Wednesday, 4 April 2018

।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।

                          ।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।


कोणत्या आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांना वाढताना बघावे.  त्यांची प्रगती बघावी . पण आजची व्यस्त जीवनशैली आणि अनियंत्रित  आहार ह्यामुळे आयुष्य कमी होत चालेले आहे . 

कॅलरी कमी खा -: कॅलरी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत . पण गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा . मधुमेह . हृद्य रोग . कर्करोग ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते . जे आपले आयुष्य कमी करतात . आपला आहार असा असावा ज्यामध्ये पौष्ठिक पदार्थ अधिक असावेत . तसेच कॅलरी हि संतुलित प्रमाणात असाव्यात . 

शाकाहारी व्हा -:  वय वाढते तसे आपल्या शरीरातील काही पेशी नष्ट होतात . त्यांना ठीक करण्यासाठी अँटी ऑक्सिडेन्ट महत्वाची भूमिका बजावतात . अशावेळेस जे लोकं शाकाहारी असतात . भरपूर प्रमाणात फळे भाज्या खातात . त्यांना भरपूर प्रमाणात  अँटीऑक्सिडेन्ट मिळतात . ताजी फळे आणि भाज्यांमध्ये फाईटो न्यूट्रियंट्स असतात . त्यामुळे डिमेंशिया . अलझिएमेर होण्याची शक्यता कमी होते . 

मेंदूची कार्यक्षमता वाढवा -:  एखादी व्यक्ती तेव्हाच दिसते . जेव्हा ती शाररिक दृष्ट्या नवे तर मानसिकदृष्टही हि उत्साही असते . अक्रोड हे कोरडे फळ हृदयाशी संबधीत आजारापासून दूर ठेवतो . त्याच प्रमाणे मेंदूच्या आजारापासूनही शरीराचे संरक्षण करतो . 

व्यायाम जास्त करा -:  दररोज कमीतकमी एक तास व्यायाम करण्याने आपण निरोगी राहू शकतो . त्याच बरोबर हृदयाशी संबधीत आजारापासून संरक्षण होऊ शकेल . जागतिक आरोग्य संघटनेच्या मते - दर  आठवड्याला साधारणतः १५० मिनिटे म्हणजे अडीच तास व्यायाम केल्याने आयुष्य सडे चार वर्षाने वाढते .. 

सामाजिक व्हा -:  मित्रांची कमतरता आणि सामाजिक एकटेपणा मृत्यूला लवकर आमंत्रण देतात . त्यासाठी खुश रहा . आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा . ह्यामुळे तुम्ही सक्रिय तर रहालाच त्याचबरोबर तुमचे आयुष्यही वाढेल ... 












।। गव्हाच्या ओंबीचा रस म्हणजे साक्षात सुरक्षा कवच ।।

                                        ।। गव्हाच्या ओंबीचा रस म्हणजे साक्षात सुरक्षा कवच ।।

गावाची ओंबी म्हणजे ज्या  गव्हाच्या पिकाला कोवळ्या दाण्यांचा एकत्रित झुपका लागतो त्याला ओंबी म्हणतात त्यावर कोवळी पालवीचे वेष्टन असते . ह्याचा रस थॉयराइड  च्या रुग्णांसाठी वरदान ठरतो . डॉक्टरांच्या मते हे एक नेसर्गिक औषध आहे . जे वेगाने वाढणाऱ्या थॉयराइड वर नियंत्रण ठेवते . 

गव्हाच्या ओंबीच्या रसाचे फायदे -: लाल रक्तपेशी वाढवितो - हा रस केवळ लाल रक्त पेशींची निर्मिती करण्यास वेगाने साह्य करतो . असे नव्हे तर  त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहाण्यास मदत होते. चयापचयाची क्रिया सुधारण्यासहि मदत करतो . रक्त शुद्ध करून गॅसेसची समस्या दूर करण्यातही ह्या रसाची भूमिका महत्वाची आहे .  थॉयराइड. लठ्ठपणा . अपचन ह्यासारख्या समस्यांवर हा रास रामबाण उपाय आहे . हा रस रक्तातील ऍसिड च्या प्रमाणावरही नियंत्रण ठेवतो . त्याचबरोबर अंतर्गत समस्या म्हणजे अल्सर . गॅसेस . आतड्याशी संबधीत समस्या ह्यापासून हि संरक्षण करतो . 

