Saturday, 31 March 2018

।। निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

                                    ।।  निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

१) आरोग्यदायक गोष्टी -:  मुळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते . त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मुळ्याचा फायदा होतो . 

२) मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषध म्हणून काम करते . 

३) मुळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते . नियमित खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते . मुळ्याची भाजी सारक असल्याने पोट साफ राहते . 

४) डोकेदुखी . अपचन . बद्धकोष्टता . असे विकार असतील तर मुलं खावा फायदा होतो . तोंडाची चव गेल्यास मुळा चघळावा . 

५) कर्बोदके -: खाद्य पदार्थामध्ये गोड पदार्थे असणे हे कर्बोदके असण्याचे धोतक आहे . साखर आणि गुळात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते . हे पचनास सुलभ व शक्तिवर्धक असतात . एका प्रौढ व्यक्तीसाठी ४०
ग्राम गुल किंवा साखरेचे सेवन करणे आवश्यक आहे . आरथक मधुमेहांसाठी हे प्रमाण नाही . 

६) प्रथिने -: शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . कर्बोदकाप्रमाणेच प्रथिने शक्ती देतात . डाळीद्वारे शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो . डाळीमध्ये २०/२५ % प्राथिने असतात . 

७) चरबी -: पदार्थामध्ये स्निग्धता असणे हे चरबीचे लक्षण आहे . तैल . वनस्पती तूप हे चरबी युक्त खाद्य पदार्थ आहे . 

८) लोह -: लोह मानवी शरीरात रक्त निर्मितीचे काम करते . शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त निर्मिती कमी प्रमाणात होते . त्यामुळे ऐनेमिया होतो .हि समस्या स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते . 

९)ऐनेमिया कसा ओळखलं -: रक्ताच्या कमतरतेमुळे यकृत अन्न पचवू शकत नाही . त्यामुळे गॅस तयार होतात . डोळ्याच्या खालच्या पापनीमध्ये पांढरेपणा . त्वचा पिवळी पडणे . थकवा . चक्कर . पॅट खराब होणे . आणि अशक्तपणा वाढतो . 

१०) लोह प्राप्तीचे स्रोत कोणते -: लोह खाता येत नाही तर ते आहारातून मिळवावे लागते . टमाटो . पालक . मध . केळ . सफरचंद . गाजर . इत्यादीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते . चवलीमध्ये प्रति ग्राम १..मिलिग्रॅम . कोथिंबीरमध्ये प्रति ग्राम १० मिलिग्रॅम . सुक्या सोयाबीनमध्ये प्रति ग्राम ८ मिलिग्रॅम . सुक्या डाळीत -७..मिलिग्रॅम . मटारमध्ये - ५ मिलिग्रॅम . आपल्याला रोज १५-ते २० मिलिग्रॅम ची आवश्यकता असते . 


शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . 













Friday, 30 March 2018

।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

                                  ।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

             मेट्रो सिटीबरोबर छोट्या छोट्या शहरांमध्येही प्रदूषण . खराब जीवनशैली . ताण ह्यांचा नकारात्मक परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे . आपल्या शरीराचा अनेक विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करायला हवा . खरे तर मानवी शरीरातून वेस्ट . रसायने . विषारी पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला " डिटॉक्स " असे म्हणतात ,
             जर तुम्हाला आळसावल्यासारखे . अस्वस्थ . थकल्यासारखे . जाणवत असेल तर "डिटॉक्स " हा त्याच्यासाठी चांगला उपाय आहे . त्यामुळे तुमची एनर्जी लेवल वाढू शकते . तसेच त्वचाही साफ होते (क्लीन )
आणि पेशींची ताकदही वाढते . चांगल्या आरोग्यासाठी तन व मन दोन्ही निरोगी रहाणे आवश्यक आहे . 
  
