैसर्गिक शाकाहार घेतल्यामुळे किंवा त्या आहाराच्या नित्य सवय ह्यामुळे शाकाहारी व्यक्तीची शरीररचना घडते . थंडीत गार तापमानात आहाराद्वारे उष्णता मिळवण्यासाठी मनुष्याला भूक जास्त लागते . जास्त आहारामुळे उष्णता शरीराला थंड वातावरणातही मिळत असते . शाकाहारी व्यक्ती व निसर्ग एकमेकाला अप्रत्यक्षपणे सांभाळून घेतात . 

त्याप्रमाणे हिवाळ्यात  संत्री हिरवे मटार .मौसंबी सफरचंद पपई फळे खातात उन्हाळ्यात आंबा द्राक्ष खातात . 
पावसाळी मौसमात जांभळे .पालेभाज्या खाल्या जातात .  


Saturday, 20 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -10।।

                                                     || निसर्ग संपत्ती योगदान -१०।।

असले तरी बुद्धिमान मानव निसर्गावर मात करू शकत नाही .तात्पर्य आजही मानव निसर्ग प्रकोपापासून आपल्या बुद्धिमत्तेनुसार फक्त बचाव करू शकतो. निसर्गावर मात करू शकत नाही का ?हा १
फार मोठा प्रश्न आहे, कारण निसर्गाचे समतोल बिघडले तर -महापूर .सुनामी .भूकंप . भीषण आग . युद्धे .दंगली .अतिवृष्टी .-ह्या सर्वामध्ये बरीच मानव व निसर्ग संपत्ती नष्ट होत असते ,हा व अनेक प्रकोपातून मानव नष्ट होऊ शकेल परंतु कालांतराने निसर्ग परत बहरू शकेल पण मानव ह्या प्रकोपातून वाचू शकत नाही . ह्यात मानवाचे निसर्गबद्धल प्रेम वाढत्या आधुनिकीकरणात कमी होत आहे .त्याचा परिणाम मानवालाच भोगावा लागतो तो म्हणजे वाढते प्रदूषण. जंगले नष्ट करून अनेक मजली इमारतीची वाढ . झाडे तोडणे .ह्यामुळे नैसर्गिक संपत्तीबरोबर मानवी संपत्ती नष्ट होत आहे. ह्यामध्ये -मानव जसे निसर्गाशी वागेल तसे  बरोबर त्याचप्रमाणे निसर्गही मानवाशी वागेल . निसर्गाशी एकरूपतेने व प्रेमाने मैत्त्री केली तर ह्या निसर्गाची प्राणशक्ती हीं मानवाच्या विचारांशी सकारात्मकतेने बदलत असते,
निसर्ग व्यवस्थापन -मानवी योग्य नियोजन केले तर निसर्गाच्या मदतीने योग्य नैसर्गिक वातावरणात त्या त्या मौसमातील वातावरणानुसार शेती व पिके भाजीपाला अन्नधान्ये मानव पिकवू शकतो . कोणत्या मौसमात कोणता आहार मानवाला उपयुक्त आहे ह्याचे मार्गदर्शन निसर्ग आपल्या प्रकृतीनुसार करत असतो . 
त्याचा सखोल अभ्यास मानवाने करणे आवश्यक आहे . कारण सर्वात महत्वाचे म्हणजे मानव हा निसर्गाच्या मातीत जन्माला येतो व शेवटी निसर्गाच्या मातीत मिसळून जातो हे एक जागतिक सत्य आहे ते नाकारून चालणार नाही. ह्यासाठी शाकाहारी निसर्गाने मिळणारा आहार मानवी जीवनासाठी आरोग्यपूर्ण आहे. 
निसर्ग शाकाहारी आहाराने वाढता  वाढता .निसर्ग आपण आजारी पडलो तर आपल्या आयुर्वेदिक तंत्राद्वारे आरोग्यपूर्ण करू शकतो .कारण मानव आजारी पडला तर त्याच्या औषधाची जरुरी निसर्गतःच मिळते कारण निसर्गात जंगल डोंगर ह्यामध्ये अनेक औषधी वेगवेगळ्या आजारासाठी मिळणारी जडी बुटी काढा .झाडांची औषधी रसायने आयुर्वेदाद्वारे निसर्गतःच मिळतात . निसर्गात मिळणारी वेगवेगळी फळे त्या त्या मोसमात आपल्याला तंदुरुस्त करतात .वेगवेगळ्या भाज्या पालेभाज्यांमध्ये अमूल्य असे व्हिटॅमिन्स मिनरल आपल्याला मिळतात. म्हणजे निसर्ग आपल्याला जन्मास घालून अप्रतयक्षपणे आपले भरणं पोषण करीत असतो. ह्याची जाणीव प्रत्येंकाने ठेवली पाहिजे .