रक्त शुद्ध करतो -: हा रस म्हणजे उत्तम डीटॉक्सिफायर आहे . जो रक्त शुद्ध करतो . ह्यामध्ये असणारी एन्जाईम्स . एमिनो . एसिडस  कर्करोगासारख्या आजारापासून संरक्षण करतात . हा रस तुमेरशी लढण्यास हि सहायक आहे . यामध्ये आढळणारी अनेक ऐजाईम्स आपली शरीराला हिल अप करण्यास मदत करतात . 

सौंदर्यवर्धक -:  जर तुम्ही सनबर्न ने त्रस्त  असाल तर नियमित हा रस प्या . काही दिवसात फरक दिसेल . केस गालात असतील किंवा डोके खाजत असेल तर हा रस पिणे गुणकारी ठरते . हा रस केसांना नेसर्गिक रंग देतो . ड़गिंगची प्रक्रिया कमी करून सौन्दर्यात भर घालतो . 

कसा कराल ह्याचा वापर -: ह्या रसाचा वापर कच्या रसाच्या रूपातच करायला हवा . हा रस जर शिजवला तर त्यातील सर्व एन्जाइम नष्ट होतात . ह्यामध्ये असणारे क्लोरोफिल आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतात . व शरीराच्या पेशींना ऑक्सिजनचा चांगला पुरवठा करतात . हा रस त्वचेवर लावल्यास खाजेसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते . 

नेसर्गिक ऐनेरजी बृस्टर -:  हा रस हार्ट अटॅक ,रेडिएशन . इफ्फेक्टपासून संरक्षण करतो . हा रस औरोग्यदायी ठेवतोच शिवाय शरीराचे अनेक आजारापासून संरक्षण करतो . आजच्या धावपळीच्या आयुष्यात हा रस म्हणजे नेसर्गिक ऐनेरजी बृस्टर आहे . 

Tuesday, 3 April 2018

।। मानवी शरीरातील ऑक्सिडेंट्स म्हणजे काय ?।।

                                             ।। मानवी शरीरातील ऑक्सिडेंट्स म्हणजे काय ?।।

ऑक्सिडेंट्स हे सामान्य भाषेत फ्री रॅडिकल्सच्या नावाने ओळखले जातात . ज्यांची उत्पत्ती ऊन ह्या प्रदूषणासारख्या बाह्य सूत्रावरून होत असते . ताज्या पालेभाज्या व ज्यामध्ये व्हिटॅमिन ऐ . व्हिटॅमिन सि . आणि बीट कॅरोटीन असते त्यात हे आढळतात . 
अँटी म्हणजे विरोधक आणी  दोष निवारक प्रकृतीचा अँटिऑक्सिडेन्ट समजण्यासाठी वास्तवात ते कशाचा विरोध करते व काय ठीक करते हे समजणे अत्यंत आवश्यक आहे . मानवी शरीरात सतत कोट्यवधी क्रिया होत असतात . ह्या क्रियांसाठी ऑक्सिजनची गरज असते . दुर्देवाने कधी जीवन देणाऱ्या ऑक्सिजन ने हानिकारक दुष्परिणाम होऊ लागतात . त्यामुळे शरीरातील पेशी डेमेज होतात आणि घटक आजार घेरतात . 