            डॉक्टर बेन किम ह्यांनी शरीर स्वासच`स्वच्छ रहाण्यासाठी डिटॉक्स प्रोग्रॅम तयार केला आहे . ह्यामुळे शरीराचे वजन उंचीनुसार नियंत्रित रहात नाही तर त्यामुळे निरोगी जीवनशैली टिकून रहाण्यास मदत होते . खरे तर डिटॉक्स डाएट आणि नॅचरल हेअल्थ प्रोग्रॅम वजन कमी करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता . सध्याच्या काळात आपल्या शरीरावर अनारोग्यादायी आहार , ताण , प्रदूषण , वाईट जीवन शैलीचा परनीआं होत आहे . त्यामुळे शरीरावर वाईट घटकांचा हल्ला होतो . आशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकत असाल तर डिटॉक्स प्रोग्रॅमची तुम्हाला निश्चितपणे मदत होईल . त्यामुळे शरीराची आतुन स्वच्छता होईल . बरेच लोकं ह्यासाठी उपास करतात . पण ह्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतुलित आहार . आणि व्यायाम करणे हा आहे . 

      पाणी प्या -: तहानेकडे कधीच दुर्लक्ष करू नका . भरपूर पाणी प्यायला हवे . ह्याशिवाय पाणीदार फळे . -
काकडी . टरबूज . कलिंगड . टॉमॅटो चेही सेवन अधिक प्रमाणात करावयास हवे . एवढेच नाही  तर तुम्हाला 
चिप्स . कुकीज . ब्रॉउनिज . पेस्टीज ह्यापासून दूर राहावयास हवे . 

शांत झोप -: " लवकर झोपणे आणी लवकर उठणे " मुखतः आपली घरची ऑफिस .कारखाने ह्यांची कामे दिवसभर करणे (शक्यतो परिस्थितीप्रमाणे ) हि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व नैसर्गिक सवय आहे . कारण निसर्ग तत्वानुसार सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत (सन रायीझ तो सन सेट ) पर्यंत कामाची विभागणी हवी . त्यामुळे आपले मानवी शरीर बदलत्या नेसर्गिक परिस्थितीशी अनुकूल राहते. पण ह्याचे चांगले परिणाम तेव्हाच मिळतात . जेव्हा आपण आपल्या शरीराच्या  स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देतो . खूप गरम किंवा खूप थंड खोलीत झोपू नये . झोपताना खोलीचे तापमान संतुलित असेल ह्याची काळजी घ्यावी . तुमचा डिटॉक्स प्रोग्रॅम तेव्हाच यशस्वी होईल तेव्हा तुम्ही आठ तास व्यवस्थित झोपाल . 

मसाज -: शरीर निरोगी रहाण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याबरोबर मसाज थेरपी ही उपयुक्त ठरते . जर स्पा ट्रेंटमेण्टचा खर्च तुमच्या खिशाला परवडत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करू शकतो. ज्या व्यक्ती ऑफिसेमध्य तासंतास खुर्चीवर  बसून काम करतात त्यांचे मान . हाथ ..खांदे . पाय . दुखतात  मसाजनंतर तुम्हाला स्टीम किंवा हॉट  वॉटर बाथ घ्यालाल हवे . त्यामुळे तुमच्या शरीरातून तेल बाहेर येइल आणि तुम्हाला चांगले वाटेल . 

जूस अप -:  रात्री झोपण्यापूर्वी चहा - कॉफि पासून लांब राहा . कॅफीनच्या जास्त सेवनाने झोप येत नाही . मग बेडवर बऱ्याच वेळा जागे राहावे लागते . रात्री तुम्ही जर काही पिणार असाल तर ताज्या फळांचे रस प्या . त्यामुळे तुमचे पोट साफ होईल . हर्बल चहा सुद्धा  शरीर निरोगी राहण्यास सहायक ठरतो . एकंदरीत रात्री झोपताना शरीरास आवश्यक असणाऱ्या आणि तुम्हाला चांगली झोप येइल असाच आहार घ्यायला हवा . 

शाकाहारी व्हा -: जर तुम्ही डिटॉक्स प्रोग्रामवर असाल तर तुमच्या आहारात मांसाहाराचा समावेश करण्याऐवजी भरपूर पालेभाज्या खा . वनस्पतीजन्य आहारात फाईटोनियट्रीट्स असतात . जे आपल्या पचन व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात . ह्यामुळे आपल्या शरीरातले यकृत हि आरामात काम करते . कोबी . फ्लॉवर . मुळा . लिची . इतर पालेभाज्यामध्ये ही फायटोन्यूट्रीट्स अधिक असतात . जर सलाड मुळे  तुमची भूक भागत नसेल तर तुम्ही फळेही खाऊ शकता . बहुतांश फळामध्ये अँटी ऑक्सिडेन्ट असतात . त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते .   



  

Wednesday, 14 February 2018

किडनी निरोगी राहावी ह्यासाठी

                                                       किडनी निरोगी राहावी ह्यासाठी 

मनुष्याची किडनी निरोगी राहणे खूप गरजेचे आहे . विशेष आहाराने किडनीतील विषारी पदार्थे बाहेर पडतात  खाली दिलेल्या पदार्थाने किडनी स्टोन होण्याची शक्यता कामी होऊ शकते . 

जांभूळ-: ह्यामध्ये अँटी ओक्सडेन्ट असतात त्यामुळे किडनीतून युरिक ऍसिड बाहेर पडते . करवंद हे छोटे फळ सुद्धा उत्तम औषध मानले जाते . करवंदात युरिक ऍसिड आणि युरियाला शरीरातून बाहेर काढण्याची क्षमता आहे .

कोथिंबीर -:  किडनी  स्टोनच्या इलाजात कोथिंबीर खूप महत्वाची ठरते . किडनीच्या आजारावर औषधातही ह्याचा उपयोग केला जातो . तुम्ही आहारात  कोथिंबिरीचा समावेश करू शकता . 


आले-:   शरीराची स्वच्छता करण्यात आले महत्वाचे काम  करते . रक्ताच्या स्वच्छतेबरोबर किडनीतील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम आले करते . विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णाच्या किडनीचे संरक्षण करण्याचे काम आले करते. 

हळद-:   जर तुम्हाला किडनी स्वच्छ करायची असेल तर हळद खा . आहारात हळदीचा समावेश करून अथवा आल्याचा तुकडा खाऊन शरीराला आल्याचे फायदे मिळवून देऊ शकतो . हळदीत अँटिसेप्टिक गुण हि असतात 


दही -:  दह्यामध्ये चांगले बॅक्टरीया आढळतात . जे किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात . हे बॅक्टरीया किडनीतील घाण बाहेर काढतात आणि रोग प्रतिकारक शक्तीही मजबूत करतात . 


असे करू नका-:   किडनीमध्ये स्टोन असल्यास दूध किंवा दुग्धजन्य उत्पादनाचे सेवन कमी करा . लोणचे . चटणी . मास . मासे . चिकन . जंक फूड ह्यांचे सेवन करा . पालेभाज्या धुवून वापरा ... 


  



Monday, 12 February 2018

फळांच्या सालींमधे असतात पोषक घटक -:

                                                फळांच्या सालींमधे असतात पोषक घटक -:


बटाटाचेची साले - : बटाटयापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त पोषक द्रवे असतात . साली काढल्याने त्याची पोषक द्रवये कमी होतात . त्यांच्या सालामध्ये कॅल्शिअम . व्हिटॅमिन बे. कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सी आणि आयर्न आदी असतात . ताण शिजवण्याआधी फक्त धुवावे लागते . बटाट्यास डीप फ्राय करू नका . तसे केल्याने त्यात अतिरिक्त कॅलरी जमा होते . त्यामुळे औरोग्यास नुकसान पोहचते . बटाटा नेहेमी फायबर युक्त भाज्यांबरोबर जसे बीन्स . सिमला मिरची. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांबरोबर शिजवावा . 

ब्रोकलीची पाने आणि वेत -:  ब्रोकोली शिजवताना आपणहवे तयार त्यावर चाट मसाला त्याची पाने आणि देठ फेकून देतो . तसे करू नका कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते . ब्रोकोलीबरोबर त्याची पाने आणि देठ ह्यांना कापून भाजी करा . हवे तर त्यास सूप मध्ये हि टाकू शकतात . तसेचबारिक करून घ्या व त्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकतात . 