ऑक्सिडेंट्स हे सामान्य भाषेत फ्री रॅडिकल्सच्यानावाने ओळखले जातात .त्याची उत्पत्ती  मानसिक स्ट्रेस . अल्कोहोलिक पेय . आन हायजिनिक अन्न . आणि सिगारेटचा धूर . हि सुद्धा ह्याची माधम्ये आहेत . जास्त एखादा वस्तूचा पुष्ठभाग खराब करून गंज तयार होत असतो . तशाच शरीरात पेशींची हानी होऊ लागते . त्यामुळे उत्पन्न झालेले फ्री रॅडिकल्स D.N.A. प्रोटीन आणि फॅट्स सारख्या सशक्त पेशींवर हल्ला चढवतात . अशा प्रकारच्या घटनांमुळे इमोनोलॉजिकल क्रिया कमकुवत होतात . माणूस वृध्वत्वाची क्रिया वेगाने होते . 

   त्याचप्रमाणे कॅटररे क्टस व कॅन्सरसारखे  अनेक प्रकारचे आणि हृदयाशी संबधीत आजाराची साखळी तयार होते . एन्टीऑक्सडेंटस व अँटी ऑक्सिडिएशन्स एजेंट एकजूट होऊन घटक ऑक्सिडेंट्सची मारक क्षमता कमी करून त्याचे इफ्फेक्ट कमी करतात . हे डैमेज पेशींवर उपचार करून त्याची शक्ती कमी करतात 

शरीराचे अँटी ऑक्सिडेंट्स -:  नेसर्गिक रूपात निर्माण होणारे सुपर ऑक्ससाईड डिसमुटेस . करीतो`कॅटोलेस आणि ग्लुटेथिऑन सारखे अँटिऑक्सिडेंट्सचे स्ट्रक्चर  बदलून त्यांना हैड्रोजेन पॅरा ओक्स साईड मध्ये बदलतात . तसेच कॅटोलेसआपल्या पाळीत हैड्रोजेन पॅरा ओक्स साईडला पाणी . छोटे ऑक्सिजन कण आणि गॅसमध्ये तोडतात . 
ग्लुटोथेइऑन डिटॉक्सिफायिंग एजेंट निरनिराळे टॉक्सिन सोबत बांधून त्यांचे स्वरूप बदलतात . त्यामुळे ते वेस्टच्या स्वरूपात शरीरातून बाहेर पडू शकतात . 

इतरत्र कोठे आढळतात -:ताज्या पालेभाज्या आणि जुडूमध्ये व्हिटॅमिन ऐ व्हिटॅमिन सि . आणि बीट कॅरोटीन असते त्यात हे आढळतात . हे घटक साधारणपणे फळे . आणि भाज्या ह्यांचा रंग गडद असतो त्यात जास्त आढळतात . संत्री . लालमिर्ची . टमाटो . पालक . आणि गाजर . ह्यामध्ये हे असतात . 







।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

                                       ।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

  चांगल्या आरोग्यासाठी फळे आणि भाज्या खाणे खूप गरजे चे आहे .जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या असतील तरच तुम्हाला हे फायदे होऊ शकतात . 

     रक्तदाब नियंत्रणात राहतो . कोलेस्टोलची पातळी नियंत्रणात रहाते . धमन्या लवचिक होतात . हाडे मजबूत होतात . मेंदू . पचन यंत्रणेबरोबर सर्व अवयव योग्य रहातात . पण बहुतांश व्यक्ती ह्याकडे दुर्लक्ष करतात . ह्यामागील महत्वाचे कारण म्हणजे फळे व भाज्या ना परवडणे . भाज्या शिजवण्यासाठी लागणार वेळ व खाण्याचा जुन्या सवयी. ह्यामुळे अनेकदा फळ भाज्यांचा समावेश अनेकजण करीत नाही . खालील नोट्स चा वापर करून तुम्ही स्वादिष्ट व पौष्टिक बानू शकतात. ताज्या फळांचा व भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . मात्र  सकाळी सोडा पिणे टाळा . लक्षात ठेवा एक ग्लास जूस पिण्याचा अर्थ आहे . दहा चमचे साखर सेवन करणे . कांडा . काळे मिरे . मशरूम ने  सजवलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत आरोग्यदायी पर्याय आहे .   