टरबुजाची साल -:    टरबुजाची सालीला आपण कोणत्याच कामाचे मानत नाही . आणि नेहेमी फेकून देतो. पण त्यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे शरीरात रक्त संचार चांगला होतो . तारबुजांच्या सालीना दह्याबरोबर बारीक करून हि पेस्ट आपल्या डायट  मध्ये सामील करू शकता . 

डाळिंबाची साले-:   ज्या महिलांना पिरिएडच्या च्या दरम्यान जादा ब्लीडींग होते . त्यात डाळिंबाची साले सुकवून आणि त्याची पावडर रोज एक चमचा ख्याल हवी . त्यामुळे पिरिएडदरम्यान ब्लीडींग कमी होते . डाळिंबाचे साल तोंडात धरून शोषण्याने खोकल्याचा वेग कमी होतो . ह्या  व्यतिरिक्त डाळिंबाला बारीक कुटून त्यात दही मिसळून घट्ट पेस्ट मिसळून डोक्याला लावा , त्यामुळे केस मुलायम होतात . 

काकडीची साल -:   जर तुम्हाला काकडी पसंत असेल तर भरपूर पोषणासाठी काकडीची साल काढून खाऊ नका . काकडीच्या व्हिटॅमिन के ,अँटी ऑक्सिडेंट्स आणि पोटाशींउईम भरपूर मात्रेत असते . काकडीच्या शाळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते . जे अपचनापासून आराम देते . काकडीच्या कोशिंबेरीतही काकडीचे साल काढू नयेत . सालीसकट खावयास त्रास होत असेल तर त्याचे रायते बनवावेत . चवीत अंतर येणार नाहीत आणि काकडीचे साळी खाता येईल , दक्षिण भारतात विशेषतः आन्ध्र प्रदेशात काकडीचे लोणचे बनवले जाते , ते सुद्धा सालीसकट बनवले जाते . 

सालीसकट खाण्याचे फायदे-: पेरू . सफरचंद. दरेकशे ह्या फळांना सालीसहित खावे . जर आपण ह्या फळांची साले काढली तर व्हिटॅमिन बी .कॉम्प्लेक्स आपल्या शरीराला मिळणार नाहीत . कारण ते शाळांमध्ये अस्तित्वात असते . 

 साली फायबरचा मोठा स्रोत असतात . जे अपचन . पोटाचे विकार. दूर करण्यास मदत करतात . आणि पोटाच्या कॅन्सरपासूनही वाचवतात . ज्या प्रकारे सफरचंदाच्या फक्त सालीमध्ये कॅन्सरशी लढणारे ८५ % फाईटो केमिकल असतात जे पुतण्या सफरचंदापेक्षा जास्त आहे .  

सालीमध्ये खूपच कमी कॅलरीज ,साखर . आणि कोलेस्ट्रॉल असतात आणि ते ऐल डी ऐल ब्रँड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करते . 

संत्र्याच्या सालींमधे शक्तिशाली अँटीऑक्सडेंट्स असतात जे शरीरातील खराब कोलेस्टोलच्या स्ट्रेस कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात . 

सालीसकट फळ आणि भाज्या खाण्यामुळे पोट जास्त वेळपर्यंत भरलेले रहाते . वजन घटवण्यासाठी ह्याची मदत होते,
  
















शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -3

                                                    शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -3

सुंदर त्वचेसाठी खा ताजी फळे -: 

   फळ आणि भाज्यांच्या सेवनाने आपल्या सौंदर्यात भर पडते . फळ आणि भाज्या सौंदर्यात कशी भर घालतात ते पाहू. -:

गाजर -:   गाजरामध्ये बीट कॅरोटीन असते . जे केवळ रणरणत्या उन्हात त्वचेचे संरक्षण करते . असाच नव्हे तर  कापले  लागले कि अँटिसेप्टिक म्हणून काम करते . 

काकडी -:  काकडीला ब्युटी वेजिटेबलें म्हणतात . डोळ्यांना ताजे तवाने ठेवण्यासाठी आणि थकवा दूर ठेवण्यासाठी काकडीचे काप डोळ्यावर ठेवण्याचा सल्ला सौंदर्य तज्ञ् देतात . संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी काकडी विशेष लाभदायक ठरते . 

टोमॅट्टो -:  टोमॅटो भाजी म्हणून समाजाला जातो. पण खरे तर हे फळ आहे. ह्यास पोषक घटकाचा पॉवर हाऊस समजले जाते . ह्यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडेन्ट प्रदूषण आणि सूर्याच्या पॅरो बेंगनी किरणांपासून त्वचेचे होणारे नुकसान रोखण्यास कारणीभूत ठरतात . 

सफरचंद -:  सफरचंदात भरपूर आम्ल असते . जे मृत पेशींना  काढून फेकून देते . व त्वचा चमकदार बनवते . 

तुळस-: तुळशीच्या तेलाचे मालिश मोठं मोठ्या स्पा सेन्टर आणि हेअल्थ सेन्टर मध्ये केले जाते . रोनोज तुळशीची ३/४/ पाने खाल्ली तरी गाला- नाकाशी संबंधीत आजारांपासून मुक्ती मिळते . तसेच त्वचाही चमकदार होते . 


Sunday, 11 February 2018

शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -2,

                                            शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -2


आरोग्यदायी औषधी गुणाचे अंजीर फळ -:  अंजीरातून शरीराला लोह. व्हिटॅमिन्स ए . बी . सि . बऱ्याच प्रमाणात मिळते . अंजीर क्याला थंड व पचायला जड असतात . त्यांच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते . तसेच पित्त विकार . रक्त विकार . व वात विकार, यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात . 
अपचन . एसिडिटी . गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ . संध्याकाळ . १ ती  २ अंजीर खावीत किंवा याचा रस घ्यावा . वरिल त्रासांपासून  आराम मिळेल . अंजीर खाल्याने बौद्धिक व शाररिक थकवा दूर होण्यास मदत होते . लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून ३/४/अंजीर नेहेमी खावीत . त्यामुळे मूत्र विकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजीराचा रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात . त्वचा विकार . त्वचेची आग होणे . व कांजण्या ह्या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत . दररोज कोणताही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते . 

   अंजीर खाल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्याने त्याचे पाणी होते . असे म्हणतात . अंजीर शक्तिवर्धक आहे . तसेच ते सारक हि आहे . म्हणजे ओली किंवा सुकी २ अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे . थोड्याच दिवसात तक्रार दूर होते . 

  अंजीर शीत वीर्याचे , शरीर तृप्त करणारे . मांसधातूला पोषक असते . अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच  . पण रस रक्तरधातूसाठी पोषक ठरते . संगणकावर काम करणार्यांनी  व सातत्याने उपवास करणार्यांनी , रात्रपाळी किंवा जागरणे करणार्यांनी अंजिराच्या ऋतूत मौसमात रोज १/२ अंजीर खावीत . पिकलेल्या अंजीराचा जॅमही रक्त वृद्धी करण्यास उत्तम असतो . 

आवळ्याच्या सेवनाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढून आजार दूर राहातात -:

जुन्या पद्धती -: आवळा  अत्यंत महत्वाचा आहे ,आवळा खोकला . सर्दी . व श्वसनप्रणालीतील इतर उपचारासाठीहि वापरला जातो . तो शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवतो . आवळ्यात संत्यापेक्षा २० पॅट जास्त व्हिटॅमिन   सी ' असते . सफर्चंटापेक्षा तिप्पट जास्त प्रोटीन व १६० पट जास्त अस्कर्बिक ऍसिड असते . खूपशी खनिजे व अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर असते . 

आल्याचा चहा ताप घालवतो . व नाक . घास . व फुफुसातील कफ हटवतो . जर सर्दी पडसे जास्त असेल तर २ चमचे ताजा आल्याचा रस २ कप पाण्यात टाकून ३० मिनिटे मंद जाळावर उकळा . दर २ तासानंतर ह्या गुणकारी चहाचा आनंद घ्या . सर्दी पडश्यात भाज्यांचे सूप खूपच फायदेशीर असते . त्यात काळी मिरी मिसळली तयार अनेक त्रासांपासून सुटका होईल . 