१) गरज लक्षात घ्या -:  तज्ज्ञ म्हणतात आपण दिवसभरात कमीतकमी २ वाट्या फळे आणि सव्वा दोन वाट्या कच्चा भाज्या अवश्य खायला हव्यात . ह्यापेक्षा जास्तही खाऊ शकता,

२) लक्ष्य निश्चित करा -: जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या खूप प्रमाणात असतील तर आहारात एक फळ व एक भाजी समाविष्ट करा . जेव्हा याची तुम्हाला सवय होईल तेव्हा हळू हळू फळे व भाज्या ह्यांचे सेवन वाढवा . ह्यामुळे तुमच्या खाण्याच्या बाबतीत बदल होईल .   

३) प्रयोग करा -: किसलेले गाजर किंवा इतर भाज्या . पास्ता . सॉस . दही किंवा पिठात मिसळा . ह्यामुळे आहारातील भाज्यांचे प्रमाण वाढेल . 

४) काहीतरी नवीन करा -: सफरचंद . द्राक्षे . केळ. ह्यांचा कंटाळा येणे साहजिक आहे . म्हणून तुम्ही किवी . आंबा . ताजा अननस . इतर वेगळी फळे भाज्या . ह्यांचा आहारात समावेश करू शकता . 

५) फ्रुट स्मूदी  -:पाऊण कप प्लेन  दही. अर्धा कप स्ट्रॉबेरी . ब्लूएबेरी . किंवा तुमच्या आवडीची बेरी किंवा चेरी . अर्धे पिकलेले केळ . सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवा . त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला . पुदिना किंवा इतर फ्लेव्हरही मिसळू शकता . काही रेसिपी बुकच्या साह्याने तुम्ही तुमच्या आहारातील फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवू शकता . 

६) स्मूदी  सुरवात -: फ्रुट स्मूदी  ने दिवसाची सुरवात करण्यास किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत  तुम्हाला उत्साही ठेवण्यास सहायक ठरते . 

७) दही किंवा क्रीममध्ये बुडवा चव वाढवा -: दही किंवा क्रीममध्ये मसाला घाला . आणि त्यामध्ये फळभाज्या घालून मजा वाढवा . 

८) सॅन्डविच विथ सब्जी पेस्ट -:  टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून सॅन्डविचमध्ये घालून त्याचा वापर करा . 
९) देशी आम्लेट व्हेज  -: सकाळी बटाट्याचे पराठे . मठ्ठा . बटाट्याच्या  सॅन्डविचला नाही म्हणायला शिका . कांदा . काळे मिरे . मशरुमने सजविलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत औरोग्यदायी पर्याय आहे . स्टोबेरी . चेरी किंवा सुका मेव्याबरोबर कॉर्न फ्लेक्स दलिया खाऊ शकता . 

१०) द्रव रूपात घ्या -:ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . 

११) भाज्या धुवून मगच खा -: कोणत्याही भाज्या शिजवण्यापूर्वी चांगली स्वच्छ धुवून घ्या . भाज्या स्वच्छ ना धुणे धोकादायक आहे .. 















         

Monday, 2 April 2018

।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।

                          ।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।


१) तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी - डाळिंबाच्या सालीतही व्हिटॅमिन ऐ . इ . आणि सि . असतात . हे सर्व व्हिट्यामिन वाढत्या वयाची लक्षणे लवकर येण्यापासून बचाव करतात . अपचन . आम्ल पित्त . ताप . ह्यामुळे जर तोंडावाटे दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्याने तोंड साफ होऊन दुर्गंधी नष्ट होते . डाळिंबाची साल वाळवून त्याची भुकटी तयार करावी . एक ग्लास पाण्यात भुकटी मिसळून गुळण्या केल्यास दातांसंबंधीच्या समस्या . तोंड येणे व दुर्गंधी पासून सुटका होते . 

२) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते -: डाळिंबामध्ये प्रामुख्याने आढळणारे अँटी ऑक्सिडेंटन्ट्स शरीरात पसरणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा त्रास कमी  होतो . डाळिंबामुळे फ्री रॅडिकलसचा रक्त वाहिन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते तासकतसेच कोलेस्ट्रॉचेही प्रमाण नियंत्रणात रहाण्यास मदत होते . कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल्याने रक्तदाब हि सुधारतो . 

३) मेंदू सक्रिय ठेवते -: डाळिंबामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते . अल्झायमर सारख्या आजारामध्ये विसरभोळे पणा वाढण्याचा त्रास अधिक असतो . ह्यामध्ये डाळिंब खाणे हितकारी ठरते . 

४) वात  विकारावर उपयुक्त -: दाह शामक गुणधर्म असल्यामुळे डाळिंबामुळे कमजोर प्रतिकार र्शक्तीमुळे 
बालवणारे वातविकार कमी होण्यास मदत होते . डाळिंबामधील व्हिटॅमिन सि शरीरातील अँटी बॉडी ची निर्मिती व वाढ सुधारते . परिणामी विविध संसर्गापासून आपला बचाव होतो . 

५) खोकल्यावर उपयुक्त -: घश्यात खवखव वाटत असल्यास डाळिंबाच्या दाण्यापासून तयार पावडर पाण्यात उकळून गुळण्या कराव्या . ह्या माध्यमातून घशातील खवखव खोकल्यापासून सुटका होते . 

डाळिंबाला संस्कृतमध्ये दाडिमम म्हणतात . हे एक पित्तशामक फळ आहे . हि वनस्पती साधारण ३ ते पाचमीटर उंच होते.  

                                        २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।
 आवळा चावण्याने दात मजबूत होतात . आवळ्याचा रस दातांना लावण्याने पाय रिया मध्ये फायदा होतो . जेवण पचवण्यासाठी आणि तोंड साफ ठेवण्यासाठी  आवळ्याच्या सुपारीचे सेवन फायदेशीर ठरते . 

छोटासा आणि कडवट आवळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे . ह्याच्या गुणामुळे ह्या फळाला अमृतफळ असे म्हणतात . 

   आवळ्यामधे क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते . संत्रीपेक्षा २० पॅट अधिक का जीवनसत्व असते . आवळा रक्त शुद्ध करतो . अपचनापासून मुक्ती देतो . मानसिक विकाराशी सहायक ठरतो . शरीराला आजारापासून दूर ठेवतो . आवळा  कावीळ. पित्त . ताप . ह्यावर लाभप्रद आहे . 

            वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा उपोयोग करण्याने वेगवेगळ्या आजारामध्ये ह्याचा फायदा होतो . दहा ग्राम आवळ्याचे चूर्ण दुधाबरोबर घेतल्यास रक्त शुद्ध होते . त्वचेसंबंधीत आजार दूर होतात . 

         रात्री झोपण्यापूर्वी आवळ्याचे चूर्ण मध किंवा पाण्याबरोबर घेण्याने पोट साफ होते . डोळ्याशी संबंधित आजारामध्ये फायदा होतो . सुका आवळा शुद्ध तुपात तळून त्याचे चूर्ण डोक्यावर लेप म्हणून लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होते . 

                सुक्या आवळ्याचे चूर्ण चमेलीच्या तेलात मिसळून लावण्याने  अंगावरच्या खाजेचा त्रास दुर होतो 
आवळाच्या रसाचे सेवन करण्याने पोटातील जंत नाहीसे होतात .   











Saturday, 31 March 2018

।। निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

                                    ।।  निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

१) आरोग्यदायक गोष्टी -:  मुळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते . त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मुळ्याचा फायदा होतो . 

२) मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषध म्हणून काम करते . 

३) मुळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते . नियमित खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते . मुळ्याची भाजी सारक असल्याने पोट साफ राहते . 

४) डोकेदुखी . अपचन . बद्धकोष्टता . असे विकार असतील तर मुलं खावा फायदा होतो . तोंडाची चव गेल्यास मुळा चघळावा . 