आधुनिक उपचार -:  खोकल्याचे सिरप घशाचा स्प्रे वा ओटीसि पेन  / कोल्ड औषादांचा वापर करावा . सोबत कोमट पाणी .व खरात पाण्याच्या गुळण्या करव्यात  बंद नाक मोकळे करण्यासाठी नोझल ड्रॉप्स वापरावे किंवा  बाम  मिसळलेल्या गरम पाण्याचा वाफारा घयावा . कॉफी . चहा . कोल्ड्रिंक्स . व दारू टाळावी ,

पारंपरिक उपचार व आधुनिक औषधें ह्यांचे योग्य संयोजन सर्दी अंडासे हटवू शकते . सर्दी पडसे व खोकला टाळण्यासाठी आपल्याकडे कोणतेही सटीक उपाय नाहीत . त्यामुळे हे रोग हटवण्यासाठी बहुविध योजना आखावयास  हवी त्यासाठी झिंक व आवळ्याचे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे . 









Saturday, 10 February 2018

शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -१

                                           शाकाहारी  फळांचे  आरोग्यदायी  साम्राज्य -१


१ आरोग्यासाठी केळाचे फायदे  -:

सालामुळे केळ नेहेमी सुद्धा आणि संसर्गापासून लांब रहाते . केळाच्या ३३० हुन अधिक जाती आहेत . हाचि शेती मोठा प्रमाणावर केली जाते . केळ ९५६ याव्या शताब्धी मध्ये भूमध्यसागरी देशामध्ये आढळते आणि अत्ता संपूर्णं जगभरात सहज मिळते .केळाचू लांबी ४ इंच ते १५ इंचापर्यंत असते . केळाच्या जातीनुसार त्याच्या चवीत फरक पडतो .केल्याबरोबर वेलची खाण्याने केळ सहज पचते . केळ सकाळच्या वेळी खाणे योग्य . केल्याची साल काढल्यानंतर लगेच ते खायला  हवे . केळ अन्न पचवण्यास सहायक ठरते . त्याच बरोबर उत्साहही देते . 


२) संत्रामध्ये अनेक आजार दूर होतात -:`  

उच्चा रक्त दाबाच्या रुग्णांसाठी : संत्र्यामध्ये मॅग्नेशियम व पोटयशियम अधिक प्रमाणात आढळते .म्हणून ते उच्चा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते . 

३) ताप आणि थंडीपासून बचाव -: क . जीवनसत्वाचे प्रमाण संत्रामध्ये अधिक असते संत्रा च्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते, थंडी आणि तापाचा संसर्ग कमी होतो . 

४) कर्क रोगाची जोखीम कमी -: दररोज संत्र्याचा रस पिण्याने कोणत्याही प्रकारचा कर्क रोग होण्याची शक्यता कमीहोते कारण संत्र्याच्या रसात अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते . 

५) संधिवाताच्या रुग्णांसाठी -: सांधे दुखणे त्रस्त असणाऱ्या व्यक्तीनेही संत्र्याचे सेवन जरूर करावे . त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळते . वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते. 

६) जखम भरते -: संत्र्याच्या रसात फोलेट आढळते .फोलेट जखम भरून येण्यासाठी व नव्या पेशींच्या निर्मितीसाठी सहायक ठरते . 

७) लक्षात ठेवण्यासारखे -:  संत्र्याच्या रसात कॅलेरीचे प्रमाण अधिक असते. म्हणून त्याचे सेवन खूप अधिक प्रमाणात करू नका . जेवण झाल्यानंतर लगेच किंवा जेवणाच्या आधी अगोदर संत्र्याचा रस पियू नये . 
पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी संत्र्याचे नियंत्रित प्रमाणात सेवन करावे . संत्र्याचा रास आरोग्यदायी हे खरे असले तरी कोणत्याही ठिकाणचा रस आणि कधीही पिणे चुकीचे आहे . रस नेहेमी अशा ठिकाणचा प्यावा कि जे ठिकाण स्वच्छ आणि हायजिनिक आहे .