५) कर्बोदके -: खाद्य पदार्थामध्ये गोड पदार्थे असणे हे कर्बोदके असण्याचे धोतक आहे . साखर आणि गुळात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते . हे पचनास सुलभ व शक्तिवर्धक असतात . एका प्रौढ व्यक्तीसाठी ४०
ग्राम गुल किंवा साखरेचे सेवन करणे आवश्यक आहे . आरथक मधुमेहांसाठी हे प्रमाण नाही . 

६) प्रथिने -: शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . कर्बोदकाप्रमाणेच प्रथिने शक्ती देतात . डाळीद्वारे शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो . डाळीमध्ये २०/२५ % प्राथिने असतात . 

७) चरबी -: पदार्थामध्ये स्निग्धता असणे हे चरबीचे लक्षण आहे . तैल . वनस्पती तूप हे चरबी युक्त खाद्य पदार्थ आहे . 

८) लोह -: लोह मानवी शरीरात रक्त निर्मितीचे काम करते . शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त निर्मिती कमी प्रमाणात होते . त्यामुळे ऐनेमिया होतो .हि समस्या स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते . 

९)ऐनेमिया कसा ओळखलं -: रक्ताच्या कमतरतेमुळे यकृत अन्न पचवू शकत नाही . त्यामुळे गॅस तयार होतात . डोळ्याच्या खालच्या पापनीमध्ये पांढरेपणा . त्वचा पिवळी पडणे . थकवा . चक्कर . पॅट खराब होणे . आणि अशक्तपणा वाढतो . 

१०) लोह प्राप्तीचे स्रोत कोणते -: लोह खाता येत नाही तर ते आहारातून मिळवावे लागते . टमाटो . पालक . मध . केळ . सफरचंद . गाजर . इत्यादीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते . चवलीमध्ये प्रति ग्राम १..मिलिग्रॅम . कोथिंबीरमध्ये प्रति ग्राम १० मिलिग्रॅम . सुक्या सोयाबीनमध्ये प्रति ग्राम ८ मिलिग्रॅम . सुक्या डाळीत -७..मिलिग्रॅम . मटारमध्ये - ५ मिलिग्रॅम . आपल्याला रोज १५-ते २० मिलिग्रॅम ची आवश्यकता असते . 


शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . 













Friday, 30 March 2018

।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

                                  ।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

             मेट्रो सिटीबरोबर छोट्या छोट्या शहरांमध्येही प्रदूषण . खराब जीवनशैली . ताण ह्यांचा नकारात्मक परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे . आपल्या शरीराचा अनेक विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करायला हवा . खरे तर मानवी शरीरातून वेस्ट . रसायने . विषारी पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला " डिटॉक्स " असे म्हणतात ,
             जर तुम्हाला आळसावल्यासारखे . अस्वस्थ . थकल्यासारखे . जाणवत असेल तर "डिटॉक्स " हा त्याच्यासाठी चांगला उपाय आहे . त्यामुळे तुमची एनर्जी लेवल वाढू शकते . तसेच त्वचाही साफ होते (क्लीन )
आणि पेशींची ताकदही वाढते . चांगल्या आरोग्यासाठी तन व मन दोन्ही निरोगी रहाणे आवश्यक आहे . 
  
            डॉक्टर बेन किम ह्यांनी शरीर स्वासच`स्वच्छ रहाण्यासाठी डिटॉक्स प्रोग्रॅम तयार केला आहे . ह्यामुळे शरीराचे वजन उंचीनुसार नियंत्रित रहात नाही तर त्यामुळे निरोगी जीवनशैली टिकून रहाण्यास मदत होते . खरे तर डिटॉक्स डाएट आणि नॅचरल हेअल्थ प्रोग्रॅम वजन कमी करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता . सध्याच्या काळात आपल्या शरीरावर अनारोग्यादायी आहार , ताण , प्रदूषण , वाईट जीवन शैलीचा परनीआं होत आहे . त्यामुळे शरीरावर वाईट घटकांचा हल्ला होतो . आशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकत असाल तर डिटॉक्स प्रोग्रॅमची तुम्हाला निश्चितपणे मदत होईल . त्यामुळे शरीराची आतुन स्वच्छता होईल . बरेच लोकं ह्यासाठी उपास करतात . पण ह्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतुलित आहार . आणि व्यायाम करणे हा आहे . 

      पाणी प्या -: तहानेकडे कधीच दुर्लक्ष करू नका . भरपूर पाणी प्यायला हवे . ह्याशिवाय पाणीदार फळे . -
काकडी . टरबूज . कलिंगड . टॉमॅटो चेही सेवन अधिक प्रमाणात करावयास हवे . एवढेच नाही  तर तुम्हाला 
चिप्स . कुकीज . ब्रॉउनिज . पेस्टीज ह्यापासून दूर राहावयास हवे . 

शांत झोप -: " लवकर झोपणे आणी लवकर उठणे " मुखतः आपली घरची ऑफिस .कारखाने ह्यांची कामे दिवसभर करणे (शक्यतो परिस्थितीप्रमाणे ) हि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व नैसर्गिक सवय आहे . कारण निसर्ग तत्वानुसार सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत (सन रायीझ तो सन सेट ) पर्यंत कामाची विभागणी हवी . त्यामुळे आपले मानवी शरीर बदलत्या नेसर्गिक परिस्थितीशी अनुकूल राहते. पण ह्याचे चांगले परिणाम तेव्हाच मिळतात . जेव्हा आपण आपल्या शरीराच्या  स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देतो . खूप गरम किंवा खूप थंड खोलीत झोपू नये . झोपताना खोलीचे तापमान संतुलित असेल ह्याची काळजी घ्यावी . तुमचा डिटॉक्स प्रोग्रॅम तेव्हाच यशस्वी होईल तेव्हा तुम्ही आठ तास व्यवस्थित झोपाल . 

मसाज -: शरीर निरोगी रहाण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याबरोबर मसाज थेरपी ही उपयुक्त ठरते . जर स्पा ट्रेंटमेण्टचा खर्च तुमच्या खिशाला परवडत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करू शकतो. ज्या व्यक्ती ऑफिसेमध्य तासंतास खुर्चीवर  बसून काम करतात त्यांचे मान . हाथ ..खांदे . पाय . दुखतात  मसाजनंतर तुम्हाला स्टीम किंवा हॉट  वॉटर बाथ घ्यालाल हवे . त्यामुळे तुमच्या शरीरातून तेल बाहेर येइल आणि तुम्हाला चांगले वाटेल . 

जूस अप -:  रात्री झोपण्यापूर्वी चहा - कॉफि पासून लांब राहा . कॅफीनच्या जास्त सेवनाने झोप येत नाही . मग बेडवर बऱ्याच वेळा जागे राहावे लागते . रात्री तुम्ही जर काही पिणार असाल तर ताज्या फळांचे रस प्या . त्यामुळे तुमचे पोट साफ होईल . हर्बल चहा सुद्धा  शरीर निरोगी राहण्यास सहायक ठरतो . एकंदरीत रात्री झोपताना शरीरास आवश्यक असणाऱ्या आणि तुम्हाला चांगली झोप येइल असाच आहार घ्यायला हवा . 

शाकाहारी व्हा -: जर तुम्ही डिटॉक्स प्रोग्रामवर असाल तर तुमच्या आहारात मांसाहाराचा समावेश करण्याऐवजी भरपूर पालेभाज्या खा . वनस्पतीजन्य आहारात फाईटोनियट्रीट्स असतात . जे आपल्या पचन व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात . ह्यामुळे आपल्या शरीरातले यकृत हि आरामात काम करते . कोबी . फ्लॉवर . मुळा . लिची . इतर पालेभाज्यामध्ये ही फायटोन्यूट्रीट्स अधिक असतात . जर सलाड मुळे  तुमची भूक भागत नसेल तर तुम्ही फळेही खाऊ शकता . बहुतांश फळामध्ये अँटी ऑक्सिडेन्ट असतात . त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते .